Sunday, November 23, 2025

अस्लम शेख प्रकरण चिघळले, मालाडच्या मालवणीत भाजप युवा मोर्चा आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमनेसामने

अस्लम शेख प्रकरण चिघळले, मालाडच्या मालवणीत भाजप युवा मोर्चा आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमनेसामने

मुंबई : मालाडच्या मालवणी येथे अग्निशामक दलाच्या कार्यालयासमोर भाजप युवा मोर्चाचे शेकडो कार्यकर्ते एकत्र आले. या कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांच्या विरोधात घोषणा दिल्या. या भागातच काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांचे एक कार्यालय आहे. भाजप युवा मोर्चाने घोषणाबाजी सुरू करताच काँग्रेस कार्यकर्तेही रस्त्यावर आले. यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांची धरपकड केली. तसेच घटनास्थळी मोठा बंदोबस्त ठेवला.

अस्लम शेख यांनी मालाडमध्ये उभारलेली रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमानांची वस्ती पाडून घुसखोरांना त्यांच्या देशात परत पाठवून द्यावे, अशी मागणी भाजपने केली आहे. भाजपकडून सर्वात आधी ही मागणी मंगलप्रभात लोढा यांनी केली. मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनीही लोढांना या मागणीसाठी पाठिंबा जाहीर केला. अखेर या मुद्यावरुन काँग्रेस आणि भाजप यांच्यात राजकीय धुमश्चक्री रंगण्यास सुरुवात झाली. अलिकडेच भाजपच्या मंगलप्रभात लोढा यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना एक पत्र पाठवले. या पत्रात त्यांनी अस्लम शेख धमकावत असल्याचे नमूद करून कारवाईची मागणी केली. लोढा यांच्या मागणीला मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी जाहीर पाठिंबा दिला होता. धमकी देणारे अस्लम शेख आणि त्यांच्या बेकायदा वर्तन करणाऱ्या समर्थकांवर कायदेशीर कारवाई व्हायलाच हवी, असेही अस्लम शेख म्हणाले होते. आता या घडामोडींवरुन मालवणीत काँग्रेस आणि भाजप यांच्यातील तणाव वाढू लागला आहे.

अस्लम शेख यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केल्याप्रकरणी पोलिसांनी भाजपच्या काही आंदोलकांना ताब्यात घेत मालवणी पोलीस ठाण्यात आणलं होतं. यानंतर भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्यासह आणखी काही नेते पोलीस ठाण्यात आले होते. याच दरम्यान मालवणी पोलीस ठाण्याच्या बाहेर भाजप कार्यकर्त्यांकडून ठिय्या आंदोलन सुरू झालं.

प्रकरण नेमके आहे तरी काय ?

मुंबई भाजप आणि काँग्रेस नेते अस्लम शेख यांच्यातील वाद आता टोकाला पोहोचला आहे. मुंबई भाजप आणि काँग्रेस नेते अस्लम शेख यांच्यातील वाद आता टोकाला पोहोचला आहे. अस्लम शेख यांनी मंत्री मंगलप्रभात लोढा यांना धमकी दिल्याचा आरोप करत भाजपकडून अस्लम शेख यांच्यावर टीका केली जात होती. यातूनच अमित साटम यांनी खोचक शब्दांत अस्लम शेख यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील अंधेरी येथे अमित साटम यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केलं होतं.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >