परळी: राज्यभरात नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. उमेदवारांनी निवडणूकीसाठी भरलेला अर्ज मागे घेण्याची मुदतसुद्धा आता संपली आहे. त्यामुळे आता कोणते उमेदवार कोणत्या प्रभागातून उभे राहणार याचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. तर काही ठिकाणी विरोधकांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने बिनविरोध उमेदवार निवडून आले आहेत. ज्यात भाजप अव्वल स्थानावर आहे. मात्र भाजपसाठी महत्त्वाच्या असलेल्या बीड जिल्ह्यातील परळी नगर परिषद निवडणुकीत भाजपसोडून महायुतीतील इतर दोन मित्रपक्षांचे उमेदवार विजयी झाले आहे.
बीडमधली परळी नगरपरिषद निवडणुकीमध्ये शेवटच्या दिवशी विरोधी उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे दोन उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. यामुळे निवडणूक होण्यापूर्वीच महायुतीच्या दोन नगरसेवकांना गुलाल लागला आहे. ज्यात राष्ट्रवादीच्या प्रभाग क्रमांक १३ मधील रेश्मा बळवंत आणि प्रभाग क्रमांक ११ मधील शिवसेनेच्या जयश्री गीते या दोघींची नावे नगरसेवक पदासाठी बिनविरोध जाहीर झाले आहेत.
मुंबई (सचिन धानजी) : दक्षिण मुंबईतील भायखळा विधानसभेत उबाठाचे मनोज जामसूतकर हे आमदार म्हणून निवडून आले. लोकसभा निवडणुकीत भायखळा विधानसभेत जेवढी मते ...






