त्र्यंबकेश्वर (प्रतिनिधी) : कुंभमेळ्यासाठी जगभरातून लाखो-कोट्यवधी भाविक नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये येणार आहेत. त्यामुळे ही नगरी स्वच्छ, सुव्यवस्थित आणि पवित्र वाटेल अशी करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. मी येथे कोणावर टीका करायला आलेलो नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘विकास भी और विरासत भी’ हा मंत्र आम्हाला मार्गदर्शक आहे. विकास आणि संस्कृती या दोन्हीला समान महत्त्व देत आम्ही काम करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
कुंभमेळा पूर्वतयारी आणि त्र्यंबकेश्वर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथे झालेल्या सभेत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री गिरीश महाजन, ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी, बाळासाहेब सानप, माजी आमदार बबनराव घोलप, वैभव पिचड, माजी राज्यमंत्री भारती पवार, जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, भाजपा ओबीसी जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, त्र्यंबकेश्वर नगराध्यक्ष पदाचे भाजप उमेदवार कैलास घुले यांच्यासह त्र्यंबक व इगतपुरी येथील उमेदवार उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले की, गोदावरी, त्र्यंबकेश्वर आणि सनातन संस्कृतीच्या वैभवाची आठवण करून देत मतदारांनी विकासाच्या ध्येयाने एकत्र येण्याची गरज आहे. पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, सांडपाणी प्रकल्प, आरोग्य आणि शिक्षण अशा मूलभूत सुविधा मजबूत करण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले. कुंभमेळ्याच्या निमित्ताने सुरू केलेल्या प्रकल्पांचा लाभ नागरिकांना संपूर्ण वर्षभर मिळणार आहे.
आखाडा परिषदेचे महंत शंकरानंद सरस्वती, पालकमंत्री गिरीश महाजन, लक्ष्मण सावजी, माजी आमदार बबनराव घोलप, वैभव पिचड आणि माजी राज्यमंत्री भारती पवार यांनीही मनोगत व्यक्त केले.त्र्यंबकेश्वरमधील महंत गोरक्षनाथ, आखाड्याचे पीठाधीश्वर गणेशनाथ महाराज, निरंजनी आखाड्याचे धनंजयगिरी महाराज, भाजपा आध्यात्मिक आखाड्याचे महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती, निळपर्वतावरील महंत सचिव दीपक गिरी, पंचायती महानिर्वाण आखाड्याचे सचिव रमेशगिरी महाराज, श्रीराम शक्तीपीठाचे महंत सोमेश्वरानंद सरस्वती महाराज, तेजस ढेरगे, सुयोग वाडेकर, शिखरे बंधू, पंकज धारणे यांचीही उपस्थिती होती. सभा स्थळी पोलिसांनी चौख बंदोबस्त ठेवला होता.
कोणाचेही घर किंवा दुकान तोडणार नाही
त्र्यंबकेश्वरमध्ये २४ तास स्वच्छ पाणी उपलब्ध करून देणार असून उत्तम रस्ते आणि आरोग्यसेवा निर्माण करणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. विस्थापनाबाबत अफवा पसरवल्याचा आरोप करत त्यांनी सांगितले, “कुंभ किंवा विकास प्रकल्पांच्या नावाखाली कोणाचेही घर किंवा दुकान तोडले जाणार नाही. सर्वांना सोबत घेऊनच काम करणे हेच आमचे ब्रीदवाक्य आहे
LIVE | त्रिंबक नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाचे भाजपा उमेदवार कैलास घुले व सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा
🕝 दु. २.१५ वा. | २४-११-२०२५📍त्र्यंबकेश्वर, नाशिक.@BJP4Maharashtra#Maharashtra #Trimbakeshwar #NagarParishadSabha https://t.co/OrZoHuPRy5 — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 24, 2025






