Thursday, November 20, 2025

तेंडुलकरच्या घरी लगीनघाई? सारा-अंजलीची शॉपिंगला सुरुवात...

तेंडुलकरच्या घरी लगीनघाई? सारा-अंजलीची शॉपिंगला सुरुवात...

विख्यात क्रिकेटर सचिन तेंडुलकर याची पत्नी अंजली आणि सारा नुकत्याच शॉपिंग करताना दिसल्या. साड्यांच्या दुकानात तासनतास घालवल्यावर त्यांनी काही खास साड्या निवडल्या. भावी सुनबाई, अर्जुनची होणारी पत्नी सानिया हिच्यासाठीही त्यांनी साड्या विकत घेतल्याचे समजते.

क्रिकेटचा देव अशी ओळख असलेला सचिन तेंडुलकर आता लवकरच सासरेबुवा होणार आहेत. त्याचा धाकटा मुलगा अर्जुन तेंडुलकर याचा काही महिन्यांपूर्वीच साखरपुडा झाला. मुंबईतील अतिशय प्रतिष्ठित उद्योगपती रवी घई यांची नात असलेली सानिया चंडोक हिच्याशी अर्जुनची एंगेजमेंट झाली असून लवकरच ते लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यामुळे आता तेंडुलकर कुटुंबात लगीनघाई सुरू झाली असल्याचे दिसून येत आहे.

सचिन तेंडुलकरची पत्नी अंजली आणि लेक सारा सध्या काशीच्या दौऱ्यावर असून, याचदरम्यान अंजली यांनी त्यांच्या लेकाच्या लग्नासाठी तसेच भावी सुनबाई, सानियासाठी काही साड्या खरेदी केल्या आहेत. सारासह अंजली यांनी मुख्य लग्न समारंभ, मेहंदी समारंभ आणि रिसेप्शनसाठी वेगवेगळ्या थीम्सना अनुकूल असलेल्या प्रीमियम कलेक्शनमधून साड्या निवडल्या आहेत. त्यांना पारंपरिक डिझाईन्समध्ये खूप रस होता. अंजली आणि साराच्या दोघींना राजेशाही रंग खूप आवडले. त्यांनी अनेक साड्या ऑर्डर केल्या तसेच गुणवत्ता, कलेक्शन आणि सेवेचे कौतुक केले.

साधारण चार महिन्यांपूर्वी, ऑगस्ट महिन्यात सचिनचा लाडका लेक अर्जुन तेंडुलकर आणि प्रसिद्ध उद्योगपती रवी घई यांची नात सानिया चंडोक यांचा साखरपुडा झाला. अत्यंत खासगी अशा समारभांत दोन्ही कुटुंब, त्यांचे जवळचे नातेवाईक आणि काही खास मित्र-मैत्रिणी एवढेच लोक उपस्थित होते. अर्जुनची भावी पत्नी सानिया ही मुंबई स्थित मिस्टर पॉज पेट स्पा अँड स्टोअर एलएलपीची संचालक आहे. दोघेही बालपणीचे मित्र आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >