Wednesday, November 26, 2025

'प्रहार' शेअर बाजार विश्लेषण: आज 'छप्पर फाड के' वाढ सेन्सेक्स १०२२.५० व निफ्टी ३२०.५० अंकाने उसळून तेजीचा 'सुतळी बॉम्ब'

'प्रहार' शेअर बाजार विश्लेषण: आज 'छप्पर फाड के' वाढ सेन्सेक्स १०२२.५० व निफ्टी ३२०.५० अंकाने उसळून तेजीचा 'सुतळी बॉम्ब'

मोहित सोमण: आज शेअर बाजारात 'छप्पर फाड के' वाढ झाली आहे. तेजीचा सुतळी बॉम्ब फुटल्याने शेअर बाजारात भरघोस वाढ झाली. सेन्सेक्स १०२२.५० अंकाने उसळत ८५६०९.५१ व निफ्टी ३२०.५० अंकांने उसळत २६२०५.३० पातळीवर स्थिरावला आहे. त्यामुळे सेन्सेक्स १.२१% व निफ्टी १.२४% दिवसभरात उसळला होता. सेन्सेक्स बँक निर्देशांकाने तर मोठी कामगिरी करत ७७२.७५ अंकांची वाढ नोंदवली असून बँक निफ्टीतही ७०७.२५ अंकांची मोठी वाढ झाली आहे. निफ्टी व्यापक निर्देशांकात अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ निफ्टी नेक्स्ट ५० (१.४९%), मिडकॅप सिलेक्ट (१.४७%), नेक्स्ट ५० (१.४९%) निर्देशांकात झाली असून निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात सर्वाधिक वाढ मेटल (२.०६%), मिडिया (१.६२%), कंज्यूमर ड्युरेबल्स (१.७५%) तेल व गॅस (१.७२%), एफएमसीजी (१.७२%) निर्देशांकात निर्विवाद वाढ झाली आहे. तसेच डिसेंबर एफ अँड ओमधील सुरूवातीच्या काळात गुंतवणूकदारांनी खरेदी सुरू केल्याने बाजारात आज मोठी रक्कम गुंतवली गेली आहे.

मोठ्या प्रमाणात आज शेअर बाजारात घरगुती व परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी उदंड प्रतिसाद दिला. भारतीय कंपन्यासह अर्थव्यवस्थेतील मजबूत फंडांमेंटल व त्याला टेक्निकल मजबूतीची साथ मिळाल्याने सेन्सेक्स व निफ्टीसह मेटल,बँक, फायनांशियल सर्विसेस, हेल्थकेअर या शेअर्समध्ये झालेल्या भरघोस वाढीमुळे बाजारात मोठी रॅली झाली आहे. अखेरच्या सत्रात ब्लू चिप्स कंपनीच्या स्क्रिपमध्येही वाढ झाल्याने बाजारात आज घसरणीला वाव मिळाला नाही. मिड स्मॉल कॅप शेअर्समध्येही वाढ झाल्याने मजबूत आधारपातळी बाजारात राखली गेली आहे.

युएस बाजारातील फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपातीची अपेक्षा गेले २ दिवसात व्यक्त केली जात होती. कालच्या अस्थिरतेचा अपवाद वगळता शेअर बाजारात या आशावादामुळे ४ सत्रात वाढ नोंदवली आहे. आज विशेषतः सकारात्मक फेडच्या वक्तव्यांचा विशेष फायदा जागतिक शेअर बाजारात होत आहे. कालच्या युएस बाजारातील रॅलीसह आशियाई बाजारातही आज तुफान रॅली झाली आहे. युएस बाजारातील आजच्या सुरुवातीच्या कलातही तुफानी वाढ होत आहे. याखेरीज अमेरिकेतील आगामी महागाई, ग्राहक सीपीआय निर्देशांक, रोजगार आकडेवारी, किरकोळ विक्रीसह इतर महत्वाची आकडेवारी येणार असल्याने विशेष उत्साह बाजारात दिसत आहे. युक्रेन रशिया यांच्यातील तडजोडीसाठी युएसने प्रयत्न सुरू केल्याने भूराजकीय अस्थिरतेत मोठ्या प्रमाणात शांतता निर्माण झाली. जपानी बाजारातील मजबूत जीडीपीसह इतर आकडेवारीमुळे आशियाई बाजारात रॅलीला आणखी जोड मिळाली होती.

आज दुपारी तीन दिवसांच्या घसरणीनंतर आज जोरदार पुनरागमन केल्याने बाजारात सेन्सेक्स ९८८.९९ (१.१७%), निफ्टी ३११.५० (१.२०%) उसळत मोठी वाढ नोंदवली आहे. कालच्या नफा बुकिंगनंतरही आज मोठ्या प्रमाणात बाजारात डिसेंबरसाठी आणखी गुंतवणूक वाढवली गेल्याने त्याचा फायदा बाजारात झाला. कच्च्या तेलाच्या निर्देशांकातही घसरण झाल्याने आज मोठ्या प्रमाणात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात भारतीय बाजारात गुंतवणूक वाढवली असल्याची शक्यता आहे. डॉलरच्या तुलनेत रूपयातही किरकोळ वाढ झाल्याचाही फायदा बाजारात दिसला आहे.

मोठ्या प्रमाणावर आज परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी व घरगुती गुंतवणूकदारांकडून खरेदी वाढवताना आज मोठ्या प्रमाणात रोख विक्री मोठ्या प्रमाणात थांबली होती. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी ७८५.३० कोटींच्या गुंतवणुकीसह निव्वळ खरेदीदार बनले होते तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी अंदाजे ३९१२ कोटींची गुंतवणूक केली आहे. सकाळी १ ते १.५०% घसरणाऱ्या अस्थिरता निर्देशांक (VIX Volatility Index)हा १.८५% घसरणीवर पोहोचला असल्याने आज दिवसभरातील स्थैर्य अखेरच्या सत्रात आणखी वाढले आहे.

आज युएस बाजारातील सुरूवातीच्या कलात डाऊ जोन्स (०.२९%), एस अँड पी ५०० (०.९३%), नासडाक (०.७१%) निर्देशांकात वाढ झाली आहे तर आशियाई बाजारातील अखेरच्या सत्रात गिफ्ट निफ्टी (१.३१%) सह निकेयी २२५ (१.९३%), तैवान वेटेड (१.८१%), जकार्ता कंपोझिट (०.९३%),कोसपी (२.६०%) निर्देशांकात वाढ झाली आहे.

शेअर बाजारातील अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ नाटको फार्मा (११.२%), जीएमडीसी (८.२१%), रिलायन्स पॉवर (६.१३%), जेके सिमेंट (६.०९%), पीजी इलेक्ट्रोप्लास्ट (५.९१%), डीसीएम श्रीराम (५.८३%), टाटा इन्व्हेसमेंट कॉर्पोरेशन (५.५१%), नुवामा वेल्थ (४.८८%), जीई व्हर्नोवा (४.५०%), एनएमडीसी स्टील (४.४४%) निर्देशांकात झाली आहे.

शेअर बाजारातील अखेरच्या सत्रात सर्वाधिक घसरण सीपीसीएल (११.९९%), एमआरपीएल (३.१२%), एम अँड एम फायनांशियल सर्विसेस (२.९१%), टीआरआयएल (२.६३%), एफएसएन ईकॉमर्स (२.२२%), जेपी पॉवर वेंचर (२.१९%), सफायर फूडस (१.९५%), मदर्सन वायरिंग (१.७३%), भारती एअरटेल (१.६१%) निर्देशांकात झाली आहे.

आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले आहेत की,' जागतिक बाजारपेठेत उत्सवी "सांता क्लॉज रॅली" मुळे देशांतर्गत शेअर बाजारांमध्ये लक्षणीय वाढ झाली. किरकोळ आणि देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदार (DII) च्या मजबूत आवकांमुळे ही वाढ झाली, तर परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांचा (FII) प्रवाह सामान्य राहिला. जागतिक स्तरावर, डिसेंबरमध्ये यूएस फेडरल रिझर्व्हच्या दर कपातीच्या वाढत्या अपेक्षांसह, यूएस उत्पन्न कमी होणे आणि कमकुवत डॉलरसह बाजारातील भावना सुधारल्या. याव्यतिरिक्त, कच्च्या तेलाच्या किमतीत १% घट झाल्याने महागाईच्या चिंता कमी होण्यास मदत झाली. देशांतर्गत धोरणात्मक आघाडीवर, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) डिसेंबरमध्ये २५-बेसिस पॉइंट रेट कपात लागू करेल अशी अपेक्षा आहे, ज्याला चलनवाढ कमी करणे आणि उदासीन भूमिका घेणे आवश्यक आहे. शिवाय, रशिया आणि युक्रेनमधील संभाव्य युद्धबंदीभोवती वाढणारा आशावाद जोखीम घेण्याची क्षमता वाढवत आहे, ज्यामुळे आगामी वर्षासाठी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होत आहे.'

आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना अशिका इन्स्टिट्युशनल इक्विटीजने म्हटले आहे की,'डिसेंबर डेरिव्हेटिव्ह्ज मालिकेच्या पहिल्या दिवशी, भारतीय बाजारांनी जोरदार सुरुवात केली कारण निफ्टीने सकाळच्या अंतराच्या घसरणीपासून तीक्ष्ण पुनरागमन पाहिले आणि निर्णायकपणे २६००० पातळीचा टप्पा पुन्हा मिळवला, जो या प्रमुख तांत्रिक आणि मानसिक पातळीच्या वर आरामात बंद झाला. इंट्राडे रिकव्हरीमध्ये सर्वत्र खरेदीची तीव्र उत्सुकता दिसून आली, जी सुधारित भावना दर्शवते. क्षेत्रीयदृष्ट्या, व्यापक बाजार दृढपणे हिरव्या रंगात होता, धातू, ऊर्जा, ग्राहक टिकाऊ वस्तू आणि तेल आणि वायूमध्ये लक्षणीय ताकद होती, जी व्यापक-आधारित तेजी दर्शवते. बहुतेक क्षेत्रीय निर्देशांक उच्चांकावर संपले, जे नवीन तेजीच्या गतीला अधोरेखित करते. डेरिव्हेटिव्ह्ज क्षेत्रात, NUVAMA, 360ONE, SAIL, MCX आणि SIEMENS मध्ये लक्षणीय ओपन इंटरेस्ट स्पर्ट दिसून आले, जे सूचित करते की या काउंटरमध्ये नवीन लॉन्ग पोझिशन्स तयार होत आहेत. निफ्टी पर्यायांसाठी, कॉल साईड OI बिल्डअप २६२०० आणि २६५०० वर केंद्रित आहे, जे संभाव्य प्रतिकार क्षेत्र दर्शवते, तर पुट साईडवर, २६१०० आणि २६००० पातळीवर हेवी राइटिंग मजबूत समर्थन पातळी दर्शवते.'

आजच्या बाजारातील बँक निफ्टीवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे तांत्रिक विश्लेषक वत्सल भुवा म्हणाले आहेत की,'बँक निफ्टी एका मजबूत दीर्घ तेजीच्या कॅन्डलस्टिकसह बंद झाला, जो सूचित करतो की बुल्सचा विश्रांतीचा कालावधी संपला आहे आणि गती पुन्हा वरच्या दिशेने येत आहे. आरएसआयने तेजीच्या क्रॉसओवरमध्ये प्रवेश केल्याने निर्देशांकातील ताकद आणखी पुष्टी होते. पुढे जाऊन, जोपर्यंत निर्देशांक समर्थन पातळीपेक्षा वर टिकतो तोपर्यंत बाय-ऑन-डिप धोरण राखले पाहिजे. तात्काळ समर्थन (Immdiate Support) ५९२०० वर ठेवले आहे, तर ५८८०० हा स्थितीत्मक आधार (Positional Support) म्हणून काम करतो. वरच्या बाजूस, मानसिकदृष्ट्या महत्त्वाच्या ६०००० पातळीजवळ संभाव्य प्रतिकार (Potential Resistance) अपेक्षित आहे.'

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >