मुंबई : राजधानी मुंबईतील दहिसर पूर्वेकडील आनंदनगर परिसरात आज मोठी आग लागली. दहिसर येथील एका उंच इमारतीत ही आग लागली, मात्र सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
आग लागलेली इमारत आनंदनगर परिसरातील सब्जी मार्केटच्या अगदी समोर स्थित आहे. घटनेची माहिती मिळताच महापालिका प्रशासनाने तात्काळ चार अग्निशमन गाड्या घटनास्थळी पाठवल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवले.
आगीमुळे इमारतीतील एक घर जळून खाक झाले, परंतु सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे सर्व रहिवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट नाही झाले. यावर अधिक तपास सुरू असून, दहिसर पोलीस आणि अग्निशमन दल याचा शोध घेत आहेत.
आग लागल्यानंतर, इमारतीच्या परिसरातील रस्त्यांवर वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला. अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पोलिसांच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यामुळे रस्त्यावर गाड्यांची लांबच लांब रांग लागली. आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत वाहतूक सुरळीत केली.






