Thursday, November 27, 2025

शतकातील सर्वात मोठं सूर्यग्रहण; २०२७ मध्ये होणार ६ मिनिटांचा अंधार

शतकातील सर्वात मोठं सूर्यग्रहण; २०२७ मध्ये होणार ६ मिनिटांचा अंधार

मुंबई : येणाऱ्या वर्षात म्हणेजच २ ऑगस्ट २०२७ रोजी शतकातील सर्वात मोठं आणि दुर्मिळ खग्रास सूर्यग्रहण पाहायला मिळणार आहे. या घटनेदरम्यान अनेक प्रदेश तब्बल ६ मिनिटे २३ सेकंद गडद अंधारात बुडणार आहेत. २१ व्या शतकात एवढा मोठं सूर्यग्रहण यापूर्वी कधीही दिसलं नव्हतं, त्यामुळे जगभरातील खगोलशास्त्रज्ञ आणि अवकाशप्रेमींना ही पर्वणीच आहे.

खगोलशास्त्रज्ञांनी या सूर्यग्रहणाची तयारी सुरू केली असून, इतक्या मोठ्या कालावधीत होणारे खग्रास सूर्यग्रहण अवकाशशास्त्रीय संशोधनासाठीही महत्त्वाचं असेल. सहसा खग्रास सूर्यग्रहण 3 मिनिटांपेक्षा कमी वेळ टिकतं, मात्र २०२७ मध्ये होणारे ग्रहण जवळपास दुपटीहून अधिक काळ टिकणार असल्याने ते विशेष ठरणार आहे.

खगोलीय दृष्टीनेही ही घटना विलक्षण आहे. या दिवशी पृथ्वी सूर्यापासून सर्वात दूरच्या ठिकाणी असेल, त्यामुळे सूर्याचा आकार आकाशात लहान दिसेल. त्याचवेळी चंद्र पृथ्वीच्या अत्यंत जवळ असेल, त्यामुळे तो नेहमीपेक्षा मोठा वाटेल आणि सूर्य पूर्णपणे झाकू शकेल. या दुर्मिळ संयोगामुळे सूर्यप्रकाश अडवला जाऊन दीर्घकाळ अंधार निर्माण होणार आहे.

सूर्यग्रहण ही एक खगोलशास्त्रीय घटना आहे जी अनुक्रमे सूर्य, चंद्र आणि पृथ्वी यांच्या रेषेमुळे उद्भवते. या काळात सूर्यासमोर असलेल्या चंद्राच्या आकारामुळे त्याच्या प्रकाशात अडथळा निर्माण होतो, परिणामी पृथ्वीवर अंधार पडतो. २ ऑगस्ट २०२७ रोजी पृथ्वी सूर्यापासून सर्वात दूर असेल. त्यामुळे आकाशात सूर्य लहान दिसेल. परंतु त्याच वेळी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळच्या बिंदूवर असेल आणि त्याच्या कक्षीय मार्गावर फिरत असेल, ज्यामुळे तो आकाराने मोठा दिसेल. हे दुर्मिळ संयोजन जास्त काळ सूर्यप्रकाश रोखू शकेल, ज्यामुळे हे ग्रहण जास्त काळ होईल.

Comments
Add Comment