Thursday, November 27, 2025

Nashik News : नाशिक हादरले! ओझरच्या चंपाषष्टी उत्सवात बारागाड्यांच्या चाकाखाली चिरडून भाविकाचा दुर्दैवी मृत्यू

Nashik News : नाशिक हादरले! ओझरच्या चंपाषष्टी उत्सवात बारागाड्यांच्या चाकाखाली चिरडून भाविकाचा दुर्दैवी मृत्यू

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील ओझर गावातून (Ozar, Nashik) एक अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक अपघाताची बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अशा चंपाषष्टी उत्सवात (Champashashti Utsav) जुन्या परंपरेनुसार बारागाड्या ओढत असताना, बारागाड्यांच्या चाकाखाली येऊन एका भाविकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बुधवारी चंपाषष्टीच्या निमित्ताने ओझर गावात बारागाड्या ओढण्याची जुनी परंपरा उत्साहात सुरू होती. हा रोमांचक उत्सव पाहण्यासाठी आसपासच्या गावातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. याच उत्साहात किरण कर्डक नावाचा तरुण भाविक सहभागी झाला होता.

यात्रा सुरू असताना अचानक मोठी गर्दी उसळली आणि याच गडबडीत बारागाड्या ओढत असताना किरण कर्डक हा बारागाड्यांच्या चाकाखाली आला. बारागाड्यांच्या खाली चिरडल्याने या भाविकाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे संपूर्ण परिसरात एकच शोककळा पसरली आहे. उत्सवाच्या उत्साहादरम्यान घडलेल्या या दुर्घटनेमुळे या पारंपरिक उत्सवातील सुरक्षिततेच्या नियमांवर आणि गर्दीच्या व्यवस्थापनावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >