मुंबई: राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी पहायला मिळत आहे. निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यात नगरपंचायत आणि नगरपरिषदेच्या निवडणूका होणार आहेत. यासाठी इच्छूक उमेदवारांनी अर्ज देखील भरले आहेत. तर १९ ते २१ नोव्हेंबर दरम्यान अर्ज माघारी घेण्याची अखेरची तारीख होती. या दिवसात अनेक उमेदवारांनी अर्ज माघे घेतल्यामुळे बरेच नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहे. बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये भाजपच्या उमेदवारांचा सर्वाधिक समावेश आहे. नगरपंचायत व नगरपरिषद निवडणुकीची रिंगणात मतदानापूर्वीच भाजपने नगरसेवकांचे शतक पूर्ण केले आहे. याबद्दल भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी माहिती दिली आहे.
भाजपचे बिनविरोध जिंकलेले नगरसेवक – १००
भाजपचे बिनविरोध निवडून आलेले नगराध्यक्ष – ३
कुठल्या विभागात किती नगरसेवक बिनविरोध?
- कोकण-४
- उत्तर महाराष्ट्र-४९
- पश्चिम महाराष्ट्र-४१
- मराठवाडा-३
- विदर्भ-३
दोंडाईचा नगरपालिकेत भाजपचे २६ नगरसेवक बिनविरोध
धुळ्यातील दोंडाई नगरपालिकेत नगराध्यक्षसह भाजपचे एकूण सर्व २६ नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. अर्ज माघारीच्या दिवशी भाजप विरोधातल्या सर्व उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने निवडणूक बिनविरोध झाली आहे. राज्याच्या इतिहासात असा प्रकार पहिल्यांदा घडला आहे.
जामनेर नगरपालिकेत भाजपचे १० नगरसेवक बिनविरोध
जळगावच्या जामनेर नगरपालिकेतही भाजपचे १० नगरसेवक बिनविरोध विजयी झाले आहेत. गेल्या दहा वर्षांपासून जामनेर नगरपालिकेवर भाजपची सत्ता असून यावर्षी देखील विरोधकांनी माघार घेतल्याने भाजपचे १० नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत.
ठाणे: मुंबई नजीकच्या अंबरनाथ शहरात काल (२१ नोव्हेंबर) संध्याकाळी अपघाताची मोठी दुर्घटना घडली. अंबरनाथ शहरातील पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या ...
राज्यात २४६ नगर परिषदा आणि ४२ नगर पंचायतींसाठी येत्या २ डिसेंबरला मतदान होणार आहे. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी ३ डिसेंबरला मतमोजणी आणि निकाल लागणार आहे. दरम्यान अर्ज माघार घेण्याच्या प्रक्रियेमध्ये भाजपचे १०० नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत.






