Monday, November 24, 2025

मेट्रो शहरांमधील विषारी हवेने मुलांच्या डोळ्यांचे आरोग्य धोक्यात!

मेट्रो शहरांमधील विषारी हवेने  मुलांच्या डोळ्यांचे आरोग्य धोक्यात!

नवी दिल्ली : वायू प्रदूषण आता केवळ श्वसनाचा धोका राहिलेला नाही, तर लहान मुलांच्या आरोग्यावरही त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचे समोर आले आहे. लहान मुलांच्या डोळ्यांवर दिसणारे चष्म्याला मोबाइल फोन स्क्रीनचा अतिवापराला कारणीभूत ठरवले जाते. मात्र भारतातील प्रमुख महानगरांमध्ये (मेट्रो शहरांमध्ये) डॉक्टरांना मुलांमध्ये लहान मुलांमध्येही मायोपिया (जवळचे कमी दिसणे) समस्या आढळून येत आहेत. आता देशातील महानगरांमधील नेत्ररोग तज्ज्ञांनी खराब हवेमुळे हा विकार मुलांमध्ये वाढत असल्याचे स्पष्ट केले आहे.

दिल्ली-एनसीआर, हैदराबाद, बंगळूरु आणि इतर प्रदूषित महानगरांमध्ये नेत्ररोग तज्ज्ञांनी नोंदवले आहे की, मुलांमध्ये मायोपिया (जवळचे कमी दिसणे) पूर्वीपेक्षा खूप लवकर विकसित होत आहे. अशा मुलांच्या संख्येत होणारी वाढ ही काळजी वाढविणारी आहे. डोळ्यांसाठी हानिकारक असणारे हवेतील लहान कण, कमी झालेला दिवसाचा प्रकाश याचा शहरी मुलांच्या डोळ्यांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामाचाही अभ्यास केला जात आहे.

पूर्व आशियामध्ये मायोपियाने आधीच साथीचे रूप घेतले आहे. जागतिक आरोग्य संस्था यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, सध्याचे महानगरांधील हवेची गुणवत्ता अशीच खालावत राहिल्यास भारतही त्याच दिशेने जाऊ शकतो. जागतिक आरोग्य संस्थांचा अंदाज आहे की, २०५० पर्यंत जगातील अर्धी लोकसंख्या मायोपियाने ग्रस्त असेल. यासाठी पर्यावरणीय घटक मोठी भूमिका बजावतील. अभ्यासातून हे देखील दिसून आले आहे की, घराबाहेर घालवलेला कमी वेळ आणि नैसर्गिक प्रकाशाच्या संपर्कात कमी येणे, या दोन्ही गोष्टींवर वायू प्रदूषणाचा मोठा परिणाम होतो, ज्यामुळे लहान मुलांमध्ये लवकर मायोपिया होण्याचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो.

Comments
Add Comment