मुंबई : दिवसेंदिवस कमी होत चाललेली कर्मचाऱ्यांची संख्या व सध्या असलेल्या कर्मचाऱ्यांवर येणारा अतिरिक्त ताण पाहता बेस्ट उपक्रम ५०० नवीन बस वाहकांची भरती करणार आहे . ही भरती फक्त वाचकांसाठी असून यामुळे वाहकांवर होणार येणारा ताण कमी होणार आहे.
गेली अनेक वर्ष बेस्टमध्ये भरती झालेली नाही तसेच बेस्टचा स्वमालकीचा बस ताफा ही आता ३०० च्या आसपास आला आहे. तसेच २ हजार ४०० च्या वर बस कंत्राटदारांमार्फत चालवली जाते. कंत्राटदारामार्फत चालवल्या जाणाऱ्या बस मार्गांवर कंत्राटदाराचा बस चालक असतो मात्र त्याला वाहक बेस्टचा द्यावा लागतो त्यामुळे वाढत चाललेला कंत्राटदाराचा बस ताफा पाहता बेस्टकडे बस चालकांची संख्या अपुरी पडू लागली आहे. त्यात काही ठिकाणी बस वाहकांच्या कमतरतेमुळे विनावाहक बस गाड्या चालवाव्या लागतात त्यामुळे फुकट्यांची संख्या ही वाढली आहे. हे पाहता बेस्ट आता पाचशे नवीन कायमस्वरूपी बसवाहकांची भरती करणार असल्याची माहिती नारायण राणेप्रणीत बेस्ट समर्थ कामगार सेनेचे सरचिटणीस विलास पवार यांनी दिली.
काल बुधवारी त्यांनी आपल्या शिष्टमंडळासह बेस्ट व्यवस्थापक सोनिया सेठी यांची भेट घेतली त्यावेळी बेस्ट लवकरच पाचशे बसवाहकांची भरती करणार असल्याचे त्यांना सांगितले त्याची प्रक्रिया सुरू असून लवकरच ती घोषणा करण्यात येणार आहे . काही ठिकाणी अतिरिक्त बसचालकांची नेमणूक बस वाहक म्हणून करण्यात येत आहे मात्र कामगार संघटनेचा विरोध लक्षात घेता ही भरती झाल्यानंतर बसचालकांची कामेही थांबवण्यात येतील व त्यांना इतर ठिकाणी घेण्यात येईल त्यामुळे त्यांच्या बढती वरही कोणताही परिणाम होणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले.
- सध्या बसचालकांची संख्या ६ हजार ८००
- सध्या बसवाहकांची संख्या ६ हजार ७००
- सध्या बसगाड्यांची संख्या २३० [स्वमालकीच्या]
- सध्या बसगाड्यांची संख्या २ हजार ४०० [कंत्राटदाराच्या]
- येणाऱ्या कंत्राटदाराच्या बस ३ हजार ५००







Omkar Vagal December 26, 2025 01:08 PM
बेस्ट ने कंत्राटी बस बंद करून स्व: मालकीच्या बसेस ची संख्या वाढवली पाहिजे तसेच जे कंत्राटी बस चालक आणि वाहक आहेत त्यांना बेस्ट ने भरती प्रक्रियेसाठी प्राधान्य दिले पाहिजे.