गौरवशाली क्षण! युनेस्कोच्या मुख्यालयात संविधान दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अर्धकृती पुतळ्याचे अनावरण

मुंबई: संविधान दिनानिमित्त पॅरिस येथील युनेस्कोच्या मुख्यालयात 'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर' यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. हा पुतळा महाराष्ट्र सरकारकडून युनेस्कोच्या मुख्यालयाला भेट देण्यात आला होता. ज्या व्यक्तीने संविधान तयार करण्यात मोलाची कामगिरी केली त्यांच्या पुतळ्याचे अनावरण संविधान दिनानिमित्त होणं, हे खूप गौरवास्पद गोष्ट आहे. युनेस्कोच्या मुख्यालयात भारताच्या महानायकाचा अर्धाकृती पुतळा स्थापित होणे हे केवळ महाराष्ट्राच्याच नाही तर भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आणि ऐतिहासिक गोष्ट आहे.


देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आपण या उल्लेखनीय घटनेचे साक्षीदार झालो, अशा शब्दात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या घटनेचे कौतुक केले आहे. तर 'हा क्षण तमाम भारतीयांसाठी अभिमानाचा असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युनेस्कोच्या संबंधित सर्व पदाधिकारी, वरिष्ठाधिकारी यांचे आभार मानले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या विद्वत्तेने आणि प्रतिभेने जगाला समता-बंधुता आणि सामाजिक परिवर्तनाची दिशा दिली' असे या निमित्ताने मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.




युनेस्कोच्या मुख्यालयात युनेस्कोचे महासंचालक खालिद अल-इनाय यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण झाले. याप्रसंगी भारताचे युनेस्कोतील स्थायी प्रतिनिधी विशाल शर्मा यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाने यापूर्वीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडन येथील घर खरेदी करून त्याचे संग्रहालयात रूपांतर केले आहे. जपानमधील कोयासान विद्यापीठातही डॉ. बाबासाहेबांचा पुतळा उभा राहिला आहे. आता मुंबईतील इंदुमिल येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक उभारणीच्या कामाला वेग आला आहे.

Comments
Add Comment

कॅनडात १४० कोटींच्या सोन्याची चोरी

मास्टरमाईंड भारतात लपल्याचा दावा टोरंटो : टोरंटो पिअरसन आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या २ कोटी कॅनेडियन

इराणशी व्यापार करणाऱ्या देशांवर अमेरिकेचा २५ टक्के आयातकर

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प व्हेनेझुएलाचे स्वयंघोषित कार्यकारी अध्यक्ष

वॉशिंग्टन  : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ

इराणमध्ये अस्थिरता कायम; आंदोलनातील मृतांचा आकडा पाचशे पार..

तेहरान : इराणमध्ये सुरू असलेली सरकारविरोधी आंदोलनं अद्यापही थांबलेली नसून, देशातील अनेक भागांमध्ये परिस्थिती

इराणच्या स्वातंत्र्यासाठी लढण्यास अमेरिका तयार : ट्रम्प

वॉशिंग्टन : इराणमध्ये सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची बैठक

संयुक्त राष्ट्रे : रशियाने यूक्रेनवर केलेल्या नव्या हल्ल्यांनंतर दोन्ही देशांमधील संघर्षाबाबत संयुक्त