धक्कादायक! खेळणे समजून उचलले आणि स्फोट झाला, पाकिस्तानमध्ये तीन मुलांचा मृत्यू

कराची: पाकिस्तानमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. सिंध प्रांतातील काश्मिरमध्ये रॉकेट स्फोटात तीन मुलांचा मृत्यू झाला आहे. ही मुलं ८ ते १२ वयाच्या दरम्यान होती. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना कंधकोट शहराजवळ एका शेतात खेळत होती. तेव्हा त्यांना जवळच्या शेतात सापडलेल्या रॉकेटसोबत ते खेळत असताना झालेल्या स्फोटात या मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणानंतर बॉम्ब निकामी पथकाकडून रॉकेटच्या तुकड्यांची तपासणी केली जात आहे.


पाकिस्तानमध्ये यापूर्वीही अशाच प्रकारच्या घटना घडल्या आहेत. अलिकडेच, खैबर पख्तूनख्वा या अशांत वायव्य प्रांतात, मुलांनी बॉम्बला खेळणे समजून त्याचा स्फोट झाला. या बॉम्बमध्ये दोन सख्ख्या भावांसह अनेक लहानग्यांचा मृत्यू झाला. तर बन्नूमधील वझीर उपविभागातील जानी खेल परिसरात मुले मदरशातून घरी परतत असताना मोर्टार शेलचा स्फोट झाला आणि यात अनेक लहानग्यांचा मृत्यू झाला होता.



मुलांनी ज्याला खेळणे समजले होते, ते तपासात स्फोटक यंत्रे असल्याचे निष्पन्न झाल्याच्या अनेक घटना आजवर घडल्या आहेत. अशा बहुतांश घटना वायव्य पाकिस्तानमध्ये नोंदवल्या गेल्या आहेत. १९८० च्या दशकात, सोव्हिएत सैन्याने त्यांच्या आक्रमणाला विरोध करणाऱ्या लोकांवर शस्त्र म्हणून वापरण्यासाठी शेजारच्या अफगाणिस्तानात असे मोर्टार शेल टाकले. हे मोर्टार शेल 'खेळण्यांसारखे' दिसतात. आता बऱ्याचदा मुले हे मोर्टार शेल 'खेळणी' समजून उचलतात आणि त्यांना जीव गमवावा लागतो.

Comments
Add Comment

भारताने मुरीदकेत हल्ला केला तर चूक काय? पाकिस्तानी मौलानांचा आर्मी चीफ मुनीरांना थेट सवाल

कराची : कराचीतील ल्यारी भागात बसून पाकिस्तानचे ज्येष्ठ धर्मगुरू आणि जमियत उलेमा-ए-इस्लाम (फजल)चे अध्यक्ष मौलाना

अमेरिकेतील नोकऱ्यांवर टांगती तलवार

एच१बी व्हिसाच्या नव्या नियमांमुळे शेकडो नागरिक अडकले भारतातच वॉशिग्टन : अमेरिकेत नोकरी करणारे शेकडो भारतीय एच१

बांगलादेशात रक्तरंजित राजकीय संघर्ष

आणखी एका हसीनाविरोधी नेत्याला घरात घुसून घातल्या गोळ्या बांग्लादेश : बांगलादेशमध्ये शेख हसीना विरोधी आणखी एका

बांगलादेशमध्ये उस्मान हादी पाठोपाठ मोहम्मद मोतालेब शिकदारची हत्या

ढाका : बांगलादेशमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वातील हंगामी

दक्षिण आफ्रिकेत गोळीबारात १० जण ठार

जोहान्सबर्ग : ऑस्ट्रेलियामध्ये बाँडी बीचवर बेछूट गोळीबार करण्याची घटना ताजी असतानाच आता दक्षिण आफ्रिकेतील

बांगलादेशातील चितगावमधील भारतीय व्हिसा सेवा अनिश्चित काळासाठी स्थगित

नवी दिल्ली (प्रतिनिधी): बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भारतीय व्हिसा अर्ज केंद्राने