अयोध्या : तब्बल ५०० वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अयोध्येत साकारलेल्या भव्य श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या इतिहासातील एक अत्यंत ऐतिहासिक क्षण आज (२५ नोव्हेंबर २०२५) अनुभवण्यास मिळणार आहे. कोट्यवधी रामभक्तांची श्रद्धा, संघर्ष आणि स्वप्नपूर्तीचे प्रतीक असलेला हा सोहळा अत्यंत महत्त्वाचा आहे. आज दुपारी मंदिराच्या शिखरावर 'भगवा ध्वज' फडकवला जाणार आहे. हा गौरवशाली ध्वजारोहण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते पार पडणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत हा सोहळा होत असल्याने याचे महत्त्व अधिक वाढले आहे. रामभक्तांच्या अनेक पिढ्यांनी पाहिलेले स्वप्न आज पूर्ण होत आहे. संघर्षानंतर भव्य स्वरूपात उभे राहिलेल्या या मंदिराच्या शिखरावर भगवा ध्वज फडकणे, हा केवळ धार्मिक सोहळा नसून, देशातील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक पुनरुत्थानाचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. संपूर्ण अयोध्या नगरी या ऐतिहासिक क्षणाची साक्षीदार होण्यासाठी सज-धज करून सज्ज झाली आहे.
View this post on Instagram
११ फूट रुंदी, २२ फूट लांबीचा ध्वज
आज अयोध्येत पार पडणाऱ्या ऐतिहासिक श्रीराम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण सोहळ्यासाठी संपूर्ण नगरीत जय्यत तयारी करण्यात आली आहे. हा सोहळा अनुभवण्यासाठी केवळ अयोध्येतच नव्हे, तर संपूर्ण देशभरात उत्सवाचे वातावरण आहे. आज दुपारी १२ ते १२.३० वाजेच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराच्या शिखरावर 'भगवा ध्वज' फडकवण्यात येणार आहे. या ध्वजारोहणाचे मुख्य आकर्षण असलेली रामध्वजा (Ramdhwaja) अत्यंत भव्य आणि खास वैशिष्ट्यांनी परिपूर्ण आहे. ध्वज भगव्या रंगाचा असून, तो ११ फूट रुंद आणि २२ फूट लांब आहे. जमिनीपासून या ध्वजाची एकूण उंची तब्बल १९१ फूट इतकी असेल, ज्यामुळे हा ध्वज दूरूनही भाविकांना सहज दिसेल. या ध्वजावर भगवान श्री रामांच्या शौर्याचे प्रतीक असलेले तेजस्वी सूर्य, तसेच कोविदार वृक्षाची प्रतिमा कोरलेली आहे. यासह, ध्वजावर 'ओम' हे पवित्र अक्षर लिहिलेले आहे. हा भव्य ध्वज आज जेव्हा मंदिराच्या शिखरावर फडकवला जाईल, तेव्हा ५०० वर्षांच्या प्रतीक्षेची ती पूर्तता असेल आणि कोट्यवधी रामभक्तांसाठी तो एक अविस्मरणीय क्षण ठरेल.
ध्वजारोहण समारंभाच्या तयारीचा घेतला आढावा अयोध्या : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ काल श्री राम जन्मभूमी मंदिरात ध्वजारोहण समारंभाच्या एक दिवस आधी ...
श्रीराम मंदिर ध्वजारोहण सोहळ्यासाठी देशभरातील दिग्गजांची मांदियाळी
या महत्त्वपूर्ण सोहळ्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह देशभरातील अनेक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील महत्त्वाचे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या दिग्गजांच्या उपस्थितीमुळे सोहळ्याचे महत्त्व अधिक वाढले आहे. देशाच्या विविध भागांतून भाविक मोठ्या संख्येने अयोध्या नगरीत दाखल होत असल्याने शहरात मोठा उत्साहाचे वातावरण आहे. या उत्साहाला चार चाँद लावण्यासाठी अयोध्या शहरातील अनेक भागांमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई (Lighting) करण्यात आली आहे, ज्यामुळे संपूर्ण शहर एका तेजोमय वातावरणात न्हाऊन निघाले आहे. भाविकांची प्रचंड गर्दी आणि सोहळ्याचे महत्त्व लक्षात घेऊन अयोध्या शहरात कडक पोलीस बंदोबस्त (Police Security) तैनात करण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन पूर्णपणे सतर्क असून, शहरातील प्रत्येक भागावर बारीक लक्ष ठेवले जात आहे.





