Friday, November 21, 2025

Mariott International: मॅरियटची भारतात मोठी घोषणा-लवकरच भारतात २६ नवी तारांकित हॉटेल्स जाणून घ्या फिचर्ससह प्रत्येकाची नावासगट यादी एका क्लिकवर!

Mariott International: मॅरियटची भारतात मोठी घोषणा-लवकरच भारतात २६ नवी तारांकित हॉटेल्स जाणून घ्या फिचर्ससह प्रत्येकाची नावासगट यादी एका क्लिकवर!

प्रतिनिधी:जे डब्ल्यू मॅरियटसह इतर प्रसिद्ध ब्रँडसह पंचतारांकित हॉटेल चेन चालवत असलेल्या मॅरियट इंटरनॅशनलकडून भारतात नवीन २६ हॉटेल्स उघडली जाणार असल्याचे कंपनीने आज निवेदनात स्पष्ट केले आहे. भारतातील आपला हॉटेल्स सेवा व हॉस्पिटालिटी क्षेत्रातील पोर्टफोलिओ विस्तार करण्यासाठी कंपनीने हे धोरणात्मक पाऊल उचलले आहे. त्यातील नव्या माहितीनुसार, किमान या नव्या व्यवसाय वृद्धीत अतिरिक्त १९०० रूमचा समावेश असणार आहे. संपूर्ण जगभरात आपले अस्तित्व निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या मॅरियट समुहाने आपले विशेष लक्ष चीन वगळता एशिया पॅसिफिक परिसरात केंद्रीत केले आहे. याविषयी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना,' मॅरियट इंटरनॅशनलने कॉन्सेप्ट हॉस्पिटॅलिटी आणि त्यांच्या प्रमुख ब्रँड, द फर्न हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स यांच्या सहकार्याने आशिया पॅसिफिकमध्ये चीन वगळता त्यांचा नवीनतम कलेक्शन ब्रँड लाँच केला आहे. "द फर्न हॉटेल्स अँड रिसॉर्ट्ससोबतच्या आमच्या धोरणात्मक कराराद्वारे भारतात मॅरियटची मालिका सादर करताना आम्हाला आनंद होत आहे' असे मॅरियट इंटरनॅशनलच्या दक्षिण आशियातील वरिष्ठ उपाध्यक्ष किरण अँडिकॉट यांनी सांगितले.

मॅरियट इंटरनॅशनल इन्‍क.ने भारतात द फर्न हॉटेल्‍स अँड रिसॉर्ट्स, सिरीज बाय मॅरियटच्‍या लाँचची घोषणा केली आहे. या निमित्ताने जगभरातल्या व्याप्तीसाठी मॅरियट बोनव्‍हॉयच्‍या ३० हून अधिक असाधारण हॉटेल ब्रँड्सच्‍या जागतिक पोर्टफोलिओचा भाग असलेल्‍या सिरीज बाय मॅरियटच्‍या जागतिक पदार्पणाची घोषणा या निमित्ताने केली आहे. सिरीज बाय मॅरियट प्रादेशिक स्‍तरावर डिझाइन करण्‍यात आलेला, जागतिक स्‍तराशी संलग्‍न, कलेक्‍शन ब्रँड आहे, जो स्‍थानिक पातळीवर प्रशंसित हॉटेल ग्रुप्‍सना मॅरियट बोनव्‍हॉयच्‍या विश्वसनीय आश्रयांतर्गत एकत्र आणतो असेही यावेळी कंपनीने स्पष्ट केले आहे ‌जागतिक देशांतर्गत' पर्यटकांसाठी डिझाइन करण्‍यात आलेला ब्रँड मुलभूत सुविधा देतो, जसे आरामदायी रूम्‍स, विश्वसनीय सेवा आणि स्‍थानिक अनुभव, ज्‍यामधून प्रत्‍येक ठिकाणाची विशिष्‍टता दिसून येते असा दावा कंपनीने केला आहे. आगामी वर्षामध्‍ये १०० हून अधिक हॉटेल्‍स लाँच करण्‍याची योजना आहे असे कंपनीने म्हटले आहे.

उद्घाटनाचा पहिला टप्‍पा - नोव्‍हेंबर २०२५

द फर्न हॉटेल्‍स अँड रिसॉर्ट्स, सिरीज बाय मॅरियट

अंतर्गत उद्घाटनाच्‍या पहिल्‍या टप्‍प्‍यात २३ शहरांमध्‍ये २६ मालमत्तांमधील १९०० हून अधिक रूम्‍सना सादर करण्‍यात येईल, यादी पुढीलप्रमाणे:

• द फर्न रेसिडेन्सी अहमदाबाद, सुभाष ब्रिज, सिरीज बाय मॅरियट - अहमदाबाद (६९ रूम्‍स)

• द फर्न रेसिडेन्सी बेंगळुरू, शेषाद्रिपुरम, सिरीज बाय मॅरियट - बेंगळुरू (७९ रूम्‍स)

• द फर्न रेसिडेन्सी भिवंडी-पिंपल्स, सिरीज बाय मॅरियट - भिवंडी (७९ रूम्‍स)

• द फर्न रेसिडेन्सी बोधगया, सिरीज बाय मॅरियट - बोधगया (६३ रूम्‍स)

• द फर्न सीसाईड लक्झरीयस टेंट रिसॉर्ट दमण, सिरीज बाय मॅरियट हॉटेल - दमण (३१ रूम्‍स)

• द फर्न समाली रिसॉर्ट दापोली, सिरीज बाय मॅरियट - दापोली (३८ रूम्‍स)

• द फर्न सूर्या रिसॉर्ट धरमपूर, कसौली हिल्स, सिरीज बाय मॅरियट - धरमपूर (४१ रूम्‍स)

• द फर्न सरदार सरोवर रिसॉर्ट एकता नगर, सिरीज बाय मॅरियट - एकता नगर (१६९ रूम्‍स)

• द फर्न रेसिडेन्सी गांधीनगर, सिरीज बाय मॅरियट - गांधीनगर (७५ रूम्‍स)

• द फर्न हेवन ऑन द हिल्स हातगड - सापुतारा, सिरीज बाय मॅरियट - हातगड (६८ रूम्‍स)

• द फर्न जयपूर, सिरीज बाय मॅरियट - जयपूर (८५ रूम्‍स)

• भानू द फर्न फॉरेस्ट रिसॉर्ट आणि स्पा जांबुघोडा, सिरीज बाय मॅरियट - जांबुघोडा (९१ रूम्‍स)

• द फर्न रेसिडेन्सी जामनगर, सिरीज बाय मॅरियट - जामनगर (४९ रूम्‍स)

• डेबूज द फर्न रिसॉर्ट अँड स्पा जिम कॉर्बेट, सिरीज बाय मॅरियट - जिम कॉर्बेट (८१ रूम्‍स)

• द फर्न कोची, सिरीज बाय मॅरियट - कोची (९२ रूम्‍स)

• द फर्न कोल्हापूर, सिरीज बाय मॅरियट - कोल्हापूर (९३ रूम्‍स)

• द फर्न मुंबई, गोरेगाव, सिरीज बाय मॅरियट - मुंबई (९४ रूम्‍स)

• द फर्न रेसिडेन्सी मुंबई, मीरा रोड, सिरीज बाय मॅरियट - मुंबई (७० रूम्‍स)

• द फर्न ब्रेंटवुड रिसॉर्ट मसूरी, सिरीज बाय मॅरियट - मसूरी (७२ रूम्‍स)

• अमानोरा द फर्न पुणे, सिरीज बाय मॅरियट - पुणे (४८ रूम्‍स)

• ई-स्‍क्‍वेअर द फर्न पुणे, सिरीज बाय मॅरियट - पुणे (५५ रूम्‍स)

• द फर्न रेसिडेन्सी पुणे, वुडलँड, सिरीज बाय मॅरियट - पुणे (८७ रूम्‍स)

• द फर्न रेसिडेन्सी राजकोट, सिरीज बाय मॅरियट हॉटेल - राजकोट (६९ रूम्‍स)

• द फर्न रेसिडेन्सी सोलापूर, सिरीज बाय मॅरियट - सोलापूर (५४ रूम्‍स)

• द फर्न विश्रांता रिसॉर्ट कामरेज-सुरत, सिरीज बाय मॅरियट - सुरत (८९ रूम्‍स)

• द फर्न वडोदरा, सिरीज बाय मॅरियट - वडोदरा (७२ रूम्‍स)

द फर्न हॉटेल्‍स अँड रिसॉर्ट्स, सिरीज बाय मॅरियट येथे निवास सुविधेमध्‍ये राहणाऱ्या अतिथींना पुढील गोष्‍टींचा आनंद मिळू शकतो -

ग्रॅब अँड गो ब्रेकफास्ट - सकाळी लवकर निघणाऱ्या अतिथींसाठी त्‍यांच्‍या विनंतीनुसार पॅक केलेला ब्रेकफास्ट बॉक्स उपलब्ध करून देण्‍यात येतो, ज्‍यामुळे दिवसाची सुरुवात उत्साहाने होईल.

सिंगल लेडी ट्रॅव्हलर रिकग्निशन- आमच्या सिंगल लेडी अतिथींवर लक्ष केंद्रित केलेल्या सुविधांचा सर्वोत्तम संग्रह, आगमनापूर्वी त्यांच्या रूममधील किटमध्ये ठेवला जातो.

इव्हनिंग डिलाईट- सायंकाळी चॉकलेट/स्थानिक खाद्यपदार्थांसह सर्वोत्तम सेवा आणि वैयक्तिकृत गुडनाइट संदेश (Personalised Message)

• दीप प्रज्‍वलन समारोह-सायंकाळीच्‍या वेळी शांतमय विधी, जो निसर्गामधील पैलूंना सन्‍मानित करतो आणि अतिथींना शांतमय वातावरणात उत्‍साहित होण्‍यास आमंत्रित करतो.

• आरोग्‍यदायी झोप- दररोज रात्री आरामदायी झोपेसाठी बेडच्या बाजूला जिरे मिसळलेल्‍या पाण्‍यासह भिजवलेले बदाम आणि मनुका ठेवले जातात.

'आम्‍हाला द फर्न हॉटेल्‍स अँड रिसॉर्ट्स, सिरीज बाय मॅरियटसाठी मिळालेल्‍या प्रतिसादाने सर्व अपेक्षांना मागे टाकले आहे. आमच्‍या सहयोगी हॉटेल्‍समधील हा समन्‍वय पाहून खूप आनंद होत आहे. शाश्वत आदरातिथ्‍याप्रती आमची कटिबद्धता, उद्योगामध्‍ये विकासाप्रती वाढती महत्त्वाकांक्षा आणि मॅरियटच्‍या प्रबळ वितरण व यंत्रणांसह आम्‍ही देशभरातील सिरीज उपस्थिती झपाट्याने वाढवण्‍यास उत्‍सुक आहोत' असे कन्‍सेप्‍ट हॉस्पिटॅलिटीचे मॅनेजिंग डायरेक्‍टर (व्‍यवस्‍थापकीय संचालक) सुहेल कन्‍नमपिल्‍ली म्‍हणाले आहेत. मॅरियट इंटरनॅशनलसाठी प्रमुख विकास बाजारपेठ भारतातील कन्‍सेप्‍ट हॉस्पिटॅलिटी प्रायव्‍हेट लिमिटेड (Concept Hospitality Private Limited) (CHPL) सोबत संस्‍थापकीय करार करत सिरीज बाय मॅरियट लाँच करण्‍यात आले आहे. एमएनसी असलेल्या सीजी कॉर्प ग्‍लोबलचा हॉस्पिटॅलिटी विभाग सीजी हॉस्पिटॅलिटी सीएचपीएलमध्‍ये बहुसंख्‍य भागभांडवलधारक आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >