Friday, November 21, 2025

'प्रहार' शेअर बाजार विश्लेषण: सेन्सेक्स व निफ्टी लुडकला ! बँकसह मेटल शेअर्समध्ये घसरण 'या' कारणांमुळे आठवड्यातील अखेर घसरणीनेच

'प्रहार' शेअर बाजार विश्लेषण: सेन्सेक्स व निफ्टी लुडकला ! बँकसह मेटल शेअर्समध्ये घसरण 'या' कारणांमुळे आठवड्यातील अखेर घसरणीनेच

मोहित सोमण: आज सकाळी खालावलेले शेअर बाजार अखेरच्या सत्रात आणखी खालावला व बँक, मिड स्मॉल कॅप, मेटल, रिअल्टी या शेअर्समध्ये झालेल्या मोठ्या घसरणीचा एकूण फटका एकूणच निर्देशांकात बसला आहे. त्यामुळे इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात अखेरच्या सत्रात सेन्सेक्स ४००.७६ अंकाने घसरत ८५२३१.९२ पातळीवर व निफ्टी १२४ अंकांने कोसळत २६०६८.१५ पातळीवर स्थिरावला आहे. सेन्सेक्स बँक ५२४ व बँक निफ्टीत ४८० अंकांने घसरण झाल्याने शेअर बाजाराला सपोर्ट लेवल मिळू शकली नाही. आज भारताच्या एचसबीसीने जाहीर केलेल्या पीएमआय उत्पादन निर्मिती आकडेवारीत (Manufacturing) घसरण झाल्याचा ठपका बाजारात स्पष्टपणे दिसला आहे. किंबहुना आज बाजारात सेल ऑफ झाल्याने बहुतांश लार्जकॅप शेअर्समध्ये आज पडझड झाली ज्यामध्ये एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज अशा बड्या शेअरचा समावेश आहे दुसरीकडे ऑटो शेअर्समध्ये टाटा टीएमपीव्ही, एम अँड एम, मारूती सुझुकी सारख्या हेवी वेट शेअरमध्ये वाढ झाल्याने घसरणीची दरपातळी मर्यादित राहिली आहे. अंतिमतः बाजारात आज नवा ट्रिगर नसल्याने व जागतिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर आज गुंतवणूकदारांचे नुकसान झाले. निफ्टीतील आज २६१०० ची पातळी खालावली गेल्याचे पहायला मिळाले. आज बीएसईत ४३३८ शेअर्समध्ये १२८१ शेअर वाढले असून २९०० शेअर्समध्ये घसरण झाली आहे. तर एनएसईत ३१७५ शेअर्समध्ये ७८४ शेअर्समध्ये वाढ झाली असून २३०५ शेअरमध्ये घसरण झाली आहे.

आज युएस बाजारातील सुरूवातीच्या कलात डाऊ जोन्स (०.०८%) निर्देशांकात वाढ झाली असून एस अँड पी ५०० (१.५५%), नासडाक (२.१६%) निर्देशांकात घसरण झाली आहे. कमकूवत विना शेती (Non Farm) डेटातील घसरत्या कामगिरीचा विस्तारित फटका युएस बाजारात अपेक्षित आहे. युरोपियन बाजारातील तिन्ही एफटीएसई (०.७५%), सीएससी (०.८८%), डीएएक्स (१.५०%) निर्देशांकात घसरण झाली आहे. आशियाई बाजारातील अखेरच्या सत्रात सगळ्याच बाजारात घसरण झाली. गिफ्ट निफ्टीतील (०.५४%) घसरणीसह सर्वाधिक घसरण निकेयी २२५ (२.३४%), तैवान वेटेड (३.७५%), सेट कंपोझिट (२.१९%), हेंगसेंग (२.५७%) निर्देशांकात झाली आहे. आज भारतीय रूपयांची निचांकी घसरण झाली आहे. अनिश्चिततेमुळे आज जागतिक डॉलर निर्देशांकातील वाढ झाल्याने रूपयांची पातळी ८९.४८ पातळीवर झाली आहे. अर्थातच अस्थिरतेतील घसरत्या मागणीमुळे व वायदा बाजारातील स्पॉट मागणीत घसरण व डॉलरमध्ये झालेल्या वाढीमुळे जागतिक बाजारपेठेत सोन्याचांदीच्या दरात घसरण झाली जी भारतातही कायम राहिली आहे. कच्च्या तेलाच्या निर्देशांकातही आज मोठी घसरण झाली आहे. WTI Futures, Brent Future या दोन्ही निर्देशांकात आज २ते ३% दरपातळी घसरली आहे.

अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ पीसीएम श्रीराम (८.०३%), फाईव्ह स्टार बस फायनान्स (४.३६%), इंडसइंड बँक (२.०७%), टीबीओ टेक (१.९१%),सीईएससी (१.२८%), कोहान्स लाईफ (१.२८%), सम्मान कॅपिटल (१.२१%) समभागात झाली असून सर्वाधिक घसरण जेपी पॉवर वेंचर (७.५३%), जीई व्हर्नोवा (५.४५%), सीपीसीएल (४.७५%), भारती हेक्साकॉम (४.१८%), जीएमडीसी (४.१५%), जेएसडब्लू एनर्जी (४.०२%), ट्यूब इन्व्हेसमेंट (४.०१%), हिंदुस्थान कॉपर (३.९७%),नेटवेब टेक्नॉलॉजी (३.८७%) समभागात झाली आहे.

आजच्या शेअर बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले आहेत की,'अमेरिकेतील बिगर-शेती वेतन आकडेवारीने अपेक्षेपेक्षा चांगले आल्यानंतर आशियाई शेअर बाजारांमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण दिसून आली, ज्यामुळे डिसेंबरमध्ये व्याजदर कपातीची अपेक्षा कमी झाली. दोन दिवसांच्या संक्षिप्त वाढीनंतर नफा वसुलीमुळे सावधगिरीचा सूर वाढला, ज्यामुळे सर्व प्रमुख निर्देशांक 'लाल' रंगात आले, मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये तीव्र सुधारणा झाल्या. कमकुवत मॅन्युफॅक्चरिंग पीएमआय रीडिंग, कमकुवत आयएनआर आणि भारत-अमेरिका व्यापार चर्चेतील संभाव्य विलंबांबद्दल वाढत्या चिंता यामुळे बाजारातील भावना आणखी कमी झाल्या.'

आजच्या बाजारातील निफ्टी पोझिशनवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे वरिष्ठ तांत्रिक विश्लेषक रूपक डे म्हणाले आहेत की,'गुरुवारी निफ्टीच्या तासिक चार्टवर मंदीचा हारामी पॅटर्न निर्माण झाला, ज्यामुळे गेल्या दोन दिवसांत मोठी घसरण झाली. तासिक चार्टवर निर्देशांक २१ ईएमए (Exponential Moving Average EMA) पातळीच्या खालीही घसरला आहे, जो येत्या सत्रांमध्ये आणखी कमकुवतपणा दर्शवितो. तासिक आरएसआय (Relative Strength Index RSI) मंदीच्या क्रॉसओवरमध्ये आहे आणि घसरण सुरूच आहे.नजीकच्या काळात बुल्ससाठी भावना आव्हानात्मक राहू शकते, कारण ही घसरण २५९२०-२५९०० झोनपर्यंत वाढू शकते. वरच्या बाजूला, प्रतिकार (Resistance) २६१६६ वर ठेवला आहे; या पातळीपेक्षा वर गेल्याने भावना सुधारू शकते.'

आजच्या बाजारातील रुपयांच्या परिस्थितीवर विश्लेषण करताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले आहेत की,'भारत-अमेरिका व्यापार करारावर कोणताही स्पष्ट संवाद किंवा प्रगती नसल्यामुळे, विक्रीचा दबाव निर्माण झाला. टॅरिफ रोलबॅक किंवा व्यापार-संबंधित आश्वासनांची कोणतीही दृश्यमानता नसल्याने, भावनेत कमकुवतपणा राहिला, ज्यामुळे रुपयात व्यापक जोखीम-बंद हालचाली सुरू झाल्या. जवळच्या काळात कमकुवतपणा आणखी वाढू शकतो, रुपया ८९.२०-९०.०० च्या श्रेणीत व्यापार करण्याची शक्यता आहे.'

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >