नवी दिल्ली: दिल्ली गुन्हे शाखेने पाकिस्तानी आयएसआयशी जोडलेल्या आंतरराष्ट्रीय शस्त्र तस्करीच्या टोळीतील चार आरोपींना अटक केली आहे. तुर्की आणि चीनमध्ये बनवलेल्या उच्च दर्जाच्या पिस्तूल पाकिस्तानमार्गे भारतात पुरवठा करण्यासाठी ही टोळी काम करत होती. महत्त्वाचे म्हणजे ही शस्त्रे पाकिस्तानमधून ड्रोनद्वारे पंजाबमध्ये टाकली जात होती आणि नंतर पुन्हा विकली जात होती.
याप्रकरणात अजय, मनदीप, दलविंदर आणि रोहन अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. अटक केलेल्या आरोपींपैकी दोघेजण पंजाबचे आहेत. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले तेव्हा १० महागड्या परदेशी पिस्तूल आणि ९२ जिवंत काडतुसे जप्त केली. ज्याचा पुरवठा दिल्ली आणि आसपासच्या राज्यांमधील गुन्हेगार आणि गुंडांना केला जात होता.
प्रतिनिधी: सरकारने १९३० पासून पुढे सुरू असलेल्या कामगार कायद्यात बदल केले आहेत. त्यामुळे नव्या विस्तृत मांडणीसह काही नवे कायदे व काही जुन्या कायद्यात ...
गुन्हे शाखेचे म्हणणे आहे की, हे संपूर्ण नेटवर्क पाकिस्तानी आयएसआयशी संबंधित व्यक्तींच्या इशाऱ्यावर कार्यरत होते. शस्त्रे प्रथम पाकिस्तानात नेली जात होती आणि नंतर तेथून भारतात तस्करी केली जात होती. या व्यक्तींनी आतापर्यंत भारतात किती शस्त्रे विकली आहेत आणि कोणत्या टोळ्यांना किंवा व्यक्तींना ती मिळाली आहेत याचा तपास पोलिस करत आहेत. शस्त्रे शोधण्यासाठी तपास यंत्रणा मोबाईल फोन, बँक तपशील आणि सोशल मीडियाचा वापर करत आहेत.






