मुंबई : सैराट फेम रिंकू राजगुरू तिच्या नवीन चित्रपटातून 'आशा' च्या माध्यमातून भेटीला येत आहे. याआधीही तिने सिनेमातील तिच्या भूमिकेचे फोटो सोशल मीडियावर अकाउंट वरून शेअर करत एक नवीन प्रोजेक्ट करत असल्याची माहिती चाहत्यांना दिली होती. आणि अखेर या सिनेमाची पहिली झलक, सिनेमाचा टिझर प्रदर्शित झाला आहे.
बाई अडलीये... म्हणूनच ती नडलीये अशी ठसठशीत टॅगलाईंन असणाऱ्या या सिनेमाचे प्रदर्शन १९ डिसेंबर होणार असून सामाजिक वास्तवावर प्रकाश टाकणार आहे. प्रदर्शनाआधीच 'आशा' या सिनेमाचं खूप कौतुकही झाले आहे. ६१ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात तब्बल चार पुरस्कार मिळवत चित्रपटाने समीक्षकांची दाद मिळवली आहे. या सन्मानामुळे प्रेक्षकांच्या अपेक्षा अधिकच उंचावल्या आहेत. महिलांचे आयुष्य, त्यांचा संघर्ष आणि समाजाप्रती असलेली जबादारी प्रभावीपणे मांडणारी कथा या चित्रपटाचा मुख्य विषय आहे.
चित्रपटात रिंकू राजगुरू 'आशा सेविका' ची भूमिका साकारत असून, तिच्या अभिनयाकडे सर्वांचं लक्ष वेधलं जात आहे. आरोग्य यंत्रणेतील एक साधी कर्मचारी असे तीच बाह्यरूप असले तरी कुटुंबासाठी आधारस्तंभासारखी उभी असणारी स्त्री अशी रिंकूची भूमिका आहे. तिच्या दैनंदिन आयुष्यातील संघर्ष, कठीण परिस्तिथीशी दोन हात करण्याची तयारी आणि हार न मानणारी ताकद या सर्वांची झलक टीझरमध्ये दिसते आहे..
या चित्रपटात सयांकित कामत, उषा नाईक, शुभांगी भुजबळ, सुहास शिरसाट, दिशा दानडे, दिलीप घारे, आणि हर्ष गुप्ते हे कलाकारही महत्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.






