Thursday, November 27, 2025

Hema Malini Emotional Post On Dharmendra Death : 'ते माझ्यासाठी सर्वकाही'; धर्मेंद्रंच्या जाण्याने निर्माण झालेली 'पोकळी'... पतीच्या निधनानंतर हेमा मालिनींची पहिली प्रतिक्रिया

Hema Malini Emotional Post On Dharmendra Death : 'ते माझ्यासाठी सर्वकाही'; धर्मेंद्रंच्या जाण्याने निर्माण झालेली 'पोकळी'... पतीच्या निधनानंतर हेमा मालिनींची पहिली प्रतिक्रिया

सिनेसृष्टीवर तब्बल सहा दशकांहून अधिक काळ आपल्या अभिनयाने राज्य करणारे सुपरस्टार धर्मेंद्र (Dharmendra) यांनी वयाच्या ८९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. धरमजींच्या निधनामुळे अवघी बॉलिवूड इंडस्ट्री शोकसागरात बुडाली आहे. देओल कुटुंबासोबतच, जगभरातील त्यांच्या चाहत्यांवरही दुःखाचा डोंगर कोसळला आहे. धर्मेंद्र यांच्या निधनानंतर त्यांची दुसरी पत्नी आणि बॉलिवूडची 'ड्रीम गर्ल' (Dream Girl) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हेमा मालिनी (Hema Malini) यांनी आपल्या दुःखाला वाट मोकळी करून दिली आहे. पतीच्या आठवणींनी त्या व्याकूळ झाल्या असून, त्यांनी सोशल मीडियावर एक अत्यंत भावनिक पोस्ट लिहिली आहे. हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्यासोबतचे अनेक अविस्मरणीय फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमधून त्यांनी धर्मेंद्र यांच्यासोबत घालवलेल्या सुंदर क्षणांना उजाळा दिला आहे. त्यांच्या या इमोशनल पोस्टवर चाहत्यांकडून मोठी सहानुभूती व्यक्त होत असून, धरमजींना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.

हेमा मालिनींची हृदय हेलावून टाकणारी 'फर्स्ट रिॲक्शन

 सुपरस्टार धर्मेंद्र यांच्या निधनानंतर संपूर्ण सिनेसृष्टी हळहळ व्यक्त करत असताना, त्यांची पत्नी आणि बॉलिवूडची 'ड्रीम गर्ल' हेमा मालिनी यांनी अखेर आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. पतीच्या आठवणींनी व्याकूळ झालेल्या हेमा मालिनी यांनी सोशल मीडियावर एक अत्यंत भावनिक पोस्ट शेअर करत आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. धर्मेंद्र 'सर्वकाही' होते! हेमा मालिनी यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, "धरमजी, माझ्यासाठी खूप काही होते... एक प्रेमळ पती, आमच्या दोन्ही मुली ईशा आणि अहानाचे प्रेमळ वडील, एक मित्र, फिलॉसफर, एक मार्गदर्शक, कवी, आणि गरजेच्या प्रत्येक क्षणी माझ्यासाठी उपस्थित राहणारा – खरं तर, ते माझ्यासाठी सर्वकाही होते." धर्मेंद्र यांनी कठीण काळात आणि वाईट काळात नेहमीच आपल्याला साथ दिली, असेही हेमा मालिनी यांनी नमूद केले. त्यांच्या आठवणींना उजाळा देताना त्या पुढे म्हणतात, "त्यांच्या सहज आणि मैत्रीपूर्ण वागण्यानं, त्यांनी माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांना आपलंसं करून घेतलेलं. ते नेहमीच सर्वांना प्रेम आणि आदरानं वागवायचे." हेमा मालिनी यांची ही हृदयस्पर्शी पोस्ट वाचून चाहत्यांच्या डोळ्यातही अश्रू तरळले असून, सर्वजण या दिग्गज कलाकाराला श्रद्धांजली अर्पण करत आहेत.

आयुष्यभर राहणारी पोकळी...

धर्मेंद्र यांच्या प्रतिभेबद्दल बोलताना हेमा मालिनी म्हणतात की, "एक पब्लिक पर्सनॅलिटी म्हणून, त्यांची प्रतिभा, लोकप्रियता असूनही त्यांची विनम्रता आणि त्यांच्या युनिवर्सल अपीलमुळे ते सर्व दिग्गजांमध्ये एक युनिक आयकॉन बनले." चित्रपट उद्योगातील त्यांची शाश्वत कीर्ती आणि यश नेहमीच कायम राहील, असेही त्यांनी नमूद केले. पतीच्या निधनामुळे झालेल्या वेदना व्यक्त करताना त्या लिहितात, "माझं वैयक्तिक नुकसान शब्दांत वर्णन करता येणार नाही आणि त्यामुळे निर्माण झालेली पोकळी माझ्यासोबत आयुष्यभर राहील." वर्षानुवर्षे सोबत घालवल्यानंतर आता फक्त त्यांच्यासोबतच्या आठवणीच शिल्लक राहिल्या आहेत. "वर्षानुवर्ष एकत्र राहिल्यानंतर, माझ्याकडे अनेक खास क्षण पुन्हा जगण्यासाठी अनेक आठवणी शिल्लक आहेत," असे सांगत हेमा मालिनी यांनी आपले मन हेलावणारे दुःख व्यक्त केले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >