मोहित सोमण: एसएसएमडी ॲग्रोटेक इंडिया लिमिटेड (House of Manohar) कंपनीचा आयपीओ उद्यापासून बाजारात दाखल होत आहे. ३४ कोटींच्या आयपीओसाठी प्राईज बँड ११४ ते १२१ रूपये प्रति शेअर निश्चित करण्यात आला आहे. उद्या २५ ते २७ नोव्हेंबरपर्यंत हा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी खुला असणार आहे. माहितीनुसार, ०.२८ कोटी इक्विटी शेअरचा संपूर्णपणे फ्रेश इशू असून ३४.०९ कोटी रूपये इतके या शेअरचे मूल्यांकन असेल. किरकोळ गुंतवणूकदारांना किमान २००० शेअर घेणे अनिवार्य करण्यात आले आहे म्हणजेच किरकोळ (Retail) गुंतवणूकदारांना किमान २४२००० रूपयांची गुंतवणूक अनिवार्य करण्यात आली आहे. 3Dimension Capital Services Limited हे कंपनीचे बुक लिडिंग मॅनेजर म्हणून काम करणार असून BigShare Services Private Limited आयपीओसाठी रजिस्ट्रार म्हणून काम करणार आहे. एकूण विक्रीसाठी इशू साईज २७१७००० शेअर असणार आहेत तर मार्केट मेकरसाठी त्यातील १५६००० शेअर राखीव असणार आहेत. मार्केट मेकर म्हणून निकुंज स्टॉक ब्रोकर लिमिटेड काम करणार आहे.
पात्र ठरलेल्या गुंतवणूकदारांना आयपीओचे वाटप (Allotment) २८ नोव्हेंबरला होणार असून आयपीओचे लिस्टिंग २ डिसेंबरला बीएसई एसएमईवर अपेक्षित आहे. एकूण गुंतवणूकपैकी ५.५४% वाटा मार्केट मेकरसाठी, ०.९६% वाटा पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (Qualified Institutional Buyers QIB), विना संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (Non Institutional Investors NII) ४६.७५%, किरकोळ गुंतवणूकदारांसाठी ४६.७५% वाटा गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असेल. इशू मुंजाल, सुरभी मुजाल, जय गोपाल मुंजाल हे कंपनीचे प्रवर्तक (Promoter) आहेत.
मुख्य स्वरूपात कंपनी हाऊस ऑफ मनोहर (HOM) ची सुरुवात सुरुवातीला मनोहर लाल जयगोपाल अॅग्रो इंडस्ट्रीज आणि एस.एस. अॅग्रो इंडिया या दोन स्वतंत्र मालकी कंपन्यांपासून झाली होती नंतर त्यांचे विलीनीकरण (Merger) श्री धनलक्ष्मी फ्लोअर मिल्स प्रायव्हेट लिमिटेड असे झाले होते नंतर त्यांचे नाव बदलून एसएसएमडी अॅग्रोटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड असे ठेवण्यात आले.
एसएसएमडी अॅग्रोटेक इंडिया लिमिटेड उच्च दर्जाच्या कृषी-अन्न धान्य उत्पादनांच्या विस्तृत श्रेणीचे उत्पादन, व्यापार आणि रिर्पॅकिंगमध्ये गुंतलेली आहे. कंपनी चार या चार मनोहर अॅग्रो, सुपर एस.एस., दिल्ली स्पेशल, श्री धनलक्ष्मी ब्रँडिंग अंतर्गत कंपनी काम करते. कंपनीचे उत्पादना व्यतिरिक्त वितरण विक्रीसाठी मोठे नेटवर्क दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश या प्रदेशात पसरलेले आहे. कंपनी D2C (Direct to Consumer) आपल्या छोट्या उत्पादन निर्मिती प्रकल्पासह सेवाही पुरवते.
उत्पादन पोर्टफोलिओमध्ये अथवा प्रोडक्ट लाईनमध्ये पफ्ड राईस, रामदाणा (चोळई), बेसन, मटर पीठ, चणा डाळ, इडली रवा, तांदळाची पावडर आणि चणा डाळीचे यासह इतर उत्पादनांचा समावेश आहे. आकडेवारीनुसार, कंपनीच्या महसूलात इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) यंदा ३५% अधिक महसूल मिळाला असून कंपनीच्या करोत्तर नफ्यात (Profit after tax PAT) मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर ३८८% वाढ झाली आहे. तिमाही बेसिसवर कंपनीच्या करोत्तर नफ्यात ५.३८ कोटींवरून ३.८४ कोटींवर घसरण झाली आहे. तर तिमाही बेसिसवर ईबीटा (EBITDA) ८.४७ कोटीवरून ५.७९ कोटीवर घसरला आहे. तर कंपनीच्या उत्पन्नातही तिमाही बेसिसवर ९९.१८ कोटीवरून ५५.१३ कोटींवर घसरण झाली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार या आयपीओतील मिळणाऱ्या निधीचा वापर कंपनी खेळत्या भांडवलासाठी (Working Capital Requirements), थकबाकी चुकती करण्यासाठी, भांडवली खर्चासाठी, नव्या अधिग्रहणासाठी, दैनंदिन कामकाजासाठी करणार आहे.
गुंतवणूकदारांनी हा आयपीओ सबस्क्राईब करावा का?
ज्येष्ठ पत्रकार व आयपीओतज्ज्ञ दिलीप दावडा आपल्या पुनरावलोकनात म्हणतात,'सेल ही कृषी अन्न उत्पादनांच्या विस्तृत श्रेणीचे उत्पादन, व्यापार आणि पुनर्पॅकिंगमध्ये गुंतलेली आहे. ती मनोहर अॅग्रो, सुपर एस एस, दिल्ली स्पेशल आणि श्री धनलक्ष्मी या ब्रँड नावाखाली तिच्या उत्पादनांचे मार्केटिंग करत आहे. कंपनीने अहवाल दिलेल्या कालावधीत तिच्या टॉप आणि बॉटम लाईन्समध्ये वाढ नोंदवली आहे, परंतु आर्थिक वर्ष २०२५ पासून बॉटम लाईन्समध्ये अचानक वाढ झाल्याने सर्वांचे लक्ष वेधले जात आहे. ती अत्यंत स्पर्धात्मक आणि विखंडित, तसेच उच्च व्हॉल्यूम -कमी मार्जिन विभागात कार्यरत आहे. आयपीओ नंतरचा लहान इक्विटी बेस देखील स्थलांतरासाठी दीर्घ कालावधीचा गर्भावस्था दर्शवितो. सरासरी लीड मॅनेजरकडून हा महागडा आणि गुंतागुंतीचा इशू (IPO) गुंतवणूक वगळण्यात काहीही नुकसान नाही'
कंपनीचे सध्याचे बाजार भांडवल (Market Capitalisation) १०८.४६ क़ोटी रूपये असून सध्या आयपीओपूर्व ग्रे बाजारात समभागाची (Shares) किंमत रुपये आहे.






