विनय धुमाळ यांच्याकडून अभिनयासोबतच तंत्रज्ञानाविषयी बऱ्याच गोष्टी शिकलो

टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमल 


कोणत्याही यशस्वी डॉक्टरची ओळख केवळ त्याच्या कौशल्यातून होत नाही, तर त्याच्या रुग्णाच्या कथा आणि व्यथांमधून होत असते. कुठल्यातरी आजारापायी जेव्हा एखाद्या रुग्णाचा जीव पणाला लागलेला असतो, तेव्हा त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरचीही प्रत्येक वेळी नव्याने परीक्षा होत असते. त्यात तो पास झाला तरच ‘ताठ कण्यानं’ जगाला सामोरे जाऊ शकतो. अशाच एका ध्येयवेड्या, संशोधनात झोकून दिलेल्या डॉक्टरची कथा ‘ताठ कणा’ या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. जगविख्यात शल्यचिकित्सक डॉ. प्रेमानंद रामाणी यांचा जीवनपट उलगडून दाखविणाऱ्या ‘ताठ कणा’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करून मान्यवरांचे कौतुक प्राप्त केलेला दिग्दर्शक आहे गिरीश मोहिते.


गिरीशचे शालेय शिक्षण विद्या मंदिर, वाणी विद्यालयामध्ये झाले. शाळेत असताना शिवाजी महाराजांचे एक नाटक होते, त्यामध्ये अफजलखानची भूमिका त्याने केली होती. त्याची चित्रकला चांगली असायची, त्यावेळी अनेक चित्रकलेच्या स्पर्धेमध्ये त्याला बक्षीस देखील मिळाले होते. त्याचे वडील जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून शिकले होते, तेंव्हा चित्रकलेच्या पदवीबद्दल त्यांना जाण होती. त्यांनी गिरीशला जे. जे. स्कूल ऑफ आर्ट कॉलेजमध्ये घातले. तेथे काही एकांकिकेमध्ये त्याने अभिनेता म्हणून काम केले. काही एकांकिकेचे दिग्दर्शनदेखील केले. त्यावेळी त्याचा फोटोग्राफी हा विषय होता. टेक्निकल बाब जाणून घेण्याची त्याची खूप इच्छा होती.


गिरीशचा एक शिंत्रे नावाचा मित्र होता, तो गिरीशला विनय धुमाळकडे अभिनयासाठी घेऊन गेला होता. तेथे गेल्यावर गिरीशने सांगितले की, त्याला तंत्रज्ञानाविषयी शिकायचे आहे. त्याबद्दल तो उत्सुक होता. तिथून त्याने भरपूर गोष्टी शिकून घेतल्या. तो त्याच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरला.


त्यानंतर त्याने राजन वाघधरेकडे काम केले. त्यावेळी त्यांची ‘श्रीमान श्रीमती’ ही मालिका सुरू होती. तेथे सहा ते सात वर्षे काम केल्यानंतर त्याला सरकारची साक्षरता मिशनवरची डॉक्युमेंट्री करण्याची संधी मिळाली. त्यानंतर दिग्दर्शक राकेश सारंगची 'काय पाहिलंत माझ्यात' या मालिकेचे पायलट एपिसोड करण्याची संधी मिळाली. त्यामध्ये प्रशांत दामले, निर्मिती सावंत हे कलाकार होते. ती मालिका चांगली झाली. त्यानंतर त्याला ई. टी. वी. वाहिनीवरील 'समांतर' ही मालिका मिळाली. त्यानंतर 'या गोजिरवाण्या घरात' ही मालिका त्याने केली. चित्रपट दिग्दर्शित करण्याची त्याची इच्छा होती. त्याचवेळी त्याच्या एका लेखक मित्राने त्याला एक चित्रपट दिग्दर्शित करण्याविषयी विचारले. त्याने तो चित्रपट दिग्दर्शित केला. त्या चित्रपटाचे नाव होते ‘विश्वास’. नंतर ‘ही पोरगी कुणाची’ हा चित्रपट त्याने दिग्दर्शित केला. एक गुजराती चित्रपट देखील त्याने दिग्दर्शित केला.


‘ताठ कणा’ या चित्रपटातील कलाकाराच्या निवडीविषयी काय सांगशील असे विचारल्यावर तो म्हणाला की निर्मात्याने डॉ. प्रेमानंद रामाणीच्या भूमिकेसाठी उमेश कामतचा विचार केला होता. जेव्हा मला उमेश कामतबद्दल सांगितले, तेव्हा मी डॉ. रामाणीचे फोटो पाहिले, नंतर उमेशची लूक टेस्ट करायला सांगितली कारण डॉ. रामाणीचे कॉलेजपासूनचे जीवन ते त्यांनी केलेली पहिली यशस्वी सर्जरीपर्यंतच्या कालावधीसाठी उमेश शोभून दिसला पाहिजे, केवळ केस पांढरे करून, तसा मेकअप करून उपयोग नव्हता. उमेशने डॉ. रामाणीचे उठणे, बसणे, स्वभाव त्याच्या भूमिकेत आणण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. दीप्ती देवीची निवड गिरीशने केली. दीप्ती देवीने डॉ. रामाणीच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. अगदी शाळेत जाणारी मुलगी ते प्रौढ पत्नी अशी तिच्या भूमिकेची व्याप्ती होती. ती तिने खूप चांगल्या पद्धतीने साकारली आहे. तिच्यावरचा दिग्दर्शकाचा विश्वास तिने सार्थ ठरविला आहे. श्रीकांत बोजेवारांनी कथा लिहिली आहे. त्या कथेतील दोन ओळीमधील भावार्थ गिरीशने खूप चांगल्या पद्धतीने उमेशकडून करून घेतला आहे. हा चित्रपट दिग्दर्शित करण्याच्या अनुभवाविषयी विचारल्यावर गिरीश म्हणाला की, हा चित्रपट दिग्दर्शित करण्याअगोदर मला भीती वाटत होती कारण खूप प्रभावी व्यक्तिमत्त्व, जगात नाव असणारे न्यूरोसर्जन असे ते डॉक्टर आहेत. हा सिनेमा पुढे संदर्भ म्हणून देखील गणला जाणार आहे. आपल्याकडून काही उणीव राहू नये याची मी काळजी घेतली आहे. डॉ. रामाणींच्या हातातील जादूची जाणीव जगाला व्हावी या उद्देशाने त्यांनी या चित्रपटाची निर्मिती केली. डॉ. रामाणींना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. हंगेरी देशामध्ये त्यांच्यावर पोस्टल स्टॅम्प आहे. रामाणी यांच्या जीवनावरील अत्यंत उत्कंठावर्धक संघर्ष, जिद्द आणि प्रेमाचा प्रवास 'ताठ कणा' या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Comments
Add Comment

रेणुका शहाणेची 'धावपट्टी' ऑस्करला

अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी तयार केलेला 'धावपट्टी' हा अॅनिमेटेड लघुपट ऑस्करसाठी शॉर्टलिस्ट झाला असून ही

तपोवनमधील वृक्षतोडीला सयाजी शिंदेंचा विरोध

नाशिकमध्ये लवकरच कुंभमेळा होणार आहे. मात्र याच कुंभमेळ्यात साधुग्राम बांधण्यासाठी इथल्या तपोवन परिसरातील अनेक

प्रयोग, प्रवास आणि प्रस्थान...

राजरंग : राज चिंचणकर रंगमंचावर प्रयोग सादर करताना संबंधित मंडळींना कोणत्या प्रसंगांना कधी आणि कसे सामोरे जावे

दिग्दर्शकदेखील उपेक्षितच असतो!

पाचवा वेद : भालचंद्र कुबल  मागील दोन्ही लेखांमध्ये लेखकाइतकाच नाटकाचा दिग्दर्शकही उपेक्षितच राहतो. या

‘असंभव’ वाटणारा थरार

टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमल  अभिनय करता करता एखाद्या अभिनेत्याला दिग्दर्शक व्हावस वाटणं आपण समजू शकतो; परंतु

‘मी संसार माझा ...’ मालिकेतून सुरू होणार अनुप्रियाची गोष्ट

‘सन मराठी’वर ‘मी संसार माझा रेखिते’ या मालिकेचा प्रोमो पाहताच प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.