भारताच्या मुलींनी सलग दुसर्‍यांदा जिंकला कबड्डी वर्ल्डकप

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नोव्हेंबरचा महिना भारतीय महिला खेळाडू गाजवताना दिसत आहेत. २ नोव्हेंबर रोजी हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वातील भारतीय महिला क्रिकेट संघाने वनडे वर्ल्ड कप २०२५ स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर २३ नोव्हेंबर रोजी भारतीय महिला क्रिकेट संघाने पहिला अंध महिला टी२० वर्ल्ड कप २०२५ जिंकला. त्यानंतर आता कबड्डीमध्ये भारतीय महिलांनी भारताचा तिरंगा अभिमानाने फडकावला आहे. भारतीय महिला कबड्डी संघाने सोमवारी (२४ नोव्हेंबर) सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकला.

ढाकामध्ये झालेल्या महिला कबड्डी वर्ल्ड कप २०२५ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने चीनी तैपेई संघाला पराभूत केले. भारताने चीनी तैपेई संघाला ३५-२८ अशा फरकाने मात देत वर्ल्ड कपवर नाव कोरले. भारतीय महिला संघाच्या या विजयानंतर सध्या त्यांचे देशभरातून कौतुक होत आहे. अंतिम सामन्यात दोन्ही संघांनी चांगली झुंज दिली होती. सुरुवातीला चीनी तैपेईने भारताच्या बचावाला आव्हान दिले होते. पण भारतीय बचावपटूंनी चांगले टॅकल केले. तसेच चढाईपटूंनीही मोक्याच्या क्षणी पाँइंट्स मिळवले.

पहिल्या हाफमध्ये सामना चुरशीचा सुरू असतानाच शेवटचे काही क्षण उरले असताना संजू देवीने केलेल्या सुपर रेडने सामन्याला कलाटणी दिली. भारताने तिथून मिळवलेली लय कायम ठेवली. त्यामुळे भारतीय महिला संघाला विजेतेपद जिंकणे सहज सोपे गेले. मात्र या सामन्यात भारताची कर्णधार रितू नेगी टॅकल करताना दुखापतग्रस्त झाली होती. पण भारतीय संघाने हार न मानता तिच्या अनुपस्थिततही उर्वरित सामन्यात चांगला खेळ केला.

भारतीय संघ या संपूर्ण स्पर्धेत अपराजित
या स्पर्धेत ११ संघ सहभागी झाले होते. भारताने साखळी फेरीतही चारही सामने जिंकले होते. त्यानंतर उपांत्य फेरीत इराणला ३३-२१ अशा फरकाने पराभूत करत अंतिम सामना गाठला होता. चीनी तैपेई संघाने उपांत्य फेरीत यजमान बांगलादेश संघाला २५-१८ अशा फरकाने पराभूत करत अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. दरम्यान भारतीय संघ अंतिम सामनाही जिंकून या संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिला आहे. भारतीय महिला कबड्डी संघाचे हे २०२५ वर्षातील तिसरे मोठे विजेतेपद आहे. भारतीय संघाने मार्चमध्ये आशियाई महिला कबड्डी चॅम्पियनशीप स्पर्धाही जिंकली होती.
Comments
Add Comment

IPL 2026: लखनौचा कमबॅक, KKR अजूनही पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत

मुंबई : आयपीएल २०२६ मधील रंगतदार सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने कोलकाता नाईट रायडर्सवर 3 विकेटने या सामन्याला रंग

IPL 2026 : सामना न खेळणाऱ्या खेळाडूंसाठी बीसीसीआयने जाहीर केली नवीन नियमावली; नियमांचे पालन न केल्यास होणार कारवाई

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच बीसीसीआयने आयपीएलसाठी अनेक कठोर नियम लागू केले आहेत. या नवीन

Bangladesh Cricket Board : अखेर बांगलादेश नरमला; बांग्लादेश क्रिकेट बोर्डाकडून भारताला आमंत्रण

बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) (Bangladesh Cricket Board) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसी) पत्र लिहून कळवले आहे की,

IPL 2026 Sunil Gavaskar : सुनील गावस्करांची अनफिट क्रिकेटपटूंवर टीका

मुंबई : भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी पुन्

IPL 2026 : गुवाहाटीवर पावसाचे सावट! MI vs RR थरार रंगणार की सामना होणार रद्द?

IPL 2026: मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स आज आमनेसामने; विजयासाठी दोन्ही संघ सज्ज

मुंबई : आयपीएल 2026 मधील आजचा सामना क्रिकेटप्रेमींसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स