परिजान नावाच्या महिलेने २३ सप्टेंबर रोजी एका ऑनलाईन अॅपवरून घरचे किराणा सामान मागवले होते. दुपारी ४ च्या सुमारास डिलिव्हरी बॉय तिच्या घरी पोहोचला. काही वस्तू उपलब्ध नसल्याचे सांगून रिफंड करण्यासाठी नंबर हवा असे सांगत महिलेचा नंबर घेतला.पुढच्या दिवशी त्याने फोन करून रिफंडची माहिती दिली. यानंतर छेडछाडीची मालिका सुरू झाली. डिलिव्हरी बॉय तिला सतत व्हाट्सअॅप वरून अश्लील मेसेज पाठवू लागला.
परिजानने ही गोष्ट तिच्या पतीला सांगितली. पतीने आरोपीला कडक शब्दात इशारा दिला आणि परिजानपासून दूर राहण्यास सांगितले, त्यानंतर आरोपी काही दिवस शांत राहिला, पण २८ नोव्हेंबरला पुन्हा त्याने अश्लील मेसेज पाठवलेमहिलेने संतापून पोलिसात तक्रार करण्याचा इशारा दिला. त्यानंतरही आरोपीने नंबर ब्लॉक करत वेळ मारून नेली . पण यानंतरही त्याची कृती काही थांबली नाही.
आरोपीने १९ नोव्हेंबरला नवीन नंबरवरून पुन्हा मेसेज पाठवायला सुरुवात केली. परिजानला एकटीला भेटण्यासाठी बोलावले. तिने नकार दिल्यावर त्याने धमक्या देत खूप जास्त मेसेज,स्टॉकिंग केल्याने परिनाज पूर्णपणे घाबरली. अखेर तिने भायखळा पोलिस ठाण्यात जाऊन रितसर तक्रार नोंदवली.पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला. आरोपी लवकरच पोलिसांच्या ताब्यात येईल असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. मात्र, या प्रकरणामुळे ऑनलाइन ऑर्डर देणाऱ्या महिलांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.