ढाका : बांगलादेशमध्ये आज, २१ नोव्हेंबर रोजी, सकाळी १० वाजून ८ मिनिटांनी ५.७ रिश्टर स्केलचा मोठा भूकंप आला. या भूकंपाने देशाला मोठा धक्का बसला असून, यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाल्याची आणि २०० हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती आहे. या भूकंपाचे केंद्र राजधानी ढाक्यापासून फक्त २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या नरसिंगडी येथील माधाबादी येथे होते. भूकंपाचा धक्का इतका जोरदार होता की, अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. भूकंपाच्या धक्क्यामुळे एक दहा मजली इमारत एका बाजूला झुकली असल्याचे वृत्त आहे. या भूकंपाचा परिणाम बांगलादेश-आयर्लंड आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यावरही झाला. सुरक्षा आणि खबरदारीचा उपाय म्हणून सामना तात्काळ थांबवण्यात आला. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, पोलिसांनी आतापर्यंत ३ जणांच्या मृत्यूची अधिकृत पुष्टी केली आहे. या घटनेमुळे बांगलादेशमध्ये मोठी जीवित आणि वित्तहानी झाली आहे. या घटनेमुळे बांगलादेशला १७६२ मध्ये आलेल्या सर्वात मोठ्या भूकंपाची आठवण झाली आहे. त्यावेळी भूकंपाची तीव्रता ८.५ रिश्टर स्केल होती आणि तो 'ग्रेट अराकान भूकंप' म्हणून ओळखला जातो. या नैसर्गिक आपत्तीतून बांगलादेशला सावरण्यासाठी प्रशासन आणि बचाव पथके युद्धपातळीवर काम करत आहेत.
मोहित सोमण: एक्सचेंज फायलिंगमध्ये मिळालेल्या माहितीनुसार, अदानी विल्मर लिमिटेडमधील उर्वरित ७% हिस्साही (Stake) अदानी समुहाने ब्लॉक डील मार्फत विकला आहे. ...
नेमकं काय घडलं?
भूकंपापेक्षा कापड कारखान्यात चेंगराचेंगरीने मोठा धोका
बांगलादेशमध्ये झालेल्या भूकंपाच्या धक्क्यानंतर गाझीपूरमधील श्रीपूर येथे एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर अपघात झाला आहे. भूकंपाच्या भीतीपेक्षा, त्यातून बाहेर पडण्याच्या घाईत झालेल्या चेंगराचेंगरीमुळे १५० हून अधिक कामगार जखमी झाले आहेत. श्रीपूर येथील डेनिमेक (Denimac) नावाच्या कापड कारखान्यात ही दुर्घटना घडली. भूकंपाचे धक्के जाणवताच कामगार घाबरले आणि बहुमजली इमारतीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागले. या घाईगर्दीत झालेल्या चेंगराचेंगरीमुळे १५० हून अधिक कामगार जखमी झाले. या घटनेसाठी कामगारांनी थेट कारखाना प्रशासनाला जबाबदार धरले आहे. भूकंपाचा धक्का जाणवल्यानंतर अधिकाऱ्यांनी कारखान्याचे मुख्य गेट उघडण्यास नकार दिला, अशी गंभीर तक्रार कामगारांनी केली आहे. यामुळे कामगारांमध्ये मोठी घबराट पसरली आणि या घबराटीतूनच चेंगराचेंगरी झाली, ज्यामुळे अधिक कामगार जखमी झाले. चेंगराचेंगरीत जखमी झालेल्या सर्व कामगारांना उपचारासाठी श्रीपूर उपजिल्हा आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. कामगारांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या कारखाना अधिकारी आणि व्यवस्थापनावर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
भूकंपादरम्यान १० महिन्यांच्या चिमुकलीचा जागीच मृत्यू
आज सकाळी झालेल्या भूकंपाने बांगलादेशमध्ये मोठी जीवितहानी केली असून, नारायणगंजच्या रूपगंज उपजिल्हा परिसरातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. भूकंपाच्या धक्क्यानंतर भिंत कोसळल्याने एका १० महिन्यांच्या चिमुकल्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मुलीच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाचा धक्का जाणवताच मुलाची आई आपल्या मुलीला घेऊन घाबरून घराबाहेर पळून गेली. त्या जवळच असलेल्या तिच्या आईच्या घराकडे जात होत्या. मात्र, रस्त्यातच त्यांच्यावर रस्त्याच्या कडेला असलेली एक भिंत अचानक कोसळली. या अपघातात चिमुकल्या मुलीला गंभीर दुखापत झाली. एका पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मुलीचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, मुलीची आई आणि त्यांच्यासोबत असलेले एक शेजारी हे दोघेही जखमी झाले आहेत. त्यांना तात्काळ उपजिल्हा येथील एका खाजगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. या भूकंपात निर्दोष चिमुकल्याचा बळी गेल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोलकातामध्ये २० सेकंदांसाठी भूकंपाचे धक्के जाणवले
आज बांगलादेशमध्ये झालेल्या शक्तिशाली भूकंपाचे धक्के पश्चिम बंगालमधील अनेक भागांमध्ये जाणवले. राजधानी कोलकातासह अनेक जिल्ह्यांमध्ये नागरिकांनी हा थरार अनुभवला. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, कोलकाता शहरात भूकंपाचे हे धक्के सुमारे २० सेकंदांसाठी जाणवले. रिश्टर स्केलवर या धक्क्यांची तीव्रता ५.२ इतकी नोंदवण्यात आली आहे. भूकंपाचे केंद्र बांगलादेशात असल्याचे वृत्त आहे. कोलकाता व्यतिरिक्त, पश्चिम बंगालच्या कूचबिहार, दक्षिण दिनाजपूर, मालदा आणि नादिया या जिल्ह्यांतील अनेक भागांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. यामुळे नागरिक तात्काळ घराबाहेर पडले आणि काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने, या भूकंपाच्या धक्क्यांमुळे आतापर्यंत कोणतेही मोठे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. मात्र, भूकंपाचा केंद्रबिंदू शेजारच्या बांगलादेशात असल्याने आणि त्याची तीव्रता मध्यम असल्याने, या धक्क्यांनी कोलकाता आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.