एकदिवसीय मालिकेला ३० नोव्हेंबरपासून सुरुवात, मात्र शुभमन आणि श्रेयस संघातून बाहेर! केएल राहुल होणार संघाचा कॅप्टन ?

मुंबई: येत्या ३० नोव्हेंबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात एकदिवसीय मालिका सुरू होणार आहे. मात्र एकदिवसीय मालिकेच्या आधी सुरू असणाऱ्या कसोटी सामन्यातच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिल याला कोलकाता येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान मानेला दुखापत झाली. या दुखापतीमुळे त्याला उपचारासाठी मुंबईला हलवण्यात आले असल्याने दुसऱ्या कसोटी सामन्यात तो दिसला नाही. मात्र आगामी एकदिवसीय मालिकेमध्येही शुभमान दिसणार नसल्याचे बीसीसीआयच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे. दुसरीकडे, श्रेयस अय्यर हा देखील दुखापतीमुळे संघाबाहेर असल्याने निवड समितीसमोर पेच निर्माण झाला होता.



कोण करणार भारतीय संघाचे नेतृत्व?
शुभमन गिलच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचे नेतृत्व केएल राहुलकडे सोपवले जाण्याची दाट शक्यता आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गिल आणि उपकर्णधार श्रेयस अय्यर यांच्या गैरहजेरीत राहुलला 'कॅप्टन' म्हणून जबाबदारी दिली जाऊ शकते. राहुलने यापूर्वीही भारतीय संघाचे नेतृत्व केले असून, त्याची एकदिवसीय सामन्यातील आकडेवारी देखील प्रभावी आहे. त्यामुळे केएल राहुल हे महत्त्वाचे नाव चर्चत आहे.



केएल राहुलने आतापर्यंत ८८ सामन्यांत ४८.३१ च्या सरासरीने तीन हजार ब्याण्णव धावा केल्या आहेत. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या कठीण दौऱ्यात राहुलचा अनुभव संघासाठी महत्त्वाचा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. या एकदिवसीय मालिकेसाठी चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. कारण रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचे या मालिकेद्वारे पुनरागमन होत आहे. दक्षिण अफ्रिकाविरुद्धची एकदिवसीय मालिका ३० नोव्हेंबरला रांची येथे पहिल्या सामन्याने सुरू होईल. त्यानंतर ३ डिसेंबरला रायपूर आणि ६ डिसेंबरला विझाग येथे सामने खेळवले जातील.

Comments
Add Comment

भारतीय संघ कसोटीत अपयशी; टी - २० त ‘ब्लॉकबस्टर’!

मुंबई  : भारतीय क्रिकेट संघासाठी २०२५ हे वर्ष संमिश्र यश देणारे ठरले. या वर्षात भारताने १० कसोटी, १४ वनडे आणि २२

पाकिस्तानच्या नक्वीचा भारताच्या १९ वर्षांखालील क्रिकेटपटूंनी केला अपमान

मुंबई  : जेतेपदाच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने समीर मिन्हासच्या धमाकेदार शतकाच्या जोरावर ३४७

भारत दौऱ्यातून मेस्सीला ८९ कोटींची कमाई, भारताला कररूपाने ११ कोटींचे उत्पन्न

मुंबई  : लोकप्रिय फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने नुकताच भारताचा दौरा केला होता. कोलकाता येथे झालेल्या १३ डिसेंबर

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारतीय संघाची सहाव्या स्थानावर घसरण

नवी दिल्ली  : माऊंट मांघनाई इथे सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजचा ३२३ धावांनी धुव्वा उडवत न्यूझीलंडने

युवा भारताचे स्वप्न अधुरे!

१३ वर्षांनंतर पाकची जेतेपदावर मोहोर दुबई : १९ वर्षांखालील आशिया कप २०२५ स्पर्धेतील अंतिम सामना रविवारी झाला. या

भारतीय महिला संघाची विजयी सलामी

जेमिमाच्या अर्धशतकाने श्रीलंकेची कोंडी; मालिकेत १-० ने आघाडी विशाखापट्टणम : महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ चे