Monday, November 24, 2025

१ शेअरवर मिळवा २४ शेअर फ्री 'या' कंपनीकडून बोनस इशूसाठी ५ डिसेंबर अंतिम तारीख

१ शेअरवर मिळवा २४ शेअर फ्री 'या' कंपनीकडून बोनस इशूसाठी ५ डिसेंबर अंतिम तारीख

मोहित सोमण:एपिस इंडिया या बीएसईवरील सूचीबद्ध (Listed) असलेल्या शेअरने गुंतवणूकदारांसाठी धमाल गिफ्ट आणले आहे. एक शेअर खरेदी केल्यास २४ शेअर बोनस मिळणार आहेत. २४:१ या गुणोत्तरात हे शेअर मिळणार आहेत असे कंपनीने आपल्या एक्सचेंज निवेदनात म्हटले आहे. १० रूपये दर्शनी मूल्य (Face Value) असलेल्या शेअरची अंतिम नोंदणी दिनांक (रेकॉर्ड डेट) ५ डिसेंबर असणार आहे. त्यामुळे ५ तारखे आधी शेअर खरेदी करणाऱ्या गुंतवणूकदारांना या ऑफरचा लाभ होणार आहे. एपिस इंडियाने ही संबंधित माहिती घोषित करुन हे शेअर पूर्णपणे पेडअप (Fullly Paid) शेअर असतील असेही यावेळी स्पष्ट केले आहे.

यापूर्वी कंपनीने डिसेंबर २०१० मध्ये ३२३: १०० प्रमाणात बोनस शेअर इशू जाहीर केला होता. कंपनी प्रामुख्याने मधाचे उत्पादन करते त्याशिवाय इतर खजूर, चहाळ जाम, व संबंधित एफएमसीजी उत्पादने कंपनी बाजारात आणते. कंपनीने गेल्या आठवड्यात ५% वाढ नोंदवली असून गेल्या महिनाभरात कंपनीने २१.५४% वाढ नोंदवली आहे. तर संपूर्ण एक वर्षात ३११.१२% परतावा कंपनीने गुंतवणूकदारांना दिला आहे. दरम्यान कंपनीचे सध्याचे बाजार भांडवल (Market Capitalisation) ६०४.९० कोटी रूपये आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये ५२ आठवड्यातील सर्वाधिक वाढ (All time High) १०९७.९० रूपयावर नोंदवली गेली असून ५२ आठवड्यातील सर्वाधिक घसरण (All time Low) २८०.४० रूपये प्रति शेअरवर नोंदवली गेली आहे. कंपनीला इयर ऑन इयर बेसिसवर सप्टेंबर तिमाहीत १९.६७% अधिक महसूल मिळाला होता तर कंपनीच्या नफ्यात तिमाही बेसिसवर ५.५१% वाढ नोंदवली होती.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >