मोहित सोमण:आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळच्या सत्रात वाढ झाली आहे. आज सुरुवातीच्या कलात सेन्सेक्स १५६.८१ व निफ्टी ४६.३० अंकांने उसळला आहे. सेन्सेक्स बँक व बँक निफ्टीतही किरकोळ वाढ झाली आहे. मिडकॅप व स्मॉल कॅप शेअर्समध्येही किरकोळ वाढ झाल्याने एकूणच बाजारात वाढ झाली. प्रामुख्याने आज निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकातील आयटी शेअर्समध्ये मोठी वाढ झाली असून यासह युएस बाजारातील फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपातीवरील अपेक्षा नव्या वक्तव्यांमुळे आणखी वाढल्या असल्याने बाजारात किरकोळ रॅली झाली आहे.
सकाळच्या सत्रात सर्वाधिक वाढ श्याम मेटालिक्स (८.०९%), सफायर फूडस (३.९२%), केएसबी (३.४३%), रेंडिंगटन (३.१६%), बजाज होल्डिंग्स (२.२२%), ब्रिगेड एंटरप्राईजेस (२%), रिलायन्स पॉवर (१.९६%), इंटरग्लोब एव्हिऐशन (१.७२%), पेज इंडस्ट्रीज (१.५६%) समभागात सर्वाधिक वाढ झाली असून सर्वाधिक घसरण कॅपलिन पॉईंट लॅब्स (४.०७%) एजिस (३.०१%), अंबर एंटरप्राईजेस (२.३७%), हेक्सावेअर टेक्नॉलॉजी (२.१९%), फिनोलेक्स इंडस्ट्रीज (१.५०%), सारडा एनर्जी (१.८८%,), पिडिलाईट इंडस्ट्रीज (१.४३%) निर्देशांकात झाली आहे.
आजच्या बाजारपूर्व परिस्थितीवर भाष्य करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक रणनितीकार डॉ वी के विजयाकुमार म्हणाले आहेत की,' २०२४ च्या सप्टेंबरच्या उच्चांकी पातळीला तोडण्यासाठी निफ्टी आणि सेन्सेक्सचे मागील प्रयत्न यशस्वी झाले नाहीत कारण एफआयआयच्या विक्रीमुळे तेजी कमी झाली आणि अमेरिका-भारत व्यापार करार प्रत्यक्षात आला नाही. तसेच आर्थिक वर्ष २७ च्या उत्पन्न वाढीबाबत कोणतीही स्पष्टता नव्हती. आता हळूहळू नवीन विक्रमी उच्चांकाकडे जाण्याच्या बाजूने परिस्थिती बदलत आहे. या तेजीसाठी सर्वात महत्त्वाचा उत्प्रेरक मजबूत उत्पन्न वाढीमुळे येईल. आर्थिक वर्ष २७ मध्ये १५% पेक्षा जास्त उत्पन्न वाढ होण्याची शक्यता आहे. हा एक मजबूत मूलभूत आधार आहे. अमेरिका-भारत व्यापार करार कधीही होऊ शकतो. एआय व्यापारातील कमकुवतपणा एफआयआयना भारतात खरेदीदार बनवण्यास भाग पाडेल. गुंतवणूकदारांनी उच्च वाढीची क्षमता असलेल्या लार्जकॅप आणि दर्जेदार मिडकॅपवर लक्ष केंद्रित करावे. सर्वसाधारणपणे स्मॉलकॅप्सचे जास्त मूल्यमापन होत राहते.'






