धुळ प्रदुषण वाढले, मुंबईतील ५३ बांधकामांना काम थांबवा नोटीस

मुंबई - मुंबईत वायू प्रदूषण नियंत्रणासाठी महानगरपालिकेने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तसेच वायू प्रदूषणास कारणीभूत ठरत असल्याप्रकरणी मुंबईतील ५३ बांधकामांना ‘कामे थांबवा’ नोटीस मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आली. तरीही मुंबई महानगरपालिकेडून जारी वायू प्रदूषणासंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करावे. बांधकाम स्थळी संवेदक (सेन्सॉर) आधारित वायू गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) मोजणारे संयंत्र अविरतपणे सुरू राहतील हे सुनिश्चित करावे. ही संयंत्रे बंद आढळल्यास संबंधितांवर सक्त कारवाई केली जाईल, असा इशारा मुंबई अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ.अश्विनी जोशी यांनी दिला आहे.

वायू प्रदूषण नियंत्रणासाठी १५ ऑक्टोबर २०२४ रोजी मुंबई महानगरपालिकेने २८ मुद्यांचा समावेश असलेली सर्वंकष मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. वायू प्रदूषण नियंत्रणासाठी निश्चित केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटकोरपणे पालन होत असल्याचे सुनिश्चित करण्यासाठी महानगरपालिकेकडून सर्व प्रशासकीय विभाग (वॉर्ड) स्तरावर भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. नोव्हेंबर महिन्यात वायू प्रदूषणात वाढ निदर्शनास आल्यानंतर वायू प्रदूषणास कारणीभूत ठरल्याप्रकरणी या पथकाच्या वतीने २६ नोव्हेंबर २०२५ पर्यंत एकूण ५३ बांधकामांना ‘कामे थांबवा’ नोटीस बजावण्यात आल्या आहेत. यामध्ये ‘जी दक्षिण’ विभागातील सिद्धार्थ नगर परिसरातील १७, ‘ई’ विभागातील भायखळा, माझगाव परिसरातील ५, ‘पी उत्तर’ विभागातील मालाड (पश्चिम) परिसरातील ३१ बांधकामांचा समावेश आहे

दरम्यान, बांधकामाच्या ठिकाणी संवेदक अर्थात सेन्सॉर आधारित वायू गुणवत्ता निर्देशांक मोजणाऱ्या संयंत्रांच्या सद्यस्थितीबाबत अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी मंगळवारी २७ नोव्हेंबर २०२५ आढावा घेतला. मुंबईतील बांधकामाच्या ठिकाणी ६६२ संवेदक (सेन्सॉर) आधारित वायू गुणवत्ता निर्देशांक मोजणारे संयंत्र बसविण्यात आले आहेत. तर, २५१ संयंत्र प्रस्थापित करण्याची प्रक्रिया प्रगतिपथावर आहे. एकूण ४०० संयंत्रे ही एकत्रित माहिती संकलनाच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या डॅशबोर्डशी संलंग्नित करण्यात आली आहेत. यापैकी, ११७ संयंत्रे सक्रिय नसल्याचे अर्थात बंद असल्याचे आढळून आले आहेत. त्यामुळे त्यांना नोटीस बजावल्या जात असून त्यानंतरही याठिकाणची संयंत्र सक्रिय नसल्याचे आढळून आल्यास विभाग (वॉर्ड) स्तरावर नेमण्यात आलेल्या एकूण ९५ भरारी पथकांच्या माध्यमांतून संबंधितांवर सक्त कारवाई करण्यात येईल, असा इशारा डॉ. अश्विनी जोशी यांनी दिला आहे .

मुंबईतील २०९ बेकऱ्या स्वच्छ इंधनावर

बेकरी हेसुद्धा वायू प्रदूषणास कारक घटकांपैकी एक आहेत. मुंबईतील एकूण ५९३ बेकरींपैकी २०९ बेकऱ्या स्वच्छ इंधनावर चालणाऱ्या होत्या. महानगरपालिकेकडून करण्यात आलेल्या प्रयत्नांमुळे ५७ बेकऱ्या स्वच्छ इंधनावर परावर्तित झाल्या आहेत. तर, मागील सहा महिन्यात ७५ बेकऱ्यांनी या परिवर्तनासाठी पुढाकार घेतला आहे. तसेच, ८८ बेकऱ्यांनी महानगर गॅस मिळण्यासाठी अर्ज केला आहे.
Comments

लक्ष्मण कोळी    November 28, 2025 01:06 AM

महालक्ष्मी रेसकोर्स गेट नंबर 4, च्या समग्र विकासक मेसर्स,25, डाउन टाउन कंपनी च्या जोर दार काम चालू आहे, तसेज धुळ मीटी उडत आहे ? त्यामुळे रहीवाशीयाला लहान मुले बाळ वहीसकर लोकाना फार त्रास होत आहे ? आपण महानगर पालिका चे अधिकारी एक वेळा येउन बघा लोकाना कीती त्रास होतो, धन्यवाद महानगर पालिका अध्यक्ष साहेब

Add Comment

Independence Day 2026 : महाराष्ट्रात स्वातंत्र्यदिनाचा जल्लोष! जाणून घ्या मुख्यमंत्र्यांपासून पालकमंत्र्यांपर्यंत कुठे कोण फडकवणार तिरंगा?

मुंबई : भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन शनिवार, १५ ऑगस्ट २०२६ रोजी देशभर उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.

Pratap Sarnaik : एसटीच्या NCMC स्मार्ट कार्डला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली माहिती

१ कोटींहून अधिक प्रवाशांची नोंदणी; ६४ लाखांहून अधिक कार्डे

Mumbai Rain Update : मुंबईत आज पुन्हा पावसाचा जोर वाढणार! शहर-उपनगरात मध्यम सरी, काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असून, आजही शहर आणि उपनगरांमध्ये पावसाचा जोर कायम

Vakola Unauthorized Shops : वाकोलातील पदपथांवरील ३७ अनधिकृत दुकानांवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) पदपथांवर पादचाऱ्यांना सुलभपणे मार्गक्रमण करता यावे, यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून

Har Ghar Tiranga : प्रत्येक विभागात निघणाऱ्या तिरंगा रॅलीत मुंबईकरांनी सहभागी व्हावे

- मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून मुंबईकरांना आवाहन मुंबई (विशेष प्रतिनिधी) केंद्र शासनाच्या मार्गदर्शक

Mumbai Water Cut : मुंबईकरांवरील कपात कायम, पण जलतरण तलावांचा पाणी पुरवठा पूर्वव्रत

- तलावांमधील पाणी अद्यापही ९० टक्क्यांच्या पुढे जाईना मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिकेला पाणी पुरवठा