मोहित सोमण: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळची किरकोळ वाढ दुपारपर्यंत घसरणीत बदलली आहे. होत्याचे नव्हते झाल्याने शेअर बाजारात आज मोठी घसरण झाली आहे. सेन्सेक्स ३३१.२१ अंकाने घसरत ८४९००.७१ व निफ्टी १०८.६१ अंकाने घसरत २५९५९.४० पातळीवर स्थिरावला आहे. आज सकाळी युएस बाजारातील फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात होईल या आश्वासकतेनुसार, आशियाई बाजारातील इतर बाजारांसह भारतीय बाजारात वाढ झाली मात्र अद्याप गुंतवणूकदारांना भूराजकीय परिस्थितीची अनिश्चितता व आयटी तेजीतील घसरण यामुळे अखेरच्या सत्रात मोठी पडझड झाली आहे. सकाळी किरकोळ वाढलेले बँक निर्देशांकात घसरणीत बदलल्याने आयटी, मिडस्मॉल आयटी टेलिकॉम वगळता इतर निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात घसरण झाली आहे. निफ्टी व्यापक निर्देशांकात नेक्स्ट ५० (०.४२%), मिडकॅप सिलेक्ट (०.८१%),स्मॉल कॅप १०० (०.८५%) या निर्देशांकात मोठी वाढ झाली असून निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात सर्वाधिक घसरण रिअल्टी (२.०५%), मेटल (१.२३%), मिडिया (०.५३%), केमिकल्स (१.३१%) या घसरण झाली. सकाळी आयटीत ०.५० ते १% वाढ झालेली असताना आयटी अखेरीस ०.४१% वाढीसह बंद झाला.खासकरून अस्थिरता निर्देशांक (Volatility Index VIX) २.८९% घसरला असतानाही शेअर बाजारात नकारात्मक भावना, घसरलेली परदेशी गुंतवणूक या गोष्टी वरचढ ठरल्याने बाजारातील रॅली रोखली गेली.
काल युएस बाजारात चांगली रॅली झाली होती. आज सुरूवातीच्या कलात अखेरच्या सत्रात एस अँड पी ५०० (०.८१%), एस अँड पी ५०० (०.९२%) बाजारात वाढ झाली आहे तर डाऊ जोन्स सपाट राहिला तर आशियाई बाजारातील अखेरच्या सत्रात गिफ्ट निफ्टी (०.३७%) सह निकेयी २२५ (२.४६%), सेट कंपोझिट (०.१३%), कोसपी (०.१९%) निर्देशांकात घसरण झाली असून सर्वाधिक वाढ हेंगसेंग (१.६९%), जकार्ता कंपोझिट (१.८२%), शांघाई कंपोझिट (०.०५%), स्ट्रेट टाईम्स (०.६१%) निर्देशांकात झाली आहे रशिया युक्रेन यांच्यातील तोडगा निघण्याची शक्यता असल्यानं युएस रशिया समिट होऊ शकते या भावनेतून कच्च्या तेलाच्या निर्देशांकात आज घसरण झाली असून कमोडिटी बाजारातील जागतिक सकारात्मक अस्थिरतेमुळे सोन्याचांदीच्या निर्देशांकातही आज घसरण झाली आहे. आज सुरूवातीच्या व्यवहारात डॉलरच्या तुलनेत रुपयाची विक्रमी ४९ पैशांनी वाढ झाली होती तो संध्याकाळपर्यंत घसरत ८९.२० रूपयांवर व्यवहार करत आहेत.
अखेरच्या सत्रात आज सर्वाधिक वाढ आयटीआय (९.३९%),ग्राविटा इंडिया (७.४९%),असाही इंडियन ग्लास (७.०५%), हनीवेल ऑटो (६.२४%), स्विगी (४.९७%), क्लीन सायन्स (४.१४%), रेल विकास (३.४६%), एनबीसीसी (३.४३%) समभागात झाली आहे तर अनंत राज (६.५०%), टीआरआयएल (५.६४%),डीसीएम श्रीराम (५.३०%), रिलायन्स पॉवर (४.६३%), नावा (४.४७%), बीईएमएल लिमिटेड (४.२१%), सम्मान कॅपिटल (४.१७%), सीजी पॉवर (३.८३%) समभागात झाली आहे.
आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले आहेत की,'रेंज-बाउंड पॉझिटिव्ह सत्रानंतर, सोमवारच्या समाप्तीनंतर, निफ्टी५० निर्देशांक २६००० च्या प्रमुख मर्यादेच्या वर टिकू शकले नाहीत म्हणून, बाजार गेल्या अर्ध्या तासात घसरणीसह बंद झाला. अंतरिम अमेरिका-भारत व्यापार कराराला अंतिम स्वरूप देण्यात येणाऱ्या विलंबासारख्या महत्त्वाच्या घटनांच्या जोखमीच्या अपेक्षेने गुंतवणूकदारांची भावना सावध राहिली. तरीही, आयटी समभागांमध्ये निवडक खरेदीने काही आधार दिला. एक उज्ज्वल बाब म्हणजे, जागतिक बाजारपेठा आशावादी आहेत, डिसेंबरमध्ये फेड दर कपातीच्या नूतनीकरणाच्या अपेक्षांमुळे, यूएस रोजगार डेटाला नकारात्मक जोखीम निर्माण झाल्यामुळे. स्थानिक पातळीवर, जीडीपी वाढ, नियंत्रित महागाई, स्थिर तेलाच्या किमती आणि मजबूत एच२ कमाईचा दृष्टीकोन यासह अनुकूल मॅक्रो निर्देशकांनी बाजार स्थिरतेत योगदान दिले आहे.'
आजच्या बाजारातील रूपयावर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले आहेत की,'शुक्रवारच्या घसरणीनंतर रुपयाने दिवसाची सुरुवात ८९.२० वर जोरदार वाढ करून केली. शुक्रवारी ८९.६५ च्या जवळील सर्वकालीन नीचांकी पातळीवर पोहोचल्यानंतर रुपयाने ०.३५ रुपये किंवा ०.३९% वाढ नोंदवली. गेल्या आठवड्यात झालेल्या घसरणीचे मुख्य कारण भारत-अमेरिका व्यापार करारातील विलंब, प्रगतीबाबत कोणतेही ठोस अपडेट नसणे,वाढत्या अमेरिकन डॉलर निर्देशांक आणि खालच्या पातळीवर दृश्यमान हस्तक्षेपाचा अभाव हे होते. आजच्या तेजीनंतरही, व्यापक कल कमकुवत दिसत आहे आणि नजीकच्या काळात रुपया ८८.७५-८९.५० च्या अस्थिर श्रेणीत व्यापार करेल अशी अपेक्षा आहे.'
आजच्या बाजारातील बँक निफ्टी पोझिशनवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे तांत्रिक विश्लेषक वत्सल भुवा म्हणाले आहेत की,'ताशी चार्टवर, निर्देशांकाने खालचा वरचा भाग बनवला आहे, जो त्याच्या ५० ईएमए (EMA) च्या खाली बंद झाला आहे आणि आर एस आय (Relative Strength Index RSI) मंदीच्या क्रॉसओवरमध्ये आहे, जो कमकुवत गती दर्शवितो. दैनिक चार्टवर, निर्देशांक शुक्रवारीच्या नीचांकी पातळीवर बंद झाला, जो त्याच्या २० दिवसांच्या ईएमए (Exponential Moving Average EMA) पातळीच्या ५८३०० पातळीच्या आसपास असलेल्या दिशेने संभाव्य रिट्रेसमेंट दर्शवितो. म्हणूनच, सध्याच्या पातळीवर सावधगिरी बाळगली पाहिजे. बँक निफ्टी बंद आधारावर ५९३०० पातळी पुन्हा मिळवेपर्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे.'






