Friday, November 21, 2025

मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आफ्रिकेत रवाना जागतिक महत्वाच्या 'या' मुद्यांवर G20 परिषदेत चर्चा होणार

मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आफ्रिकेत रवाना जागतिक महत्वाच्या 'या' मुद्यांवर G20 परिषदेत चर्चा होणार

प्रतिनिधी: आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जी २० (G20) परिषदेला निघाले आहेत. आज त्यांनी जोहान्सबर्ग दक्षिण आफ्रिकेत निघण्यासाठी उड्डाण घेतले आहे. जगभरातील चाललेल्या विविध घडामोडींचा आर्थिक भूराजकीय, व सामाजिक धांदोळा या बैठकीत घेतला जाऊ शकतो. भारत व दक्षिण देशासाठी ही महत्वाची परिषद असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत देखील या परिषदेत सहभागी होतील. तीन दिवसांच्या दौऱ्यावर पंतप्रधान असताना यामध्ये अनेक विषयांवर संवाद होईल. दक्षिण आफ्रिकाकडे यंदाचे यजमानपद असणार आहे. यापूर्वी ते गेल्या वर्षी ब्राझीलकडे होते व तत्पूर्वी २०२३ मध्ये भारतात व २०२२ मध्ये इंडोनेशियात या परिषदेचे नियोजन केले गेले होते. या परिषदेतील महत्वाच्या तीन सत्रांना तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थिती लावतील अशी चिन्हे आहेत. आज २१ पासून २३ नोव्हेंबरपर्यंत ही परिषद संपन्न होणार आहे. उल्लेखनीय यंदा अमेरिकेतील प्रतिनिधी मात्र या परिषदेला हजेरी लावणार नाहीत असे व्हाईट हाऊसने सांगितले आहे.मात्र अमेरिकेचे आफ्रिकेतील दुतावास या बैठकीला उपस्थित राहतील असे सांगण्यात येत आहे.

विकसनशील देश त्यांची आर्थिक सामाजिक, भूराजकीय भौगोलिक परिस्थिती व त्यांच्यावर होणारे जागतिक परिणाम, विकसित राष्ट्रांशी असलेले त्यांचे संबंध, पर्यावरण, आर्थिक प्रगती, शाश्वतता, हवामान बदल यासह व्यापारी संबंध, उर्जा निर्मिती, अन्नधान्य उत्पादन व वितरण या अशा अनेक महत्वाच्या विषयावर चर्चा अपेक्षित आहे.भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या अधिसूचनेत पंतप्रधान शिखर परिषदेच्या तिन्ही मुख्य सत्रांना संबोधित करतील अशी अपेक्षा आहे. या सत्रांमध्ये समावेशक आणि शाश्वत आर्थिक वाढ, व्यापार, विकास वित्तपुरवठा आणि जागतिक कर्ज आव्हान यांचा समावेश असेल. इतर चर्चा आपत्ती-जोखीम कमी करणे, व्यवस्थापन करणे, हवामान कृती, ऊर्जा संक्रमण आणि अन्न व्यवस्था याद्वारे एक लवचिक जग निर्माण करण्यावर केंद्रित असतील. अंतिम सत्रात प्रत्येकासाठी एक निष्पक्ष भविष्य निर्माण करण्यावर चर्चा केली जाईल, ज्यामध्ये महत्त्वाचे खनिजे, सभ्य काम आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यासारखे विषय असतील.' असे नमूद केले आहे.

माहितीनुसार चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिंगपींग देखील या बैठकीला उपस्थित राहू शकणार नाही. त्यामुळे भारत चीन, भारत युएस यांच्यातील चर्चेसाठी आयता तयार झालेल्या व्यासपीठाला फुली लागली आहे. एकूण १९ राष्ट्रांचा समुह म्हणून ओळखली जाणारी जी २० परिषद विविध कारणावर, प्रश्नांवर वेळोवेळी चर्चा करते. यामध्ये बहुतांश विकसनशील देशांसह काही विकसित देशांचाही समावेश आहे. १९९९ साली या परिषदेची स्थापना झाली होती. प्रामुख्याने जागतिकीकरणात विकसनशील व विकसित देशांचे बदललेले संबंध, बदललेले जागतिक संदर्भ या विषयावर विस्तृत चर्चा करण्यासाठी हे व्यासपीठ तयार करण्यात आले होते. या देशांमध्ये ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, कोरिया प्रजासत्ताक, मेक्सिको, रशिया, अर्जेन्टिना, ऑस्ट्रेलिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, तुर्की, यूके, अमेरिका, युरोपियन युनियन आणि आफ्रिकन युनियन यांचा समावेश होतो.

यापूर्वी युरोपियन युनियन आणि दक्षिण आफ्रिकेने गुरुवारी सांगितले की त्यांनी हरित संक्रमणासाठी आवश्यक असलेला पुरवठा सुरक्षित करण्यासाठी संसाधनांनी समृद्ध आफ्रिकन राष्ट्रात खनिजे आणि धातूंचे अन्वेषण, उत्खनन आणि शुद्धीकरण वाढवण्यावर सहमती दर्शविली आहे.शिखर परिषदेच्या शेवटी, पंतप्रधान जोहान्सबर्गमध्ये उपस्थित असलेल्या काही नेत्यांशी द्विपक्षीय बैठका घेण्याची अपेक्षा आहे. माहितीनुसार ते तेथे असलेल्या सहाव्या IBSA शिखर परिषदेलाही उपस्थित राहणार आहेत.

या वर्षीच्या G20 चा विषय 'एकता, समानता आणि शाश्वतता' आहे. दक्षिण आफ्रिकेने नवी दिल्ली आणि ब्राझीलमधील रिओ डी जानेरो येथे झालेल्या मागील शिखर परिषदेतील निघालेल्या निष्कर्षावर यावेळी पुढे चर्चा अपेक्षित आहे.

याविषयी बोलताना पंतप्रधान म्हणाले आहेत की,'वसुधैव कुटुंबकम' आणि 'एक पृथ्वी, एक कुटुंब आणि एक भविष्य' या आपल्या दृष्टिकोनाशी सुसंगत असलेल्या शिखर परिषदेत मी भारताचा दृष्टिकोन मांडेन'.शिखर परिषदेच्या तीन सत्रांमध्ये 'सर्वसमावेशक आणि शाश्वत आर्थिक वाढ', 'कोणालाही मागे न ठेवता: आपल्या अर्थव्यवस्थांची उभारणी' 'व्यापाराची भूमिका', 'विकासासाठी वित्तपुरवठा आणि कर्जाचा बोजा' अशा विषयांवर चर्चासत्रे समाविष्ट आहेत.

उपलब्ध माहितीनुसार, उर्वरित दोन सत्रे 'एक लवचिक जग- G20 चे योगदान (A Resilient World) - आपत्ती जोखीम कमी करणे (Disaster Risk Reduction) हवामान बदल फक्त ऊर्जा संक्रमण, अन्न व्यवस्था' (Just Energy Transitions, Food Systems) आणि 'सर्वांसाठी एक निष्पक्ष भविष्य: गंभीर खनिजे, सभ्य काम, कृत्रिम बुद्धिमत्ता' (A Fair and Just Future for all : Critical Minerals, Decent Work, Artificial Intelligence) अशी आहेत. G20 माहितीनुसार , G20 सदस्यांमध्ये जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांचा समावेश आहे, ज्या जागतिक जीडीपीच्या ८५%, आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या ७५% तसेच जगातील दोन तृतीयांश लोकसंख्येचे प्रतिनिधित्व परिषद करते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा