Monday, November 24, 2025

Coforge Update: कोफोर्ज कंपनीकडून अत्याधुनिक Forge-X व्यासपीठाची घोषणा यातून आयटीतील 'हे' मोठे पाऊल

Coforge Update: कोफोर्ज कंपनीकडून अत्याधुनिक Forge-X व्यासपीठाची घोषणा यातून आयटीतील 'हे' मोठे पाऊल

मोहित सोमण:कोफोर्ज लिमिटेड (Coforge Limited) कंपनीने आपल्या नव्या Forge -X या अभियांत्रिकी व डिलिव्हरी व्यासपीठाचे उद्घाटन केले आहे. नव्या व्यवसायिक व्यासपीठात सॉफ्टवेअर वितरित करण्यासाठी अत्याधुनिक ए आय आधारित तंत्रज्ञान विकसित केल्याचे कंपनीने एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीत म्हटले आहे. त्यामुळे डिजिटली हायटेक असलेल्या या तंत्रज्ञानात एआय एजंटचा वापर करण्यात येणार आहे. मोठ्या प्रमाणात कंपनीच्या ग्राहक कंपन्यांना अभिप्रेत असलेल्या गरजेनुसार कंपनीचे व्यवसायिक व्यासपीठ हायटेक सॉफ्टवेअर बनवणार आहे. त्या क्षेत्रातील गरजा, त्या क्षेत्रातील संबंधित, व अत्याधुनिक अभियांत्रिकी सहाय्याने क्लिष्ट तंत्रज्ञान सोप्या परिभाषेत बदलण्यासाठी या व्यासपीठावर नवे सॉफ्टवेअर बनवले जाणार असल्याचे कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

माहितीनुसार 'अँडव्हान्स इंजिनिअरिंग' सर्विसेस संबंधित कंपनीच्या युनिटनी तंत्रज्ञान परिवर्तनासाठी एस एल डी सी (Software Development Life SDLC), व पीडीएलसी (Product Development Life Cycle PDLC) विकसित करणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. कमी खर्चात अधिक वेगवान, वस्तुनिष्ठ, व काळाच्या पुढे जाणारे सॉफ्टवेअर व्यासपीठ बनवल्याचे कंपनीने स्पष्ट केले. या तंत्रज्ञानामार्फत एआय टूल्स, एजेंटिक असिस्टंट, व एकत्रित व्यासपीठ (Integrated Platform) द्वारे केल्या जाणाऱ्या विकासात Forge- X व्यासपीठाचा महत्वाचा हात राहिल असे कंपनीने यावेळी स्पष्ट केले.

हे विशेष डोमेन ज्ञानाचा आपल्या ज्ञानाचा वापर करते असे कंपनीने म्हटले. जिरा, लीनआयएक्स, अर्डोक आणि सर्व्हिसनाऊ सारख्या थर्ड पार्टी प्रणालींशी कनेक्ट होते असेही कंपनीने यावेळी म्हटले. याविषयी बोलताना कंपनीने म्हटले आहे की,'एजंट्सना उत्पादनाचा मालकांपासून आर्किटेक्ट्सपर्यंत ते डेव्हलपर्स, टेस्टर्स आणि ऑपरेशन्सपर्यंत प्रत्येक भूमिकेला पाठिंबा देऊन फोर्ज-एक्स हे सुनिश्चित करते की सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाइफसायकलचा प्रत्येक टप्पा संदर्भ-जागरूक, स्वयंचलित आणि वेग, गुणवत्ता आणि व्यवसाय-संरेखनासाठी ऑप्टिमाइझ केलेला आहे.'

कंपनीच्या माहितीनुसार, कोफोर्ज फोर्ज-एक्स प्लॅटफॉर्म तीन धोरणात्मक स्तंभांवर आधारित आहे. प्रथम, प्लॅटफॉर्म फर्मच्या ‘सखोल डोमेन कौशल्याचा’ त्याच्या अभियांत्रिकी फॅब्रिकमध्ये समावेश करतो जेणेकरून अभियांत्रिकी निर्णय डोमेन- अर्थशास्त्राशी संदर्भासह जागरूकता असलेले टूल फंक्शन्स आणि डिलिव्हरेबल्स व्यवसाय आणि तांत्रिक अपेक्षा दोन्हीशी रचना जोडल्या जातात.दुसरे म्हणजे, टीमने विशिष्ट अभियांत्रिकी आव्हानांना तोंड देण्यासाठी उद्देशाने बनवलेले विशेष एआय एजंट्सचा एक संच विकसित केला आहे. तिसरे म्हणजे, हे प्लॅटफॉर्म औद्योगिक दर्जाच्या साधनाने सुसज्ज आहे जे एका विशिष्ट अभियांत्रिकी कार्यांसाठी तयार केले आहेत.

कोफोर्जचे ईव्हीपी आणि चीफ डिलिव्हरी ऑफिसर सुनील फर्नांडिस म्हणाले आहेत की,'कोफोर्जचा एआय-नेटिव्ह दृष्टिकोन केवळ साधनांपुरता मर्यादित नाही, तर तो सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटच्या प्रत्येक टप्प्यात रुजलेला एक तत्वज्ञान आहे. आवश्यकतांपासून ते डिझाइनपर्यंत, प्रत्येक टप्प्याला एम्बेडेड इंटेलिजन्स, संदर्भात्मक जागरूकता आणि एजंटिक-सहकार्याद्वारे ऑप्टिमाइझ केले जाते. हे केवळ एक पद्धत किंवा कार्यक्षमतेचा आभास नाही हा एक आदर्श बदल घडवलेल्या आहे जिथे सॉफ्टवेअर विकास आणि अभियांत्रिकीची पुनर्कल्पना केली जाते, ती जलद, हुशार, कार्यक्षम आणि खरोखर परिवर्तनकारी बनते.'

ते पुढे म्हणाले, 'फोर्ज-एक्स हे आमच्या डिलिव्हरी ऑपरेशन्समध्ये आमच्या अभियांत्रिकीशी निगडित एआय-फॉरवर्ड मानसिकतेचे मूर्त स्वरूप आहे.चार-टप्पे फ्रेमवर्क - ऑनबोर्डिंग, सक्षमीकरण, स्केलिंग आणि स्व-शासन - एंटरप्रायझेसना दैनंदिन कार्यप्रवाहात एआय शाश्वतपणे एम्बेड करते, क्षमता प्रभावात बदलते याची खात्री करते. फोर्ज-एक्स सह, आम्ही खात्री करतो की एआय-नेटिव्ह सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि उत्पादन डेव्हलपमेंट हे केवळ एक दृष्टी नाही, तर ते संपूर्ण संस्थेत आणि आमच्या क्लायंटसाठी एक जिवंत वास्तव आहे.'

निवडक उद्योगांमध्ये हायपर-स्पेशलायझेशन आणि प्रगत अभियांत्रिकी क्षमता यांचे एकत्रीकरण आता शक्य होणार आहे असे कंपनीने म्हटले.

कोफोर्ज ही एक सॉफ्टवेअर इकोसिस्टीम (परिसंस्था) सोलूशन कंपनी आहे. जागतिक डिजिटल सेवा आणि उपायांसह कंपनी त्याच्या क्लायंटसाठी वास्तविक- जगातील प्रभावी व्यवसायी अंमलबजावणीसाठी सेवा प्रदान करते. कंपनीने म्हटले आहे की, यासाठी उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि खोल डोमेन कौशल्याचा वापर कंपनी वेळोवेळी करते. निवडक उद्योगांवर लक्ष केंद्रित करणे, त्या उद्योगांच्या अस्तित्वात असलेल्या प्रक्रियांची खोल डोमेन माहिती घेणे हे कंपनीचे दैनंदिन काम आहे. कोफोर्जची सध्या ३३ जागतिक वितरण केंद्रे आहेत आणि कंपनीची २५ देशांमध्ये सध्या उपस्थिती आहे. दुपारी १२.४५ वाजेपर्यंत कंपनीचा शेअर १.०२% उसळत १८१५.९० रूपये प्रति शेअरवर व्यवहार करत होता.

Comments
Add Comment