मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Local Body Elections) निवडणुकांमुळे रखडलेल्या महाराष्ट्र विधीमंडळ अधिवेशनाच्या (Maharashtra Legislature Session) तारखेचा मुहूर्त अखेर ठरला आहे. विधीमंडळ कामकाजाबाबत निर्णय घेण्यासाठी विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीची (BAC) बैठक १ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीत अधिवेशनाची नेमकी तारीख आणि कालावधी निश्चित केला जाणार आहे. दुपारी २.३० वाजता ही महत्त्वपूर्ण बैठक विधीमंडळात होणार आहे. त्यामुळे, अधिवेशनाच्या कामकाजाबाबतची अनिश्चितता आता संपुष्टात येणार आहे.






