प्रतिनिधी: मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली गेमिंग प्लॅटफॉर्म WinZO च्या संस्थापक जोडीला अंमलबजावणी संचनालयाने (Enforcement Directorate ED) अटक केली आहे.अधिकाऱ्यांनी स्पष्ट केल्याप्रमाणे अंमलबजावणी संचालनालयाने ऑनलाइन मनी गेमिंग प्लॅटफॉर्म WinZO चे संस्थापक सौम्या सिंग राठोड आणि पावन नंदा यांना मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली अटक केली आहे.तपास यंत्रणेच्या क्षेत्रीय ऑफिसमध्ये चौकशी सुरू केल्यानंतर बुधवारी त्यांना बेंगळुरूमध्ये अटक करण्यात आली आहे. माहितीनुसार, त्याच रात्री दोघांना बेंगळुरूमधील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले आणि न्यायालयाने त्यांना एक दिवसाची कोठडी सुनावली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील सविस्तर आदेशासाठी त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले जाण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.ईडीने गेल्या आठवड्यात मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याच्या (Prevention of Money Laundering Act) तरतुदींनुसार ऑनलाइन गेमिंग देणारी कंपनी WinZO आणि गेमझक्राफ्ट आणि त्यांच्या प्रवर्तकांच्या जागांवर छापे टाकण्यात आले होते.
सोमवारी, ईडीने एका निवेदनात असा आरोप केला आहे की, कंपनीने गेमर्सचे ४३ कोटी रुपयांचे निधी रखडून ठेवले होते आणि भारताने रिअल-मनी गेमिंगवर बंदी घातल्यानंतर हे पैसे ग्राहकांना परत करायला हवे होते. मात्र तसे न करता ते प्रलंबित ठेवले गेले असा आरोप कंपनीच्या प्रवर्तक जोडीवर करण्यात आले. ईडीने विन्झोवर गुन्हेगारी कारवाया आणि अनैतिक पद्धतींमध्ये सहभागी झाल्याचा आरोप केला आहे. कथित प्रकरणात ग्राहकांना हे माहित नसताना अल्गोरिदमसह खेळायला लावले जात होते की ते रिअल-मनी गेममध्ये मानवी खेळ आहे की नाही याची शाश्वती नसताना तर सॉफ्टवेअरशी अथवा माणसाशी खेळत हे स्पष्ट नाही. तसेच त्यात म्हटले आहे की विन्झो ब्राझील, अमेरिका आणि जर्मनीसारख्या देशांमध्ये भारतातून (भारतीय कंपनी वापरत असलेल्या त्याच प्लॅटफॉर्मवर) रिअल-मनी गेम (RMG) चालवत आहे.'केंद्र सरकारने २२ ऑगस्टपासून आरएमजीवर बंदी घातल्यानंतरही गेमर्स/ग्राहकांना पैशाची परतफेड न करता ग्राहकांचे ४३ कोटी रुपये कंपनीने प्रलंबित ठेवले आहेत असा आरोप ईडीने आरोप केला आहे.
कथित प्रकरणात विन्झो गेम्सनचा मालमत्तेचे ५०५ कोटी रुपये किमतीचे बाँड, मुदत ठेवी आणि म्युच्युअल फंड मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्या (पीएमएलए) अंतर्गत गोठवण्यात आले आहेत अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. या आरोपांवर प्रतिक्रिया देताना,' विन्झोच्या प्रवक्त्याने एका निवेदनात म्हटले आहे की,'विन्झो त्याच्या प्लॅटफॉर्मची रचना आणि संचालन कसे करते याचा मुख्य भाग निष्पक्षता आणि पारदर्शकता आहे. आमचे लक्ष आमच्या युजरचे संरक्षण करण्यावर आणि सुरक्षित व विश्वासार्ह अनुभव सुनिश्चित करण्यावर आहे' असे म्हटले. WinZO ने असेही म्हटले आहे, तसेच ते सर्व लागू कायद्यांचे पूर्णपणे पालन करत आहेत.
ईडीने म्हटले आहे की WinZO ने ग्राहकांनी वॉलेटमध्ये ठेवलेले पैसे काढण्यास प्रतिबंध केला आहे किंवा ते पैसे काढण्यास मर्यादा घातल्या आणि अल्गोरिदम/सॉफ्टवेअरच्या अनैतिक वापराद्वारे ग्राहकांनी ठेवलेली रक्कम आणि गमावलेल्या पैज रकमेच्या स्वरूपात कथित बेकायदेशीर निधी निर्माण केला आहे.
ईडीने केलेल्या दाव्यानुसार, WinZO चे जागतिक ऑपरेशन्स एकाच अँपद्वारे केले जात होते, म्हणजेच ते भारत-आधारित प्लॅटफॉर्मवर होस्ट केले जात होते.भारतीय संस्थेने परदेशात गुंतवणुकीच्या नावाखाली अमेरिका आणि सिंगापूरमध्ये निधी वळवल्याचे देखील आढळून ईडीच्या तपासात आढळून आले आहे असे ईडीने म्हटले. याविषयी ईडीने म्हटले आहे की, सर्व ऑपरेशन्स आणि दैनंदिन व्यवसाय आणि बँक खात्यांचे ऑपरेशन भारतातून केले जात असल्याने ५५ दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे ४८९.८० कोटी मूल्यांकनाचा निधी अमेरिकेतील त्यांच्या (WinZO) बँक खात्यात ठेवण्यात आले आहेत, जी एक बनावट कंपनी आहे असाही गंभीर आरोप ईडीने आरोप केला आहे. एजन्सीने गेमझक्राफ्टवरही मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आरोप केले आहेत.






