मोहित सोमण: एक्सेलसॉफ्ट टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे आज चांगले पदार्पण शेअर बाजारात झाले आहे. आज शेअर बाजारात सूचीबद्ध झाला असून १५% प्रिमियमसह दाखल झाला आहे. ५०० कोटींचा हा आयपीओ २१ ते २४ नोव्हेंबरपर्यंत बाजारात गुंतवणूकदारांसाठी खुला झाला होता. आज सकाळी बीएसई व एनएसईवर शेअर सूचीबद्ध झाला आहे. माहितीनुसार १२० रूपये प्रति शेअर प्राईज बँडच्या तुलनेत हा शेअर १५.६१% १३८.७१ रूपये प्रति शेअरसह व्यवहार करत आहे. यापूर्वी शेवटची जीएमपी (Grey Market Price GMP) ७ रूपये प्रिमियमसह १२७ रूपये प्रति शेअर होती. अपेक्षेपेक्षाही चांगले लिस्टिंग बाजारात झाल्याने शेअरकडून गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढू शकतात.
कंपनीच्या आयपीओत १.५० कोटी इक्विटी शेअर (१८० कोटी), व ऑफर फॉर सेल (OFS) साठी २.६७ शेअर (३२० कोटी) बाजारात उपलब्ध होते. किरकोळ गुंतवणूकदासाठी एकूण आयपीओतील ३५% वाटा उपलब्ध होता. तर किमान गुंतवणूक किरकोळ गुंतवणूकदारांसाठी १५००० रुपये (१२५ शेअर) निश्चित करण्यात आली होती. कंपनीला एकूण ४५.४६ पटीने सबस्क्रिप्शन मिळाले होते त्यापैकी किरकोळ गुंतवणूकदारांकडून १६.४४ पटीने, पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून (QIB) ५०.०६ पटीने, विना संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून (NII) ,१०७.०४ पटीने सबस्क्रिप्शन मिळाले होते. कंपनीने आयपीओआधी अँकर गुंतवणूकदारांकडून १५० कोटींचा निधी प्राप्त केला होता.
२००० साली या कंपनीची स्थापना झाली होती. कंपनी प्रामुख्याने जागतिक सास (SaaS) या आयटी तंत्रज्ञानात कार्यरत आहे. ए आय (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) मार्फत कंपनी नवी सोलूशन बाजारात आणते. कंपनीचे SARAS LMS तंत्रज्ञान आहे ज्यात EnablED LXP आणि OpenPage डिजिटल पुस्तकेही समाविष्ट आहेत शैक्षणिक संस्था आणि कॉर्पोरेशनना त्यांच्या प्रशिक्षण, शिक्षण आणि विकासाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक ते शिक्षण प्रशिक्षण कंपनी देते. एक्सेलसॉफ्ट शैक्षणिक प्रकाशक, विद्यापीठे, शाळा, सरकारी संस्था, संरक्षण संस्था आणि व्यवसायांसह विविध प्रकारच्या इतर सेवा क्लायंटना सेवा देते.
कंपनीला या आर्थिक वर्षात इयर ऑन इयर बेसिसवर २४% अधिक महसूल प्राप्त झाला असून इयर ऑन इयर बेसिसवर कंपनीच्या करोत्तर नफ्यात (Profit after tax PAT) मध्ये १७२% वाढ नोंदवली होती.
भारत, मलेशिया, सिंगापूर, यूके आणि यूएसए मध्ये कार्यरत असलेली ही कंपनी २०० हून अधिक संस्थांशी सहयोग करते आणि जगभरातील ३० दशलक्षाहून अधिक विद्यार्थ्यांना सोलूशन पुरवते. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या आयपीओतील मिळणाऱ्या निधीचा वापर कंपनी भांडवली खर्चासाठी, नव्या भांडवली खर्चासाठी, अत्याधुनिकीकरणासाठी, व दैनंदिन कामकाजासाठी करणार आहे.






