कणकवली : कणकवली नगरपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पार्टी विरुध्द शहर विकास आघाडी अशी लढत आहे. निवडणुकीचे वातावरण तापले असतानाच मत्स्य व बंदरे विकास मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवलीच्या प्रचारात एन्ट्री घेतली आहे. खुद्द पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवली शहरातील व्यापारी , डॉक्टर , वकील, पत्रकार , प्रतिष्ठित नागरिक यांच्या गाठीभेटी घ्यायला सुरुवात केली आहे.
कणकवली येथील व्यापारी संघाचे अध्यक्ष दीपक बेलवलकर , डॉ. निलेश पाकळे , बापू पारकर , सुशील पारकर , डॉ. अनंत नागवेकर , मालपेकर यांच्यासह शहरातील प्रतिष्ठित नागरिकांशी पालकमंत्री नितेश राणे यांनी संवाद साधला.
यावेळी ही निवडणूक कणकवलीला विकासाकडे नेणारी आहे. केंद्र आणि राज्य सरकार हे भाजपचे आहेत. त्यामुळे कणकवलीतील सुज्ञ नागरिक म्हणून भारतीय जनता पार्टी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे आणि नगरसेवकांना मतदान करा. दुस-या टप्प्यातील विकास करण्याची जबाबदारी माझी आहे, असा शब्द देत विश्वास देण्याची भूमिका पालकमंत्री नितेश राणे वैयक्तिक गाठीभेटीमध्ये मांडत आहेत.