मोहित सोमण: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी निव्वळ घरगुती वित्तीय मालमत्ता (Net Financial Household Assets) आधारित मोठे वक्तव्य केले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटल्याप्रमाणे, या आर्थिक वर्षात गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठी वाढ झाल्याने निव्वळ घरगुती वित्तीय मालमत्ता ९.९ लाख कोटींनी वाढली आहे. त्यामुळे यावर्षी एकूण जीडीपीतील (सकल देशांतर्गत उत्पादन GDP) ६% हिस्सा या मालमत्तेचा आहे ' असे विधान त्यांनी केले. गेल्या वर्षी ते १५.५ लाख कोटी किंवा एकूण जीडीपीतील ५.३% होते ते यंदा मोठ्या प्रमाणात वाढल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.
तत्पूर्वी आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये घरगुती मालमत्ता पाच वर्षांतील सर्वाधिक खालच्या पातळीवर (All time Low घसरली होती. त्यावर्षी ती १३.३ लाख कोटीवर पोहोचली होती जी तत्कालीन एकूण जीडीपीतील ४.९% होती. मोठ्या प्रमाणातील संतुलित आर्थिक धोरणे व घरगुती उत्पन्नातील वाढती बचत पाहता ही वाढ झाल्याचे जाणवते. विशेषतः कोविड काळ सावरल्यानंतर वाढलेल्या बचतीमुळे दिसून येते. या तिमाहीत आर्थिक देय (Financial Debt) गेल्या तिमाहीतील १८.८ लाख कोटीवरूश १५.७ लाख कोटींवर घसरली आहे. या वर्षी क्रेडिट वाढ (Credit Growth) मोठ्या प्रमाणात वाढल्याचे यापूर्वी आपण आकडेवारीतून पाहिले होते. आकडेवारीनुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी १२% वाढ झाली होती त्यामुळे मोठ्या प्रमाणात चलनी तरलता बाजारात निर्माण झाली असताना उपभोग (Consumption), व एकूणच घरगुती मालमत्तेत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे स्पष्ट होते.
मात्र महत्वाची बाब म्हणजे बँकांच्या ठेवीत (Bank Deposits) गुंतवणूकीत घसरण सुरू झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या तिमाहीत ३५.२% घसरण झाली. त्याऐवजी गुंतवणूकदारांचा कल हा इक्विटी मार्केट लिंक गुंतवणूकीत अधिक जाणवत आहे.सोन्याच्या आधारावर कर्जांमध्ये सतत वाढ होत असतानाही, जलद, सुरक्षित कर्ज घेण्याला प्राधान्य गुंतवणूकदार देत आहे.






