Monday, November 24, 2025

आम्ही लाखो मशिदी उभारू, MIM चे असदुद्दीन ओवैसी फुत्कारले

आम्ही लाखो मशिदी उभारू, MIM चे असदुद्दीन ओवैसी फुत्कारले
नवी दिल्ली : जोपर्यंत हे जग आहे, जगाचं अस्तित्व आहे. तोपर्यंत मुसलमान राहणार. आम्ही लढत राहू. आम्ही लाखो मशिदी उभारू; असे एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी म्हणाले. त्यांनी जाहीर भाषणातून फुत्कारत निर्वाणीचा इशारा दिला. ओवैसींच्या या वक्तव्यामुळे पुन्हा धार्मिक तणाव निर्माण होण्याचा धोका वाढला आहे. मुसलमानांचे दमन कराल तर देश कमकुवत होईल, असा धोक्याचा इशारा त्यांनी जाहीर भाषणातून दिला. मुसलमानांकडे द्वेषाने बघाल आणि त्यांच्यावर अन्याय कराल तर देशाचा विकास कसा होईल ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मुसलमानांना दुय्यम दर्जाचे नागरिक करण्याचा विचार काही जण करत आहेत. त्यांनी हा विचार डोक्यातून काढून टाकावा. तुमच्या पिढ्या संपून जातील. पण आम्ही संपणार नाही. जोपर्यंत हे जग आहे, जगाचं अस्तित्व आहे. तोपर्यंत मुसलमान राहणार. आम्ही लढत राहू. आम्ही लाखो मशिदी उभारू; असे एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी म्हणाले. हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी मुसलमानांना मिळणाऱ्या वागणुकीबाबत चिंता व्यक्त केली. मुसलमानांवर अन्याय कराल तर परिणाम भोगाल, अशा स्वरुपाचा इशाराही त्यांनी दिला.  
Comments
Add Comment