Monday, November 24, 2025

Dharmendra Died : ६ दशके गाजवणारा 'ही-मॅन'! धर्मेंद्र यांचे ११ चित्रपट जे आजही आयकॉनिक; अभिनय पाहून तुम्ही म्हणाल, व्वा!

Dharmendra Died : ६ दशके गाजवणारा 'ही-मॅन'! धर्मेंद्र यांचे ११ चित्रपट जे आजही आयकॉनिक; अभिनय पाहून तुम्ही म्हणाल, व्वा!

मुंबई : भारतीय सिनेसृष्टीवर आपल्या अभिनयाच्या जोरावर तब्बल सहा दशके अधिराज्य गाजवलेले ज्येष्ठ आणि लाडके अभिनेते धर्मेंद्र यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाचे वृत्त ऐकून संपूर्ण सिनेसृष्टीतून तीव्र दुःख व्यक्त केले जात आहे. धर्मेंद्र यांच्या निधनाने भारतीय सिनेसृष्टीची मोठी हानी झाली असून, त्यांच्या पार्थिवावर आज विलेपार्ले स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. धर्मेंद्र यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर चित्रपटसृष्टीत एक वेगळे स्थान निर्माण केले होते. त्यांच्या अविस्मरणीय कारकिर्दीतील असे दहा चित्रपट आहेत, जे प्रत्येक चाहत्यांनी किंवा सिनेरसिकांना आयुष्यात एकदातरी पाहिलेच पाहिजेत:

१. शोले रमेश शिप्पी यांनी दिग्दर्शित केलेला आणि १९७५ साली आलेला शोले हा चित्रपट धर्मेंद्र यांना वेगळी ओळख देऊन गेला. त्यांनी या चित्रपटात केलेली भूमिका चांगलीच अजरामर झाली. याच चित्रपटापासून त्यांना विरू असे आदराने म्हटले जाऊ लागले.

२. प्रतिज्ञा

१९७५ मध्येच प्रदर्शित झालेला 'प्रतिज्ञा' हा चित्रपट धर्मेंद्र यांच्या करियरमधील एक अतिशय महत्त्वाचा ॲक्शन आणि कॉमेडी चित्रपट आहे. यात त्यांनी एका गावकऱ्याची भूमिका साकारली आहे, जो आपल्या प्रेमाचा आणि वडिलांचा बदला घेण्यासाठी शहरातून गावात परततो. या चित्रपटातील ॲक्शन सीन्स आणि धर्मेंद्र-हेमा मालिनी यांची रोमान्स केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली होती. 'मैं जट यमला पगला दीवाना' हे त्यांचे प्रसिद्ध गाणे याच चित्रपटातील आहे, जे आजही लोकांच्या ओठांवर आहे.

३. चुपके चुपके चुपके-चुपके ऋषिकेश मुखर्जी यांनी दिग्दर्शित केलेला आणि १९७५ साली आलेला चुपके चुपके हा चित्रपटही धर्मेंद्र यांच्या अभिनयामुळे चांगलाच गाजला. या चित्रपटात त्यांनी या चित्रपटात परिमल त्रिपाठी हे पात्र साकारले होते.

४. द बर्निंग ट्रेन धर्मेंद्र यांचा द बर्निंग ट्रेन हा चित्रपटही चांगलाच गाजला. या चित्रपटात त्यांनी विनोद खन्ना, मालिनी, जितेंद्र, परवनी बाबी, नितू सिंह या अभिनेत्यांसोबत स्क्रीन शेअर केली होती.

५. धरम वीर धरम वीर हा चित्रपट १९७७ साली आला होता. या चित्रपटात त्यांनी वीर हे पात्र साकारले होते. या चित्रपटात त्यांनी प्राण, जितेंद्र, रंजित यासारख्या कसलेल्या अभिनेत्यांसोबत स्क्रीन शेअर केली होती.

६. रॉकी और राणी की प्रेम कहाणी अलिकडेच रणवीरसिंह आणि आलिया भट्ट यांचा रॉकी और राणी की प्रेमकहाणी हा चित्रपट आला होता. या चित्रपटात त्यांनी महत्त्वाची भूमिका केली होती. या चित्रपटात शबाना आझमी यांच्यासोबत त्यांची केमिस्ट्री जुळून आली होती.

७. हकिकत भारत-चीन युद्धातील एका भारतीय सैनिकाची कथा हा या चित्रपटाचा केंद्रबिंदू आहे. या चित्रपटात धर्मेंद्र प्रथमच सैनिकाच्या भूमिकेत दिसले होते. हा चित्रपट १९६४ साली प्रदर्शित झाला होता.

८. फुल और पथर हा चित्रपट १९६६ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात धर्मेंद्र अॅक्शन हिरो म्हणून समोर आले होते. या चित्रपटात मीना कुमार त्यांच्यासोबत होती.

९. सत्यकाम हा चित्रपट १९६९ साली प्रदर्शित झाला होता. शर्मिला टागोर, संजिव कुमार यासारख्या कलाकारांसोबत धर्मेंद्र यांनीही या चित्रपटात महत्त्वाची भूमिका केली होती.

१०. मेरा गाव मेरा देश या चित्रपटात धर्मेंद्र यांच्याोसबत विनोद खन्ना, आशा पारेख यासारखे कलाकार होते. हा चित्रपट १९७१ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील गीत आजही तेवढ्याच आवडीने ऐकले जातात.

११. चरस ॲक्शन, रोमान्स आणि कॉमेडीने ओपप्रोत असलेला चरस हा चित्रपट १९७६ साली आला होता. हा एक स्पाय थ्रिलर चित्रपट आहे. धर्मेंद्र यांनी या चित्रपटात आंतरराष्ट्रीय ड्रग्ज सिंडिकेटचा भंडाफोड करणाऱ्या एका व्यक्तीची भूमिका केलेली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >