Sunday, November 23, 2025

पालकांनी मोबाइलला दिला नाही, म्हणून ८ वीच्या विद्यार्थीने केली आत्महत्या

पालकांनी मोबाइलला दिला नाही, म्हणून ८ वीच्या विद्यार्थीने केली आत्महत्या

मुलांमध्ये दिवसेंदिवस मोबाईलचे व्यसन इतके वाढत आहे की मुले आता मैदानी खेळ पूर्णपणे विसरले आहेत. पालकांकडे मुले सतत मोबाईलचा तगादा लावत असल्याने हल्ली बहुतेक घरात मोबाईलवरून पालक आणि मुलात वाद होताना दिसतात

नागपूर : आई-वडिलांनी मोबाईल दिला नाही म्हणून एका आठवीत शिकणाऱ्या मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मोबाईल फोनच्या अतिवापरामुळे मुलांची मने इतकी कमजोर, हलकी झाली आहेत की आत्महत्येसारखा विचार मुलांच्या मनात अगदी सहजपणे येतो.

ही घटना नागपूर येथील चणकापूर गावात घडली आहे मृत मुलीचे नाव (मुलीचे नाव दिव्या सुरेश कोठारे) असे आहे. या घटनेनंतर पोलिसांना घटनास्थळी जाऊन मृतदेहाचा पंचनामा करुन तो शवविच्छेदनासाठी पाठवून दिला आहे.दिव्या इयत्ता ८ वीत शिकत होती. गेले बरेच दिवस दिव्या मोबाईलचा अतिवापर करत होती. शिवाय अभ्यासाचा कंटाळा देखील करत होती. ही गोष्ट तिच्या पालकांच्या निदर्शनास आली. त्यामुळे दिव्याच्या पालकांनी जमेल तेवढं तिला मोबाईलपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला. शिवाय मोबाईल कमी करून अभ्यास कर असा सल्ला देखील दिला.

गेल्या बऱ्याच दिवसापासून हे सुरु होत. त्यामुळे दिव्या तणावात होती. मात्र शुक्रवारी दिव्याच्या आत्याच्या लग्नासाठी कोठारे कुटुंबीय लग्नसराईत व्यस्त होते. सायंकाळी नेहमीप्रमाणे दिव्याने कटुंबीयांकडे मोबाईल मागितला, मात्र घरच्यांनी नकार दिला. मोबाईल न दिल्याने दिव्या रागावली. संतापाच्या भरात ती आत्याच्या घरातून निघून सरळ स्वतःच्या घरी आली.

घरी कोणी नसल्याची संधी साधून घरात बांधलेल्या पाळण्याच्या दोरीला तिने गळफास घेतला. काही वेळाने तिची मोठी बहीण तिला शोधत घरी आली असता हा प्रकार उघडकीस आला. कुटुंबियांना घटनेचा प्रकार समजताच दिव्याच्या पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच खापरखेडा पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला असून आत्महत्येची नोंद केली आहे. मात्र या घटनेने सर्व पालकांना हादरून सोडले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा