राजकोट: भारतीय क्रिकेटपटू चेतेश्वर पुजारा त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील नातेसंबंधामुळे चर्चेत आला आहे. पुजाराचा मेहुणा जीत रसिखभाई पाबरीवर याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी तपास सुरू झाला आहे. एका तरुणीने जीत विरोधात २६ नोव्हेंबर २०२४ रोजी बलात्काराची तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाला एक वर्ष पूर्ण होताच जीतने आत्महत्या केली असल्याने त्याच्या आत्महत्येसाठीचे प्राथमिक कारण हेच सांगितले जात आहे. लग्नाचे आश्वासन देऊन शरीरसंबंध ठेवल्याचा आरोप या तरुणीने तक्रारीमध्ये केला होता. यामुळे तणावाखाली आलेल्या जीतने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
जीत पाबरी विरोधात एका तरुणीने २६ नोव्हेंबर २०२४ रोजी मालवीय नगर पोलिसात बलात्काराची तक्रार दाखल केली होती. या तरुणीसोबत जीतचा साखरपुडा झाला होता. पण पुढे दोघांमध्ये काहीतरी बिनसल्याने त्यांनी नातेसंबंध तोडून टाकले. त्यानंतर तरुणीने जीत विरोधात बलात्काराची तक्रार नोंदवली. लग्नाचे आश्वासन देऊन साखरपुडा झाल्यावर जीतने अनेकदा जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले आणि नंतर लग्न मोडले, असे गंभीर आरोप तरुणीने केले. या प्रकरणामुळे जीत विरोधात तक्रार दाखल झाल्यानंतर वर्षभरातच जीतने आत्महत्या करत जीवन संपवले. यावेळी चेतेश्वर पुजारा भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी सामन्यात समालोचन करत होता.
गुवाहाटी: आसामचा सुप्रसिद्ध गायक झुबीन गर्गचा मृत्यू ही कुठलीही दुर्घटना नसून त्याची हत्या केली असल्याचा धक्कादायक खुलासा आसामचे मुख्यमंत्री ...
मिळालेल्या माहितीनुसार, जीत गेल्या वर्षभरापासून कायदेशीर खटल्याचा सामना करत होता. यामुळे तो बराच ताणतणावात होता. पण आत्महत्येमागील नेमके कारण शवविच्छेदन अहवाल आणि पुढील चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे,असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.चेतेश्वर पुजारा यांची सासरवाडी जामजोधपूरमध्ये आहे. पण त्याच्या सासरचे लोक गेल्या २० वर्षांपासून राजकोटमध्येच वास्तव्यास असून ते कॉटन जिनिंग फॅक्ट्रीचा व्यवसाय करतात. त्यांच्या मालकीचा एक कारखाना आहे.





