Monday, November 24, 2025

फुटबॉल मॅचेससाठी घरातून निघाला पालघरात मृतावस्थेत सापडला; मुंबईच्या अंडर-१६ खेळाडूचा रहस्यमय मृत्यू

फुटबॉल मॅचेससाठी घरातून निघाला पालघरात मृतावस्थेत सापडला; मुंबईच्या अंडर-१६ खेळाडूचा रहस्यमय मृत्यू

पालघर : मुंबईजवळील पालघर परिसरात एका फुटबॉल खेळाडूचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ‘पुण्याला मॅचेस खेळायला जात आहे’ असे सांगून घराबाहेर पडलेला हा तरुण दोन दिवसांनी घनदाट जंगलात मृतावस्थेत सापडला. या घटनेमुळे क्रीडा क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

मृत तरुणाचे नाव सागर सोरती असे असून त्याने मुंबईच्या अंडर-१६  फुटबॉल संघात आपल्या खेळाची छाप सोडलेला उदयोन्मुख खेळाडू होता. १५ नोव्हेंबर रोजी घरातून बाहेर पडल्यापासून १६ नोव्हेंबरपासून त्याचा कुटुंबीयांशी कोणताही संपर्क नव्हता. आपल्या मुलाने २ दिवस काही संपर्क न केल्याने कुटुंबीयांनी शोधमोहीम सुरू केली, तेव्हा १८ नोव्हेंबर रोजी पालघर जिल्ह्यातील कासा पोलिसांना मेंढवण खिंडच्या जंगलात एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत तरुणाचा मृतदेह आढळला. एका उदयोन्मुख खेळाडूचा मृतदेह पालघर जिल्ह्यात संशयास्पद अवस्थेत आढळल्याने मोठी खळबळ उडाली. घटनास्थळी सापडलेल्या मोबाईलच्या आधारे पोलिसांनी ओळख पटवली.

या प्रकरणाची नोंद घेऊन कासा पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सागरच्या मृत्यूमागचे कारण अजून स्पष्ट झाले नसून विविध अंगांनी तपास सुरू आहे. एका उज्ज्वल भविष्य असलेल्या खेळाडूचा असा अंत झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा