अयोध्या: अयोध्येतील राम मंदिरात आज ध्वजारोहण समारंभ होणार आहे. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशला भेट देणार आहेत. मोदींच्या हस्ते राम मंदिराच्या मुख्य कळसावर ध्वजारोहण करण्याचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी दुपारी १२:१० ते १२:३० पर्यंतचा शुभ मुहूर्त आहे. या शुभ मुहूर्तादरम्यान पंतप्रधान ध्वजारोहण करणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी मंदिर परिसरात पोहोचल्यानंतर प्रथम राम लल्ला आणि राम दरबाराला भेट देतील. त्यानंतर मंदिर संकुलात उपस्थित असलेल्या संत आणि भाविकांना भेटून त्यांच्याशी संवाद साधतील. संवाद साधल्यानंतर ध्वजारोहणाच्या शुभ मुहूर्तावर ध्वजारोहण करतील. ध्वजारोहणासाठी काढण्यात आलेल्या शुभ मुहूर्तादरम्यान या कार्यक्रमाला एकूण चार मिनिटे लागतील.
राम मंदिरावर फडकवण्यात येणाऱ्या ध्वजावर कोविदार वृक्ष, सूर्यवंश चिन्ह आणि ओम चिन्ह आहे. हा ध्वज फडकवण्यासाठी घेण्यात आलेल्या सरावात लष्कराची मदत देखील घेण्यात आली होती. हा ध्वज विद्युत प्रणालीने सुसज्ज असून पंतप्रधान मोदी बटण दाबून तो फडकवतील. या समारंभाच्या पार्श्वभूमीवर, अयोध्या परिसरात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
कर्नाटक: कर्नाटक काँग्रेसमधील सत्तावाटपाचा वाद पुन्हा एकदा तापला आहे. सत्तेत परतल्यानंतर २०२३ मध्ये, काँग्रेसच्या दोन्ही नेत्यांमध्ये एक सूत्र तयार ...
या समारंभासाठी राज्यात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सूचनेनुसार कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मोठा पोलिस दल आणि अनेक विशेष तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते फील्ड टीमपर्यंत समन्वित व्यवस्थापन सुनिश्चित करण्यात आले आहे.






