प्रतिनिधी: दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे वी के आर वी राव प्रतिष्ठान संवाद येथे दिलेल्या आपल्या अभिभाषणात आरबीआयच्या गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी अर्थव्यवस्थेवर महत्वपूर्ण विधान केले आहे.' अर्थव्यवस्थेतील नियमन (Regulations) हे इतर कुठल्याही क्षेत्रातील नियमनापेक्षा अधिक क्लिष्ट असते.' असे विधान केले आहे. अर्थव्यवस्थेतील काचखळगे विद्यार्थ्यांना समजवून सांगताना त्यांनी हे महत्वाचे विधान केले आहे. आर्थिक, भांडवल बाजारातील घडामोडीविषयी विद्यार्थ्यांना मूलभूत पायांविषयी संकल्पान मांडताना हे पुढील विधान केले. हे नियमन केवळ क्लिष्ट नाही तर संपूर्ण अर्थव्यवस्थेसाठी, सिस्टिमसाठी व अर्थकारणासाठी महत्वाचे आहे. या नियमनातूनच अर्थव्यवस्था जोखमीपासून सुरक्षित होते' असे विधान त्यांनी केले.
हा मुद्दा अधोरेखित करताना, इतर क्षेत्रातील जोखमी कसल्यातरी त्या क्षेत्रातील कार्यभागापुरती मर्यादित असतात मात्र अर्थकारणातील जोखमी या अर्थ व इतर क्षेत्रातील व्यवस्थेवर परिणाम करू शकतात' असेही गव्हर्नर संजय मल्होत्रा म्हणाले आहेत. या आर्थिक नुकसानातून संवेदनशीलता इतर क्षेत्रातील व्यवस्थेवर पसरते. अशातच बँकेचा दाखला देत मल्होत्रा म्हणाले आहेत की, बँका जर बुडल्या तर त्याचा परिणाम ग्राहकांसह अंतर्बाह्य विविध बँकेच्या संबंधांवर, मुदत ठेवीदारांवर, समाजातील अर्थकारणावर, कर्जपुरवठ्यावर, तसेच पेमेंट प्रणालीवर व इतर क्षेत्रीय कामकाजासाठी होत असतो.' असे ते म्हणाले. अशा घटनांचा केवळ आर्थिक नाही तर सामाजिक संदर्भात होत असतो. २००८ सालच्या आर्थिक मंदीचा दाखल देत त्यांनी एकूण होत असलेल्या परिणामांवर भाष्य केले. प्रगत राष्ट्रांमध्ये या गोष्टीमुळे झालेल्या आर्थिक परिणामांचा इतर अर्थव्यवस्थेतील झालेल्या बदल अथवा परिणामावर त्यांनी भाष्य केले.
आरबीआय गव्हर्नर यांनी पुढे स्पष्ट केले की,'वित्तीय संस्थांची अंतर्गत नाजूकता नियामक आव्हानांमध्ये भर घालते. बँका परिपक्वता (Bank Maturity) आणि तरलता परिवर्तनावर (Liqudity Transformation) काम करतात, अल्पकालीन ठेवी स्वीकारत दीर्घकालीन कर्जे देतात. हे कार्य आर्थिकदृष्ट्या मौल्यवान असले तरी, ते असुरक्षितता निर्माण करते जे अनिश्चिततेच्या काळात वेगाने वाढू शकते असेही ते म्हणत त्यांनी अर्थशास्त्रीय दृष्टीकोन समजावून सांगितला.
यावेळी'विश्वास कमी झाल्यामुळे बँकांमध्ये धावपळ होते बाजारातील तरलता समस्या काही दिवसांतच सॉल्व्हन्सी संकटात बदलू शकतात' असे ते म्हणाले. तात्पुरते बंद करता येणाऱ्या उत्पादन युनिटच्या विपरीत धावपळीचा सामना करणाऱ्या बँकेचा आजार रोखण्यासाठी त्वरित समस्येचे निराकरण करणे आवश्यक आहे. मल्होत्रा यांनी वित्तीय बाजारांच्या चक्रीय आणि समुह संचलित अर्थव्यवस्थेतील स्वरूपावरही प्रकाश बोलताना टाकला आहे.
तेजीच्या काळात, जोखीम कमी किमतीत असतात तसचे कर्ज मानके (Loan Standards) कमकुवत होतात आणि मालमत्तेचे बुडबुडे बाहेर पडतात. याउलट, मंदीच्या काळात मात्र क्रेडिट सर्वात जास्त आवश्यक असतानाच कमीच होते. व्यवसाय चक्रांचे (Business Cycle) हे विस्तारीकरण, बहुतेक इतर क्षेत्रांच्या तुलनेत वित्तीय बाजारांना स्पष्टपणे अस्थिर बनवते, असे ते म्हणाले. त्यांनी यावर भर दिला की रिझर्व्ह बँकेसाठी, आर्थिक स्थिरता 'North Star' राहिली असल्याचे त्यांनी म्हटले. याशिवाय स्थिरतेच्या किंमतीवर मिळवलेली अल्पकालीन वाढ दीर्घकालीन नुकसानादेखील खोलवर नेऊ शकते, असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे. ते पुढे म्हणाले आहेत की, आर्थिक अस्थिरता केवळ उच्च अल्पकालीन वाढीमुळे होणारे नफा कमी करू शकत नाही तर आर्थिक पुनर्प्राप्ती मंद आणि अधिक त्रासदायक बनवते.






