Friday, November 21, 2025

शुभमन गिल दुसऱ्या कसोटीतून बाहेर! 'या' खेळाडूकडे नेतृत्वाची जबाबदारी

शुभमन गिल दुसऱ्या कसोटीतून बाहेर! 'या' खेळाडूकडे नेतृत्वाची जबाबदारी

मुंबई : भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका या दोन संघांमध्ये कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. ईडन गार्डनवर झालेल्या पहिला कसोटी सामन्यात हरल्यानंतर भारतीय संघावर दबाव वाढला असून आता दुसरा कसोटी सामना निर्णायक ठरणार आहे. हा सामना गुवाहाटीत खेळला जाणार आहे. मात्र, या महत्वाच्या सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिल मानेच्या दुखापतीमुळे मालिकेतील दुसऱ्या सामन्यातून बाहेर पडला आहे.

पहिल्या कसोटीत फलंदाजी दरम्यान गिलच्या मानेला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला रिटायर्ड हर्ट व्हावे लागल्याने पुढील डावांत तो खेळू शकला नव्हता. परिणामी भारताला १० फलंदाजांसह खेळावे लागले. पण फलंदाजांच्या फ्लॉप शो मुळे भारतीय संघाचा डाव अवघ्या ९३ धावांवर आटोपला. त्यामुळे भारतीय संघ विजयापासून ३० धावा दूर राहिला.

यानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ गुवाहाटीत दाखल झाला आहे. गिललासुद्धा उपचारानंतर रविवारी डिस्चार्ज मिळाला असून तो संघासोबत गुवाहाटीत दाखल झाला होता. यामुळे गिल सामना खेळेल अशी आशा सर्वांना होती. मात्र त्याच्या तब्येतीमध्ये आवश्यक सुधारणा न झाल्याने दुसरा कसोटी सामना खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच पुढील उपचारासाठी तो मुंबईत येणार आहे. एका वृत्तानुसार ,आता संघाचे नेतृत्व ऋषभ पंत करणार असून, उपकर्णधार कोण असेल याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही.

Comments
Add Comment