कोकणातली निवडणूक...!

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हटल्या की, साहजिकच त्या निवडणुका गाव असो की, शहर त्या-त्या भागातील कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाच्या आहेत. त्यातच मधल्या सात-आठ वर्षांनंतर या निवडणुका होत आहेत. निवडणुका लढवण्यासाठी काही ठिकाणी एकापेक्षा अधिक इच्छुक उमेदवार असणार आहेत. सत्ताधारी पक्षात इच्छुकांची संख्या ही नेहमीच मोठी असते. तशी ती संख्या या निवडणुकीतही असलेली पाहायला मिळते. यातूनच मग निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्यांना उमेदवारी मिळाली नाही की साहजिकच इच्छुकांबरोबरच नाराजांची संख्याही मोठी असते. कोकणातही सर्वच पक्षांमध्ये जसे इच्छुक आहेत तसे नगरसेवक पदाची उमेदवारी मिळाली नाही यासाठी नाराजही आहेत. महाराष्ट्रात कोकणाच राजकारण नेहमीच फारच वेगळ असत...


महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अर्ज भरणे, उमेदवारी अर्ज मागे घेणे, छाननी अशा निवडणुकीतील सर्व प्रक्रिया पार पडत आहेत. राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यात कोणत्या राजकीय पक्षाने दुसऱ्या कोणत्या राजकीय पक्षाशी कधी कसा घरोबा केला हे खरं तर कोणालाच कळलेले नाही, असे राज्यातील चित्र आहे. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका म्हटल्या की, साहजिकच त्या निवडणुका गाव असो की शहर त्या-त्या भागातील कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाच्या आहेत. त्यातच मधल्या सात-आठ वर्षांनंतर या निवडणुका होत आहेत. निवडणुका लढवण्यासाठी काही ठिकाणी एकापेक्षा अधिक इच्छुक उमेदवार असणार आहेत. सत्ताधारी पक्षात इच्छुकांची संख्या ही नेहमीच मोठी असते. तशी ती संख्या या निवडणुकीतही असलेली पाहायला मिळते. यातूनच मग निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्यांना उमेदवारी मिळाली नाही की साहजिकच इच्छुकांबरोबरच नाराजांची संख्याही मोठी असते. कोकणातही सर्वच पक्षांमध्ये जसे इच्छुक आहेत तसे नगरसेवक पदाची उमेदवारी मिळाली नाही यासाठी नाराजही आहेत. महाराष्ट्रात कोकणाच राजकारण नेहमीच फारच वेगळ असत. कोकणामध्ये निवडणूक कोणतीही मग ती ग्रामपंचायत असो की लोकसभेची निवडणूक असली तरीही कोकणच्या राजकारणात केंद्रस्थानी राणेच असतात. कोकणाच्या राजकीय इतिहासाची मांडणी करताना १९९० पर्यंत मागे गेल्यास १९९० पासूनच्या सर्वच निवडणुका या माजी केंद्रीय मंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांच्या नावाभोवतीच फिरत राहिल्या आहेत.


कोकणातील यावेळच्या निवडणुकांमध्ये रायगडमध्ये महायुतीत वेगळी राजकीय मांडणी झाली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यामध्ये विस्तव जात नाही अशी स्थिती आहे. राष्ट्रावादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, अदिती तटकरे आणि शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरतशेठ गोगावले आणि चार आमदार असा कधी उघड तर बऱ्याचवेळा सुप्त संघर्ष रायगडच्या राजकारणात राहिला आहे. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत महायुतीतील शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट एकत्र येण्याची शक्यता नव्हती. त्यामुळे रायगडचं राजकारण नेहमीप्रमाणेच तापलेलं राहिलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात महाविकास आघाडीत फूट पडलेली दिसते. रत्नागिरी जिल्ह्यातील चार नगर परिषदा व तीन नगर पंचायतीच्या निवडणुका होत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात महायुती झाली आहे. शिवसेना शिंदे गट आणि भाजपा अशी महायुती झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, राजापूर, चिपळूण, खेड या फार जुन्या असलेल्या नगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत. रत्नागिरी नगर परिषदेत शिवसेना शिंदे गट व भाजप अशी युती झाली आहे, तर रत्नागिरी नगर परिषदेत उबाठाकडून निवडणूक प्रतिष्ठेची करण्याचा प्रयत्न झाला आहे. देवरूख, गुहागर आणि लांजा या नगरपंचायतीची निवडणूक होत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड नगरपालिका निवडणुकीत भाजप वैभव खेडेकर आणि माजी मंत्री रामदास कदम व मंत्री योगेश कदम यांनी एकत्र येत महायुतीतून ही निवडणूक लढवली जात आहे. राजापूर नगर परिषद निवडणुकीत माजी आमदार हुस्नबानू खलिपे काँग्रेसतर्फे निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत, तर चिपळूण नगर परिषदेच्या निवडणुकीत चिपळूणचे माजी आमदार, माजी नगराध्यक्ष रमेश कदम हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. चिपळूणमध्ये आ. भास्कर जाधव रमेश कदम यांच्या सोबत आहेत. रत्नागिरी नगर परिषदेत शिवसेना भाजपा महायुती, उबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशी लढत रत्नागिरीत पाहायला मिळणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात देवरूख आणि गुहागर या नगरपंचायती नगराध्यक्ष भाजपला देण्यात आले, तर लांजा नगरपंचायत आणि राजापूर, रत्नागिरी, चिपळूण या नगर परिषदा भाजपने महायुतीतील शिंदे सेनेला दिल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी, वेंगुर्ले आणि मालवण या फार फार जुन्या असलेल्या नगर परिषद आहेत, तर कणकवली नगर पंचायतीची निवडणूक होत आहे. सावंतवाडीतील राजघराण्यांच्या स्नुषा श्रद्धाराजे भोसले निवडणूक रिंगणात आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीतील घटक पक्ष तसेच महाविकास आघाडीतील घटकपक्ष जिल्ह्यात स्वतंत्र निवडणुकीला सामोरे जात आहेत.


महायुतीतील भारतीय जनता पक्ष शिवसेना शिंदे गट या तर्फे निवडणूक लढविली जात आहे. तर महाविकास आघाडीतील काँग्रेस घटक पक्षाने या निवडणुकीत स्वबळाचा नारा देत निवडणूक रिंगणात उतरले आहेत. तर उबाठाकडून कणकवलीत शहर विकास आघाडीत, आणि मालवण, सावंतवाडी, वेंगुर्लेत स्वतंत्र निवडणूक लढवत आहेत. कोकणात निवडणुकीत नेहमीप्रमाणेच कणकवली नगरपंचायत निवडणूक चर्चेच्या केंद्रस्थानी राहिली आहे. यावेळच्या निवडणुकीत ‘राजकारणामध्ये दीर्घकाळ कोणीही कोणाचा मित्र नसतो आणि राजकारणात दीर्घकाळ कोणी कोणाचा शत्रू नसतो’ हे पुन्हा एकदा या निवडणुकीच्या निमित्ताने अधोरेखित केले आहे. सिंधुदुर्गात भाजपच्या प्रचाराची आघाडी सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे सांभाळत आहेत, तर शिवसेना शिंदे गटाकडून माजी मंत्री आ. दीपक केसरकर, मालवण-कुडाळचे आ. निलेश राणे पाहत आहेत. कोकणातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पुन्हा एकदा चर्चेत आणि लक्षवेधी ठरत आहेत हे आजचे चित्र पुढील आठवड्यात हे चित्र अधिक गडद होईल. जिल्हापरीषद, पंचायत समिती निवडणुकीत त्याचे पदर अजूनही उलगडले जातील.


- संतोष वायंगणकर

Comments
Add Comment

पर्यटनातून कोकणच्या अर्थकारणाला गती

- रवींद्र तांबे कोकण आणि पर्यटन यांचे एक अतूट असे नाते आहे. येथील ऐतिहासिक गड-किल्ले आणि तेवढेच विलोभनीय

नगरपरिषद निवडणुकांनी विदर्भात घुसळण

अविनाश पाठक विदर्भातील ८० नगर परिषदा आणि २० नगरपंचायत यांच्यातील निवडणुका जाहीर होऊन आता काळ पुढे सरकला आहे.

नाशिकमध्ये आघाडी आणि युतीतही खो!

जिल्ह्यात महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्ष आमने-सामने आले आहेत. भाजप पाच ठिकाणी स्वतंत्र निवडणूक लढवत आहे.

मृत्यू इथले संपत नाही

पुणे शहरातील वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला पुणे-बंगळूरु महामार्गावरील नवले पुलाचा परिसर गेली अनेक

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला वाघाचा आधार लाभला!

चांदोलीच्या जंगलात तीन वाघ कॅमेऱ्यात कैद झाले तरी त्यांचे वास्तव्य येथे नाही या सत्यावर उपाय शोधत

कार्यकर्त्यांची निवडणूक

स्थानिक स्वराज्यसंस्थेची ही निवडणूक कोणत्याही राजकीय पक्षाची जशी त्याच्या अस्तित्वाची आहे. तशी ही निवडणूक