आयुष्याचं सोनं की माती... हे तुझ्याच हाती!

मनस्विनी : पूर्णिमा शिंदे


आपल्या आयुष्याचं सोनं करायचं की माती करायची हे आपल्याच हातात असतं.
प्रत्येकाने जन्माला आल्यानंतर आपापले कर्म कर्तव्य जबाबदारीने केले, तर निश्चितच त्याला एक वलय निर्माण होते. त्याचेच नाव आहे कर्तृत्व. या कर्तृत्वाच्या वाटा आपणच उजळायला लागतात. प्रकाशमान होण्यासाठी जाळून घ्यावे लागते आणि अंकुरित होण्यासाठी गाडून घ्यावे लागते. तसेच तर आहे जीवन आणि जीवनाचे कर्तव्य.


सतत आपण काही ना काही करत असतो. धडपडत असतो. पण त्या करण्याला जेव्हा अर्थ प्राप्त होतो, तेव्हाच ते आपले कर्तव्य सार्थकी लागते. जीवनाचेही सार्थक होते. पैसाअडका, सोनं-नाणं, बंगलागाडी, जमीन-जुमला, कपडालता हे सगळं मायाजाल आहे, याची गरज आहे; परंतु मर्यादेपूर्ती गरजेपुरती. या अज्ञानापाई, अति मोहापायी माणूस यातच माणूसपण हरवून बसतो. माणूस गुरफटत जातो आणि त्याला किती धावावे याचीसुद्धा मर्यादा नसते. काही लोक काबाडकष्ट करतात. स्वतःसह इतरांना सुखात ठेवतात पण काही लोक काहीच करत नाहीत आणि इतरांना दुःखही देतात. म्हणजे म्हणतात ना. खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा! तर काही लोक असतात उधळपट्टी; आईच्या जीवावर बायजी उदार!


अति तेथे माती मग तो अधिकार असो, अहंकार असो, व्यसन गर्व लालच लोभ आळस, कोणतीही गोष्ट भगवान बुद्धाने सांगितले ती जास्त झाली की ती विष होते. आयुष्याचा सर्वनाश करते. कोणतीही गोष्ट मर्यादित असली पाहिजे. टेन्शन आल्यावर दोन घोट दारू पिणाऱ्यांना स्वतःसह आपली आई, वडील, बायको, मुलांचा विसर पडतो. समाजाचा देखील आणि होतं काय शेवटी केस हाताबाहेर जाते.


पूर्वी घोडेबाजारात घोडे लॉटरीसारखे खेळले जायचे. चार भावंडांचे कुटुंब. एक घर सावरायचा आणि सगळ्यात धाकटा भाऊ लॉटरी खेळायचा. घोड्यांची शर्यत हरला आणि सगळ्यांना रस्त्यावर आणलं. शेवटी झालं काय, कुणीतरी घराचा कर्तबगार पुरुष आपली कर्तव्य पार पाडतोय आणि धाकट्याने फक्त चैनबाजी करत आयुष्यात उधळपट्टी केली. यातून एक धडा मिळतो की, आपले कर्म हे इतरांसाठी आणि स्वतःसाठी उन्नती, प्रगती आणि हितावह असले पाहिजे.


असेच एक उदाहरण देते. एका स्त्रीने शेजारच्या बाईकडे पैसे साठवायला दिले होते. पैसे साठवता साठवता एक-दोन वर्षांत म्हणजे खूप पैसे झाले असतील असे वाटून त्या स्त्रीने शेजारच्या बाईकडे आपण दिलेल्या पैशांबद्दल मागणी केली. मुलीच्या लग्नासाठी मला पैशांची गरज आहे असे तिने सांगितले; परंतु शेजारणीने चक्क नकार देत मी तुझे पैसे ठेवलेच नाहीत कोण साक्षीदार आहे सांग? असे म्हणत आजवर विश्वासावर चालणारे हे मैत्रीचेे शेजारणीचे नातेच संपवले. त्या बाईला विश्वासघाताला सामोरे जावे लागले आणि पै पे करून जमवलेली रक्कम मातीमोल झाली. नातेही संपले आिण विश्वास नि पैसाही!


एका राजाला खूप श्रीमंत व्हायचे होते. त्याने देवाला प्रसन्न करून एक वर मागितला. मी हात लावीन ती गोष्ट सोन्याची होऊ देत आणि तसेच घडले. राजाने सफरचंदाला, अन्नाला, राणीला, स्वतःच्या मुलांना जेथे जेथे हात लावला ते सोन्याचे होई. मग मला सांगा अति तेथे माती. बहिणाबाईंची एक गोष्ट आठवते,
माणूस माणूस
मतलबी रे माणसा
तुले फार हावं
लोभासाठी झाला माणसाचा कानूस.
म्हणून आपली कर्तव्ये बजावताना इतरांच्या मनाचा विचार करा. कोणालाही वेदना, दुःख देऊ नका. जगता जगता स्वतः इतरांचे कल्याण करा. ते आपल्यासाठी आहे. तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार आणि तू जे घडविणार आहे ते जीवनाचे शिल्प तुझे कर्म आहेत. ही सेवाभावी परोपकारी आणि समाज प्रबोधनाची प्रगतीची वृत्ती असावी. थोरामोठ्यांच्या आदर्श मूल्यांतून आपण हेच तर शिकलोय.

Comments
Add Comment

मुलांच्या नजरेतून पालक

मुलांचं आयुष्य, त्यांचं व्यक्तिमत्त्व आकारात आणण्यात मातृत्व आणि पितृत्व हे फार मोठी भूमिका बजावतं. आईच्या

ये मिलन हमने देखा यहीं पर...

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे पुनर्जन्म हा विषय भारतीय समाजमनाला ओळखीचाही आहे आणि प्रियही! पूर्वी या विषयावर

मेहरनगड : सांस्कृतिक इतिहासाची ओळख

विशेष : सीमा पवार संपूर्ण राजस्थानमधील सर्वात प्रभावी आणि मोठ्या किल्ल्यांपैकी एक मेहरनगड आहे. किल्ल्याच्या आत

नकली श्रीकृष्ण ‘पौड्रक’

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे भारताच्या पौराणिक कथेत स्वतःलाच देव मानण्याचा दावा करणाऱ्या काही

जात

नक्षत्रांचे देणे : डॉ. विजया वाड “मालू, फडक्यांचा नकार आला गं!” अप्पांचा आवाज व्यथित होता. “का हो अप्पा? जाताना तर

मैत्रीण

जीवनगंध : पूनम राणे रविवारचा दिवस होता. शाळेला सुट्टी होती. मीनल आणि तिची बहीण शीतल संध्याकाळी पाचच्या दरम्यान