Sunday, November 23, 2025

ऐतिहासिक! नव्या सरन्यायाधीशांच्या शपथविधीला ब्राझीलसह सात देशांचे मुख्य न्यायमूर्ती राहणार उपस्थित

ऐतिहासिक! नव्या सरन्यायाधीशांच्या शपथविधीला ब्राझीलसह सात देशांचे मुख्य न्यायमूर्ती राहणार उपस्थित

नवी दिल्ली: भारताचे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत आज शपथ घेणार आहेत. भारताच्या ५३व्या न्यायमूर्तींचा शपथविधी राष्ट्रपती भवनात होणार आहे. सरन्यायाधीशांच्या शपथ समारंभाबाबात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ब्राझीलसह सात देशांचे मुख्य न्यायाधीश आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उपस्थित राहणार आहेत. ज्यात भूतान, केनिया, मलेशिया, मॉरिशस, नेपाळ आणि श्रीलंकेचे समावेश आहे.

भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या सरन्यायाधीशाच्या शपथविधी समारंभाला इतर देशांचे न्यायिक शिष्टमंडळ उपस्थित राहणार असल्याचा प्रकार घडणार आहे. ब्राझील, भूतान, केनिया, मलेशिया, मॉरिशस, नेपाळ आणि श्रीलंका देशातील मुख्य न्यायाधीश आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आपल्या कुंटुंबियांसोबत हजेरी लावणार आहेत.

राष्ट्रपती भवनात होणाऱ्या शपथविधी समारंभासाठी अनेकांना निमंत्रणे देण्यात आली आहेत. ज्यात न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या संपूर्ण कुटुंबाला निमंत्रण देण्यात आले आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या पत्नी आणि दोन मुली शपथविधीला उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे. तर सूर्यकांत यांचे त्यांचे तीन भाऊ ऋषिकांत, शिवकांत आणि देवकांत यांनाही या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.

दरम्यान  न्यायाधीश सूर्यकांत यांनी अनेक घटनात्मक खंडपीठांवर काम केले आहे. आजपर्यंत त्यांनी घटनात्मक, मानवी हक्क आणि प्रशासकीय कायद्याशी संबंधित एक हजारहून अधिक निर्णय घेतले आहेत. त्यांच्या प्रमुख निर्णयांमध्ये ३७० रद्द करण्याचा निर्णय कायम ठेवणे समाविष्ट आहे. तसेच सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनसह सर्व बार असोसिएशनमधील एक तृतीयांश जागा महिलांसाठी राखीव ठेवण्याचे निर्देश देण्याचे श्रेय देखील न्यायमूर्ती सूर्यकांत यांना जाते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा