अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी तयार केलेला 'धावपट्टी' हा अॅनिमेटेड लघुपट ऑस्करसाठी शॉर्टलिस्ट झाला असून ही मराठीतील पहिली अॅनिमेटेड शॉर्टफिल्म आहे. या लघुपटाबद्दल बोलताना रेणुका शहाणे म्हणाली की, 'माझी शॉर्टफिल्म 'धावपट्टी' ही ऑस्करसाठी शॉटलिस्टेड झाली आहे. हा लघुपट मी प्रयोग म्हणून केला होता. परंतु जेव्हा मी कथा लिहित होते. त्यावेळीच मला वाटत होतं की, ही अॅनिमेटेड असावी. तेव्हा मी त्यात पैसे गुंतवून तो लघुपट तयार केला. त्यानंतर त्याला इतकं भरभरुन प्रेम मिळालं की, फिल्म फेस्टिवलमध्ये त्याचं कौतूक झालं. बैंगलुरू इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये त्याला विनर घोषित केलं. आता ऑस्करसाठी याचं सिलेक्शन झालं आहे. मी आता देवाकडे प्रार्थना करते की, ही शॉर्टफिल्म ऑस्करासठी सिलेक्ट व्हावी.' असं ती म्हणाली.