Wednesday, November 26, 2025

Satara : काळजाचा ठोका चुकवणारा थरार! महामार्गावर बेदरकार मिनी ट्रॅव्हल्सचा कहर; एकाचा जागीच मृत्यू, थराराचा व्हिडिओ व्हायरल

Satara : काळजाचा ठोका चुकवणारा थरार! महामार्गावर बेदरकार मिनी ट्रॅव्हल्सचा कहर; एकाचा जागीच मृत्यू, थराराचा व्हिडिओ व्हायरल

सातारा : साताऱ्यातून (Satara) एक अत्यंत धक्कादायक आणि भयंकर अपघाताची घटना समोर आली आहे. फलटण तालुक्यातील बरड येथे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर (Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Mahamarg) भरधाव मिनी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला, ज्यात एका व्यक्तीला आपले प्राण गमवावे लागले, तर चौघे जण गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बरड येथे मिनी ट्रॅव्हल बसवरील चालकाचे नियंत्रण सुटले. अनियंत्रित झालेल्या या बसने महामार्गावर रस्ता ओलांडणाऱ्यांना चिरडले. या अपघातामध्ये एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून, मिनी ट्रॅव्हल्समधील चार जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात इतका भीषण होता की, महामार्गाच्या कडेला असलेल्या एका हॉटेलच्या सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यामध्ये हा संपूर्ण थरार कैद झाला आहे. हा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अपघातानंतर तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले. जखमींना उपचारासाठी फलटण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे संत ज्ञानेश्वर महामार्गावरील वाहतुकीच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

 
View this post on Instagram
 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

 

मिनी बस थेट डिव्हायडरवर धडकली...

साताऱ्यातील फलटणजवळील संत ज्ञानेश्वर महामार्गावर झालेल्या भीषण अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये (CCTV Footage) कैद झाला आहे. या दुर्घटनेत मिनी बस चालकाच्या बेदरकारपणामुळे एका निष्पाप व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, ही मिनी बस पंढरपूरच्या दिशेने भरधाव वेगाने जात होती. यावेळी चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि अनियंत्रित झालेली ही मिनी बस थेट रस्त्याच्या डिव्हायडरला (Divider) जाऊन धडकली. अपघात झाला त्यावेळी, दोन व्यक्ती रस्ता ओलांडण्यासाठी म्हणून डिव्हायडरच्या बाजूला उभे होते. भरधाव बसने या दोघांनाही जोरदार धडक दिली. या धडकेमध्ये डिव्हायडरवर उभे असलेल्या दोघांपैकी एकाचा जागीच मृत्यू झाला. तर, दुसरा व्यक्ती चमत्कारिकरित्या बचावला. अपघाताचा हा संपूर्ण आणि काळजाचा ठोका चुकवणारा थरार सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. या अपघातामुळे महामार्गावरील सुरक्षिततेच्या नियमांचे उल्लंघन आणि चालकांच्या बेदरकार वृत्तीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >