Monday, November 24, 2025

सुपरस्टार धरमपाजी गेले पण त्यांची संपत्ती व आर्थिक नियोजन माहिती आहे का? 'ही' आहे संपूर्ण माहिती

सुपरस्टार धरमपाजी गेले पण त्यांची संपत्ती व आर्थिक नियोजन माहिती आहे का? 'ही' आहे संपूर्ण माहिती

मोहित सोमण:बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते व सुपरस्टार धर्मेंद्र देओल यांची आज वयाच्या ८९ व्या वर्षी प्राणज्योत मालवली. त्यांनी केवळ बॉलीवूड अथवा फिल्म इंडस्ट्रीत अधिराज्य नाही तर आपली गुंतवणूकही सामर्थ्याने केली. आपल्या कमाईचे नियोजन उत्तम करून धर्मेंद्र देओल यांनी आपला 'वेल्थ' पोर्टफोलिओ उभा केला. पैशाचे उत्तम नियोजन, हजरजबाबी निर्णय, तसेच योग्य ठिकाणी दूरदृष्टीने गुंतवणूक या गुणांमुळे ते चित्रपटसृष्टीत ओळखले गेले. याच महिन्यात ८ तारखेला त्यांचा वाढदिवस ९० वा वाढदिवस होता. परंतु आजारपणाशी झुंज देताना ते ९० व्या वर्षात पदार्पण करू शकले नाहीत.

मात्र तुम्हाला कल्पना आहे? धर्मेंद्र देओल यांनी आपली संपत्ती कशी व्यवस्थापित केली?

आपल्या उतरत्या वयातही त्यांनी गरम धरम धाबा हॉटेलची २०१५ मध्ये घोषणा केली होती. त्यांनी मोठ्या प्रमाणात रियल इस्टेटमध्येही गुंतवणूक केली. विशेषतः १९९९ नंतर त्यांनी चित्रपटात कमी काम करण्यास सुरुवात केल्यानंतर त्यांनी वित्त व्यवस्थापनात अधिक महत्व दिले. २०२२ मध्ये धर्मेंद्र देओल यांनी 'ही मॅन' ची स्थापना केली. तसेच त्यांनी यापूर्वीच १०० एकरचे फार्म हाऊस लोणावळा येथे खरेदी केली होती. दस्तुरखुद्द महाराष्ट्रातच त्यांनी मिडिया अहवालातील माहितीनुसार, १७ कोटींची मालमत्ता खरेदी केली होती. त्यांनी काही हॉटेल व्यवस्थापकांशी भागीदारी करत ३० कॉटेजचा रिसोर्टही बांधला होता. एकूण १२ एकरचा हा भूखंड (Plot) असल्याचे सांगण्यात येते. उपलब्ध माहितीनुसार, व फोटो व आकडेवारीनुसार सुपरस्टार धर्मेंद्र यांना चारचाकी चालवण्याची व चारचाकीचे (कार कलेक्शन) करण्यासाठी आवाड होती. त्यांच्याकडे विंटेज फियाट, मर्सिडीज बेंझ SL 500, रेंज रोव्हर यांसारख्या अनेक गाड्या त्यांचा पोर्टफोलिओत होत्या. इतकेच नाही तर त्यांनी महाराष्ट्र शेती व विना शेती (Non Agricultural) भूखंड खरेदी केले होते. मिडिया रिपोर्ट नुसार त्यांचे वार्षिक अधिकृत उत्पन्न १२ कोटीपेक्षा अधिक होते. एकूण संपत्ती ३३५ कोटी होती व इतर मालमत्ता व मूल्यांकन (Miscellaneous Assets and Valuation) १३.२० कोटींची होती.

पंजाबमधील सामान्य कुटुंबात जन्म घेतल्यानंतर दिल मिल तेरा हम भी तेरे या १९६० सालच्या चित्रपटातून त्यांनी पदार्पण केले होते. यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. शोले (१९७५) मधून ते घराघरात पोहोचले.प्रतिभावान अभिनेत्री हेमा मालिनी सोबतची त्यांची ऑन-स्क्रीन जोडी एक लोकप्रिय चित्रपट बनली आणि राजा जानी, सीता और गीता, शराफत, नया जमाना यांचा अशे एकापाठोपाठ एक हिट चित्रपट त्यांनी दिले. १९८० च्या दशकातही त्यांनी चित्रपट निर्मितीमध्ये भरभराट केली व त्यातूनही उत्पन्न मिळवले.१९८३ मध्ये विजयता फिल्म्सची स्थापना केली आणि त्यांचा पुत्र सनी देओल यांना बेताब चित्रपटातून लाँच केले होते. शिवाय, त्यांनी १९९५ मध्ये बरसात या चित्रपटातून धाकटा मुलगा बॉबी देओल यांनाही यशस्वीरित्या लाँच केले, अभिनयातून ब्रेक घेतल्यानंतर, २००७ मध्ये धर्मेंद्रने सहाय्यक भूमिका साकारल्या विशेषतः त्यांनी आपल्या दोन्ही मुलांसोबत यमला पगला दिवाना, अपने या चित्रपटात देखील काम केले होते. धर्मेंद्रच्या चित्रपटांमध्ये गंभीरता, अ‍ॅक्शन, रोमँटिक कॉमेडीजमधी अदा लक्षात घेता अभिनेता म्हणून त्यांची अभिनयातील व्याती लोकांना दिसली.

उपलब्ध माहितीनुसार, प्रत्येक चित्रपटासाठी ते ५ कोटी रुपये मानधन घेत होते. आणि याव्यतिरिक्त, प्रत्येक ब्रँड एंडोर्समेंटसाठी त्यांना १ ते ३ कोटी रुपयांपर्यंत रक्कम मिळत होती. त्यांनी अनेक कार्यक्रमातही सहभाग घेतला तसेच टेलिव्हिजन जाहिरातींमध्ये सहभागी आहेत, विविध ब्रँडचे प्रमोशन करतात आणि परिणामी त्यांचे मासिक उत्पन्न १ कोटी रुपयांपेक्षा केवळ टेलिव्हिजनमधून मिळत होते.मुंबईतील राहत असलेल्या जूहू येथील निवासस्थानासह धर्मेंद्रकडे दोन निवासी मालमत्ता आहेत ज्याची किंमत ७.५० कोटी रुपये आणि दुसरी ३२ कोटी रुपये सांगितली जाते.

२०१५ ते २०२० दरम्यान, धर्मेंद्र यांना पाठदुखी, स्नायूंचा ताण आणि अशक्तपणा यासारख्या अनेक आरोग्य समस्यांचा सामना करावा लागला, ज्यामुळे कधीकधी रुग्णालयात दाखल करावे लागत असे. २०२५ मध्ये, धर्मेंद्र यांच्या डाव्या डोळ्याच्या कॉर्नियाला नुकसान झाल्यानंतर कॉर्नियल प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. ज्येष्ठ चित्रपट स्टार धर्मेंद्र यांचे सोमवारी सकाळी मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी अल्प आजाराने निधन झाले. श्रीराम राघवन यांचा बहुप्रतिक्षित युद्ध नाटक 'इक्किस' हा चित्रपट धर्मेंद्र यांचा मोठ्या पडद्यावर शेवटचा चित्रपट असेल. अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा अभिनीत हा हिंदी चित्रपट २५ डिसेंबर २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >